Posts

Showing posts from February, 2019

3 हजाराची लाच स्विकारताना गेवराई पं.स.मधील विस्ताराधिकारी पकडला

3 हजाराची लाच स्विकारताना गेवराई पं.स.मधील विस्तार अधिकारी येळंबकर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला ------------------------------------- गेवराई ( दिनकर शिंदे  )   शेतातील बांधबंदिस्तच्या कामावरील फाईलवर टिप्पणी टाकुन देण्यासाठी गेवराई येथील पंचायत समिती मधील विस्तार अधिकाऱ्यानी 4 हजाराची लाच मागितली होती. दरम्यान यामधील 3 हजाराची लाच स्विकारताना त्यास रंगेहाथ पकडले. हि कारवाई लाचलुचपत विभागाने येथील पंचायत समितीमध्ये बुधवारी 1 वाजण्याच्या सुमारास केली. या कारवाईमुळे पंचायत समितीमध्ये मोठी खळबळ उडाली होती.  विनायक भास्करराव येळंबकर असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.               लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील एका तक्रारदाराने शेतातील बांधबंदिस्त कामावरील फाईलवर टिप्पणी टाकण्यासाठी येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विनायक येळंबकर हे 4 हजाराची लाच मागत असल्याची तक्रार करण्यात आली होती. यानंतर या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता येळंबकर लाच मागत असल्याचे निष्पन्न

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

Image
युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत तर संपर्कप्रमुख गेवराईत दाखल ================= भाजप पदाधिकारी शांत मात्र लक्ष्मणसेना संभ्रमात ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना आणि भाजप यांची युती जाहीर होताच, गेवराई विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या हालचाली वाढल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने बोलवलेल्या बैठकीसाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित हे मुंबईत तर दुसऱ्याच दिवशी जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव गेवराई तालुक्यात दाखल झाले आहेत. यामुळे शिवसैनिकात उत्साह पहायला मिळत आहे.             राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा शिवसेना व भाजपने निर्णय जाहीर केला आणि एकदाची युती जाहीर झाली.  राज्यात शिवसेना-भाजपच्या झालेल्या युतीमध्ये सत्तेत समान वाटा दोघांचाही असेल, असे भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आले. युती जाहीर होताच गेवराई विधानसभा मतदारसंघात

बीड हा बाळासाहेब ठाकरे यांच्या सच्चा सैनिकांचा जिल्हा -- संपर्कप्रमुख आनंदराव जाधव

Image
जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी झंझावती दौरा करून बीड तालुक्याचा घेतला आढावा =================== ● कुंडलिक खांडे "दबंग" जिल्हाप्रमुख -- आनंद जाधव ---------------------------- चारा छावणीलाही भेट ; शेतकऱ्यांशी साधला संवाद ==================== बीड  ( प्रतिनिधी ) शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या असलेल्या बीड विधानसभा मतदारसंघात जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सर्कल निहाय शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन झंझावती दौरा केला जनावरांच्या चारा छावणीला भेट देऊन आनंद जाधव यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.           लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात झालेल्या शिवसेना-भाजप युतीच्या घोषणे नंतर बीड जिल्ह्यात आलेल्या जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी गेवराई तालुक्यानंतर नंतर बीड विधानसभा मतदारसंघात झंजावती दौरा केला. बीड शहरातील  पदाधिकारी व शिवसैनिकांशी शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात  चर्चा केल्यानंतर संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी मौजे घाटसाळवी येथे शिवसेनेच्या शाखेचा शुभारंभ केला. नाळवंडी सर्कल मधील शिवस

शिवसेना महिला आघाडीची शाखा स्थापन करून रणरागिणींनी रणशिंग फुंकले ..

Image
शिवसेना महिला आघाडीची शाखा स्थापन करून टाकरवणच्या रणरागिणींनी रणशिंग फुंकले ==================== आनंदराव जाधव व बदामराव पंडित यांची उपस्थिती ==================== गेवराई ( प्रतिनिधी )  सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जो धावून येईल आणि सुख, दुःख वाटून घेईल त्याच्याच पाठीशी मतदारसंघातील जनता उभा राहील, असा दृढ विश्वास व्यक्त करत शिवसेना महिला आघाडीची शाखा स्थापन करून टाकरवणच्या रणरागिणींनी जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या उपस्थितीत माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या विजयासाठी रणशिंग फुंकले आहे.           गेवराई विधानसभा मतदारसंघातील टाकरवण येथे  असंख्य महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शिवसेना महिला आघाडीच्या शाखेचा दि 25 फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव व माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सौ गिरीका भाभी पंडित, जि प सभापती युधाजित पंडित,  माजी सभापती पंढरीनाथ लगड,  युवानेते रोहित पंडित, भास्करराव कचरे, गेवराई तालुकाप्रमुख कालिदास नवले, सौ उज्वलाताई भोपळे, स

भारतिय जवानांनी हवाई हल्ला करत पाक अतिरेक्यांचा दहशतवादी तळ केला उद्‌ध्वस्त

Image
==================== दिल्ली ( प्रतिनिधी ) जम्‍मू- काश्मीरमधील पुलवामामध्ये भारतीय जवानांवर झालेल्‍या दहशतवादी भ्याड हल्‍ल्‍यामुळे 48  जवान शहीद झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या भारतीयांनी अतिरेक्यांवर मोठी कारवाई करण्याबाबत केंद्र सरकारवर मोठा दबाव आणला आहे. तसेच या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्‍तानमधील संबंध खूपच ताणले गेले आहेत. दोन्ही देशांच्या सीमेवरील हालचालींमध्येही वाढ झाल्‍याने युध्दसदृष्‍य परिस्‍थिती बनली आहे. सतत पाकिस्‍तानकडून शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन करण्यात येत आहे. भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशांमध्ये पाकिस्तान विरोधात संतप्त भावना व्यक्त होत आहेत. आता भारतानेही याचा बदला घ्यावा, यासाठी सरकारवर दररोज मोठ्या प्रमाणात दबाव वाढत असल्याने, अखेर भारतीय सैन्याने दि 26 फेब्रुवारी रोजी पहाटे मोठी कारवाई केली असून एलओसी ओलांडून हल्ला करत पाकच्या अतिरेक्यांचे दहशतवादी तळ उध्वस्त केले आहेत. याबाबत भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केल्याचा पाकच्या पत्रकाराचा व्हिडिओ पाकमधूनच सर्वत्र व्हायरल झाला आहे.        भारतीय हवाईदलाच्या विमानाने आंतरराष्‍ट्रीय सीमे

गेवराई व बीड मतदारसंघ शिवसेनेसाठी फिक्स ; बदामराव पंडित हेच होणार युतीचे आमदार -- संपर्कप्रमुख आनंदराव जाधव

Image
==================== गेवराई ( प्रतिनिधी ) शिवसेनेने लावून धरलेल्या मागण्या मान्य झाल्याने भाजपा सोबत सत्तेत समान वाटा राहील अशीच युती  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई आणि बीड हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेसाठी फिक्स असून इतर आणखी एक मतदारसंघही सोडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. गेवराईतून शिवसेनेचे बदामराव पंडित हेच युतीचे आमदार होतील असा ठाम विश्वास देऊन, बीड जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी घराघरात जाऊन पक्ष संघटन मजबूत करण्याच्या सूचना शिवसैनिकांना दिल्या आहेत.              येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना आणि भाजप यांची युती झाल्यानंतर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून नवनियुक्त शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव हे गेवराई विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी दि 25 फेब्रुवारी रोजी तालुक्यात आले आहेत. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी झालेल्या शहरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते याप्रसंगी माजीमंत्री बदामराव पंडित, महिला जिल्हा संपर्कप्रमुख संपदाताई गडकरी, जिल्हाप

संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या उपस्थितीत आज गेवराईत शिवसैनिकांच्या बैठका

Image
संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या उपस्थितीत आज गेवराई व तलवाड्यात शिवसैनिकांच्या बैठका ========================= टाकरवणला महिला मेळावा व शाखा शुभारंभ ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्याचे नवनियुक्त संपर्कप्रमुख आनंदराव जाधव हे आज दि 25 फेब्रुवारी  रोजी गेवराई विधानसभा मतदार संघात येत असून त्यांच्यासह माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या उपस्थितीत गेवराई व तलवाडा येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठका तर टाकरवन येथे महिला शाखा स्थापना व मिळावा होणार आहे. या कार्यक्रमास शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख कालिदास नवले यांनी केले आहे.           बीड जिल्ह्याचे नवनियुक्त शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव हे दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी उपस्थित शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत. दुपारी 12 वाजता तलवाडा आणि रेवती देवकी या दोन्ही जि प सर्कलमधील शिवसेना पदाधिकार्‍यांची तलवाडा फाटा येथील गोविंद जोशी यांच्या निवासस्थानी बैठक घेणार आहेत. तदनंतर सायंकाळी 6

11 महिन्यानंतरही पैशाऐवजी, तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हातावर दिल्या तुरी

Image
11 महिन्यानंतर केंद्रप्रमुख बागवान, सहकेंद्रप्रमुख शिंदे यांनी गेवराईतील तुर उत्पादक शेतकऱ्यांच्या हातावर ठेवल्या तूरी ==================== नाफेडला तूर घातलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात हाल ==================== गेवराई ( दिनकर शिंदे ) गेल्यावर्षी तुरीला शासनाने चांगला हमीभाव दिल्याने गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेडला फेब्रुवारी मार्च 2018 मध्ये तुर विक्री केली होती परंतु तब्बल 11 महिन्यानंतर या तुरीचे पैसे देण्याऐवजी केंद्रप्रमुख बागवान सह केंद्रप्रमुख रामेश्वर शिंदे आणि ऑपरेटर भामरे यांनी शेतकऱ्यांच्या हातावर अखेर तूरी ठेवल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांमधून या कर्मचाऱ्यांसह  प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.          याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन वर्षापूर्वी गेवराई तालुक्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने, गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन शेतकऱयांकडून घेण्यात आले. शेतकऱ्यांचे कष्ट आणि निसर्गाने दिलेल्या साथीमुळे तूर उत्पादनही चांगले झाले. त्यातच शासनाने तुरीच्या पिकाला 5500  रुपयाचा प्रति क्विंटल चांगला हमीभाव जाहीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आ

गेवराईत 45 लाखांचा गुटखा पकडला ; ट्रक घेतली पोलिसांनी ताब्यात

Image
गेवराई ( दिनकर शिंदे  ) गेवराई -गढी दरम्यान पोलिसांच्या विशेष पथकाने एका ट्रकमध्ये 45 लाखांचा गुटखा पकडला आहे. हा ट्रक धाराशीवहून जालन्याकडे जात होता. वाटेत एका हॉटेलजवळ तो उभा असताना पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.  शुक्रवारी रात्री अडीच वाजता गेवराई गढी रोड वरील ट्रक क्रमांक एम.एच 18 एए 6845 हा गढी जवळील राजस्थानी हॉटेल समोर थाबंल्याची माहिती पोलीस अधिक्षक बीड यांच्या पथकाला मिळाली. त्या माहितीवरून लगेचच या पथकाने पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांच्या नेतृत्वाखाली गेवराईच्या दिशेने धाव घेतली आणि ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून एकनाथ दत्तु परदेशी (संजयनगर ता. श्रीरामपुर जि, नगर) आणि शेख जब्बार शेख (मुसा रा, लोहगाव पुणे) अशी त्यांची नावे आहेत.

25 फब्रुवारीला इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा राज्यव्यापी बंद

 गेवराई ( दिनकर शिंदे ) ------  इन्डिपेन्डट इंग्लिश स्कुल्स असोसिएशन ( IESA ) संघटना गेल्या सहा वर्षापासून इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे विविध प्रश्न सोडवून घेण्यासाठी काम करीत आहे. याच मगण्यांसाठी दि 25 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱयांनी दिली आहे.          इंग्रजी शाळांच्या समस्यांबद्दल अनेक वेळा शासन दरबारी वेगवेगळ्या माध्यमांतून निवेदने यापूर्वी देण्यात आली असतांना देखील, शासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही.  त्यामुळे  ईसा संघटना इंग्रजी शाळांचा राज्यव्यापी एक दिवशीय शाळाबंद आंदोलन करणार आहे. दि .२५ फेब्रुवारी वार सोमवार रोजी ईसा संघटनेच्या सभासद असलेल्या राज्यातील ५ हजार शाळा या आंदोलनात सहभागी होणार आहेत . राज्याप्रमाणे आपल्या बीड जिल्हयातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा या दिवशी बंद ठेवून आपला सहभाग नोंदविणार आहेत . जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईसा संघटनेच्या राज्यव्यापी शाळा बंदची आपण दखल घेऊन संघटनेच्या खालील मागण्या शासनदरबारी मांडून तात्काळ कार्यवाही होण्यासाठी मदत करावी .प्रमुख मागण्या 1 नोव्हेंब

रामपुरीच्या अमरसिंह मस्के यांची घोडी सर्वात खुबसूरत ; 21 हजाराचे प्रथम पारितोषिक

Image
रामपुरीच्या अमरसिंह मस्के यांची घोडी सर्वात खुबसूरत अश्वस्पर्धेत 21 हजाराचे प्रथम पारितोषिक पटकावले ==================== गेवराई ( दिनकर शिंदे )  शिवजयंती निमीत्त दि 19 रोजी तीर्थपुरी येथे अश्वस्पर्धा घेण्यात आल्या. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत गेवराई तालुक्यातील रामपूर येथील अमरसिंह अंकुशराव मस्के यांची घोडी सर्वात खूबसूरत ठरली असून या अश्वाने खूबसुरती मध्ये 21 हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.         शिवजयंतीनिमित्त तीर्थपुरी येते आयोजित  या अश्व स्पर्धेत आपल्या अश्वांसह अश्वधारकांनी मोठा सहभाग नोंदवला. आ. राजेश टोपे यांच्या हस्ते  शिवप्रतिमेचे पुजन करुन या स्पर्धाना सुरुवात झाली. यावेळी सागरचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, सरपंच शैलेंद्र पवार, संयोजक चंद्रकांत पवार व सुदाम मापारे तसेच मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या यातील खूबसूरती या गटातील प्रथम क्रमांकाचे 21 हजाराचे बक्षीस गेवराई तालुक्यातील रामपूरी येथील अमरसिंह अंकुशराव म्हस्के यांच्या अश्वाला देण्यात आले. दितीय बक्षीस 11 हजार रुपये गोविंद फनसे यांच्या अश्वाला तर तृतीय बक्षीस साहेब

पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत जमियत उलेमा , मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध

Image
बीड दि.18 [ दिनकर शिंदे ]  ----- शहीद जवानांना आदरांजली अर्पण ============================= जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या  जवानांना जमियत उलेमा ए हिंद बीडच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. सोमवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून रॅली काढून पाकिस्तान मुर्दाबाद,  हिंदुस्थान जिंदाबाद , वीर जवान अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. या रॅलीमध्ये मुफ्ती,  मौलाना यांच्यासह राजकीय पदाधिकारी , कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड येथील जमियत उलेमा ए हिंद शाखेच्या वतीने सोमवारी मल्टीपर्पज  मैदान येथून  निषेध रॅली काढण्यात आली. पुलवामा येथील दहशतवादी  हल्ल्याचा  तीव्र शब्दात  निषेध नोंदवण्यात आला.  हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन  रस्त्यावर उतरलेल्या जमियत उलेमा हिंदच्या पदाधिकाऱ्यांसह मुस्लिम युवक आणि नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबाद , हिंदुस्तान जिंदाबाद , वीर जवान अमर रहे अशा घोषणा दिल्या. त्यानंतर उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन बाळगून भारतीय जवानांना आदरांजली अर्पण केली. यावेळी मुफ्ती अतिकुर रहेमान सहा

महापुरुषांना जाती धर्माच्या बंधनात बांधु नका -- गणेश सावंत

Image
गेवराई [ दिनकर शिंदे ] ------- जातेगावात शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी =============================== तरुणांनी समाजहिताच्या कार्यात गटतट विसरुन एकञ यावे. राजकारणापेक्षा समाजकारणात तरुणांनी झोकुन देऊन कार्य करत राहील्यास, गावाच्या विकासाला चालना मिऴेल. शिवजयंती निमीत्त व्याख्यान व समाजहिताचे उपक्रम ठेवल्याने उद्याच्या पिढीला चांगले संस्कार लागतील असे प्रतिपादन शिवव्याख्याते गणेश सावंत यांनी जातेगाव येथे आयोजित शिवजयंती उत्सव प्रसंगी केले आहे.          गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमीत्त दि 18  रोजी नृत्य स्पर्धा तसेच, दि 19 रोजी शिवप्रतीमा पुजन व गावातुन बालशिवाजी महाराजांची घोड्यावर टाऴमृदंगाच्या व ढोलताशाच्या गजरात मिरवनुक काढण्यात आली.  दुपारी यमाई मंदीरात बालकिर्तनकार सोनाली सागडे हिचे शिवकिर्तन संपन्न झाले.  शिवजयंती अध्यक्ष गोपाल  चव्हाण, उपाध्यक्ष बाऴासाहेब चव्हाण, सचिव कालीदास काकडे,  रामेश्वर चव्हाण, भरत दादा चव्हाण, सुनिल मिसाऴ, करण यमगर, अण्णा चव्हाण, आशिष कुलकर्णी, यांनी डि जे व वर्गणी मुक्त आदर्श जयंती साजरी करण्याचा संकल्प करत सामाजिक

नरेंद्र मोदींचा काँग्रेसमुक्तचा तर आ लक्ष्मणराव पवारांचा पंडितमुक्तचा नारा फसला

Image
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसमुक्त भारतचा तर आ लक्ष्मणराव पवारांचा पंडितमुक्त गेवराईचा नारा फसला ==================== युती - आघाडी जाहीर झाल्यावर होणार "सावळा गोंधळ" ====================     ●[ राजकीय आखाडा / दिनकर शिंदे, गेवराई ]● ====================  भाजपानेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेला काँग्रेसमुक्त भारतचा नारा आणि गेवराईतील भाजप आमदार लक्ष्मणराव पवार यांनी पंडितमुक्त गेवराई चा दिलेला नारा हे दोन्हीही फोल ठरले आहेत. कारण या नाऱ्या नंतर पाच राज्यात भाजपची सत्ता जाऊन कॉंग्रेसने सत्ता स्थापन केली तर गेवराईत ग्रामपंचायतीसह, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये पंडितांची सत्ता आली त्यामुळे दोन्ही नारे फोल ठरल्याने देश आणि तालुकास्तरावरील राजकीय स्थिती यापुढे बदलताना दिसेल हे निश्चित.             देशात दोन खासदार असलेला भाजपा हा पक्ष 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक जागी खासदार विजय झालेला पक्ष ठरला. त्यानंतर मात्र नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिला आणि प्रत्येक निवडणुकी

"समय के साथ चलो"चा 57 वर्षाच्या रशीद भाईंकडून संदेश

Image
प्रदूषण मुक्तीसाठी गेवराईत इलेक्ट्रॉनिक रिक्षा सुरू करून "समय के साथ चलो"चा 57 वर्षाच्या रशीद भाईंकडून संदेश ====================                 दखल         ---------------------             दिनकर शिंदे ====================  कारखाने, विविध उद्योगधंदे, भरमसाठ रस्त्यावर वाहणारी वाहने यांच्या सुटणाऱ्या धुरामुळे  प्रचंड प्रमाणात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी, त्याचबरोबर पेट्रोल-डिझेलच्या अतिवापरामुळे वाढत असलेल्या दरावर आळा घालण्यासाठी आता इलेक्ट्रॉनिक ऑटो रिक्षा वापरावा आणि आर्थिक बचतही करावी, असा "समय के साथ चलो" चा संदेश गेवराईच्या शेख रशीद शेख उमर  या 57 वर्षाच्या रिक्षाचालकाने ऑटो रिक्षाधारक नवयुवकांना दिला आहे.            सध्या पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या टु व्हीलर, थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांची बेसुमार संख्या झाली असून, रहिवासी क्षेत्रातूनही यांची मोठ्या प्रमाणात धूर सोडत रहदारी सुरू झाली आहे. यामुळे हवेचे प्रदूषण होऊन स्वतःच्या व इतरांच्या  आरोग्यास, परिणामी जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या पेट्रोल, डिझे

विमला विद्यालयात १०वी विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा कार्यक्रम संपन्न

गेवराई ( दिनकर शिंदे ) येथील विमला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा कार्यक्रम घेण्यात आला.      कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव अनुराग अट्टल तर प्रमुख पाहुणे म्हणून विमला विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका वंदना हिरे या होत्या. शाळेचे मुख्याध्यापक कैलास जोगदंड, वर्गशिक्षक कालीदास घोडके,   प्रा.सूरज कुलकर्णी हे व्यासपीठावर उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या सुरुवात विद्यार्थीनींच्या स्वागतगीताने  करण्यात आली. उपस्थितांचे व सर्व शिक्षकांचे गुलाबपुष्प देवुन स्वागत करण्यात आले. इ.१० वी च्या मुलांचे स्वागत इ.९ वी च्या मुलांनी केले. या प्रसंगी  मान्यवरांनी मूलांना परिक्षेसाठी शूभेच्छा देत, भावी जीवनासाठी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी  विद्यार्थ्यानी आपली मनोगते व्यक्त करत, शाळा व शिक्षकांविषयी ऋण व्यक्त केले.  कार्यक्रमाचे प्रास्तविक सूधाकर ससाणे,  सुत्रसंचलन याज्ञिकी कुलकर्णी व आरती परळकर तर आभार कांचन नाईकवाडे हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  नरेंद्र कुलकर्णी, नितिन कुलथे, संजय खेडकर, सुनिल जिरेवार, माणिक गरड, सुनिता घुगे, करुणा जवंजाळ, द

संतोष भाले यांना म फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Image
 गेवराई दि १८ ( दिनकर शिंदे ) तालुक्यातील राजपिंपरी येथील जि प प्राथमिक शाळेतील शिक्षक  संतोष सिताराम भाले यांना यंदाचा इब्टा संघटनेचा महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे .       इंडियन बहुजन टीचर असो. ( इब्टा ) या शिक्षक संघटनेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केल्या बद्दल भाले संतोष यांना म फुले आदर्श शिक्षक पुरस्कार शनिवार दि २३ फेब्रु २०१९ रोजी दु २ वा आ जयदत्त क्षीरसागर यांचा हस्ते व माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड येथील सामाजिक न्याय भवन येथे दिला जाणार आहे. गेली २५ वर्षे भाले यांनी रुई रांजणी, भाटआंतरवाली, राजपिंप्री येथे शिक्षक म्हणून सेवा करीत अनेक उपक्रम राबविले आहेत. समाज सहभागातून निधी उपलब्ध करून शाळा डिजिटल करणे, ऊसतोड शिबिर सुरु न करता 65 विद्यार्थी पालकांसोबत जाण्यापासून रोखले, शाळा सिध्दी मध्ये A ग्रेड मध्ये शाळा आणण्यासाठी प्रयत्न, स्वतःच्या मुलीचा वाढदिवस घरी न करता, तो साजरा करताना शाळेतील सर्व 250 विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले, शाळेतील विद्यार्थ्यांना अवांतर वाचन गोडी वा

चांगले कार्य केल्याशिवाय , चांगला माणूस ही पदवी मिळत नाही -- संतोष गर्जे

Image
गेवराई [ दिनकर शिंदे ] ------- श्री संत भगवानबाबा विद्यालयात दहावीतील विद्यार्थ्यांना निरोप ------------------------ आयुष्यात शिक्षण घेऊन अनेक पदवी मिळवता येतील परंतु चांगला माणूस म्हणून पदवी मिळवायची असेल तर त्यासाठी निश्चितपणे चांगले कार्य करावे लागते. कमी गुण मिळाले म्हणून खचून न जाता आयुष्याच्या परीक्षेत गुणात्मक जीवन जगू या उद्देशाने काम करा, असा मौलिक सल्ला सहारा अनाथालयचे संचालक संतोष गर्जे यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव या शाळेत दि.१८ रोजी दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला, त्याप्रसंगी गर्जे बोलत होते.       या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजन करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहारा अनाथालय गेवराईचे संस्थापक अध्यक्ष संतोष गर्जे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच तात्याराम सुळ, माजी सरपंच जनार्दन चितळकर, सखाराम मुगुटराव, मधुकर मुगुटराव, जि.प.के प्रा. शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक बापुराव घुले, बडे दादा,

शिवभक्तांनो घरावर भगवा झेंडा लावून प्रत्येकात शिवविचार रुजवा -- बदामराव पंडित

Image
==================== शिवजयंती निमित्त बंगल्यावर फडकवला भगवा झेंडा ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. सरदारांना शेतकऱ्यांच्या गवताच्या पात्याला धक्का न लागू देण्याचे आदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपल्या घरावर भगवे ध्वज उभारून साजरी करा आणि प्रत्येकाच्या मनात शिवविचार रुजवा असे आवाहन माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी शिवभक्तांना केले आहे.               छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवजयंती पूर्वदिनी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी आपल्या बंगल्यावर भगवा ध्वज उभारून शिव प्रतिमेस अभिवादन केले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अमोल करंडे, जेष्टनेते गहिनीनाथ ढाकणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, उपजिल्हाप्रमुख शेख एजाज, तालुका उपप्रमुख दिनकर शिंदे, शाहिन पठाण, सुलेमान पठाण, आबा उबाळे, सरपंच सुरेश नागरे, जालिंदर कामटे, सुनील म्हेत्रे, शेख सादेक, राऊत, नावडे, पापा चव्हाण, गंगाधर गोरडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंग

शिवसेना किसान आणि जवानांच्या पाठीशी -- बदामराव पंडित

Image
शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अर्धमसल्याच्या असंख्य पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश ==================== शिवसेना किसान आणि जवानांच्या पाठीशी -- बदामराव पंडित ================= गेवराई ( प्रतिनिधी ) जम्मू कश्मीर मधील पुलवामा येथे पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अर्धमसला येथील असंख्य युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित यांनी जवान आणि किसान यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादन केले आहे.                 गढी जिल्हा परिषद सर्कल मधील अर्धमसला येथील सरपंच राधाबाई विठ्ठल भालशंकर, ऍड सिंधुताई संजयकुमार चौधरी, विक्रम राऊत, अंगद राऊत, उद्धव पोवळे, अशोक धापसे, उद्धव धापसे, संदीप माटे, अभिमन्यू काळे, राम कादे, प्रल्हाद राऊत, अशोक राऊत, गोरख काळे, अनिल काळे, रमेश उघडे, अंगद मैंद, एकनाथ धापसे, रावसाहेब धापसे, राजाभाऊ पिंपळे, किरण काळे, आश्रुबा भालशंकर आदींसह असंख्य भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. सर्वांचे माजी र

जिजाऊ ब्रीगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी सौ.अनिता नितीन भोसले

Image
जिजाऊ ब्रीगेडच्या बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी सौ.अनिता नितीन भोसले यांची बिनविरोध निवड ==================== बीड ( प्रतिनिधी )      मराठा सेवा संघ व इतर 33 कक्षाच्या बैठकीचे आयोजन प्रजासत्ताक दिनी शासकीय विश्रामगृह बीड येथे मराठा सेवा संघाचे जिल्हाअध्यक्ष अशोकजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याच बैठकीत मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रीगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या,क्रांती मोर्च्यात धडाडीने काम करणाऱ्या सौ.अनिता भोसले यांच्या कार्याची दखल घेऊन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकजी ठाकरे साहेब व जिजाऊ ब्रीगेडच्या जिल्हाध्यक्ष सौ.मोहिनीताई डांबे यांनी त्यांची जिजाऊ ब्रीगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड केली आहे.       या बैठकीला मराठा सेवा संघाचे जिल्हाकार्याध्यक्ष शिवश्री ज.रा.शिंदे,जिल्हा सचिव धनंजय शेंडगे,जिल्हा प्रवक्ता बापूसाहेब शिंदे,जिल्हा संघटक प्रा.पंजाबराव येडे,गाडगेबाबा समाजप्रबोधन कक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष डोंगरे,शिंदे,विलास शिंदे नवनाथ वाघ योगेश ठोसर,यांच्या सह अनेक

जालिंदर ठवरे यांना इबटा चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Image
गेवराई (प्रतिनिधी ) धोंडराई येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये कार्यरत असलेले जालिंदर ठवरे यांना बीड जिल्ह्यातील इबटा शिक्षक संघटनेच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला. शनिवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी या पुरस्काराचे वितरण भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे इंडियन बहुजन टीचर्स असोशियन संघटनेच्यावतीने प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे जि. प. मा. शाळा धोंडराई शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर तसेच जाधव व्ही एम , माळी सर, काळे सर, खरात सर, पांढरे सर, सिडाम सर, संतोष कोठेकर, धर्मराज करपे, बरकते सर, प्रकाश खरात, गावडे सर, शेंडगे सर, दीपक गायकवाड आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

बीड लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवणार - ऍड गणेश कोल्हे

Image
गेवराई [ दिनकर शिंदे ] ------ बीड लोकसभा मतदारसंघासाठी ऍड गणेश कोल्हे हे महाराष्ट्र विकास आघाडी कडून उमेदवार राहणार ? ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र विकास आघाडी राज्यामध्ये लोकसभेची निवडणुकीसाठी उमेदवार देणार असून बीड लोकसभा मतदार संघासाठी गेवराई येथील एडवोकेट गणेश कोल्हे हे उमेदवार असण्याची शक्यता पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली आहे.            महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने झालेल्या पत्रकार परिषदेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष - बसंवतअप्पा उबाळे , पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस - डॉ . सुभाष माने , पक्षाचे राष्ट्रीय वक्ते - डॉ . सुरेश वाघमारे , पक्षाचे - राज्याचे सरचिटणीस अॅड . अनिरुध्द येचाळे , युवा महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रांत अध्यक्ष - संतोष कोल्हे , ऍड गणेश कोल्हे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपाध्यक्ष बसवंतप्पा उबाळे म्हणाले की राज्यामध्ये ठराविक घरांमध्येच एकमेकांशी नातेगोत्याचे संबंध असून सत्ताही त्यांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे सामान्य माणसावर अन्याय होतो. चांगली काम करणारी माणसे राजकारणातून बाहेर जात आहेत.

आतेरेकी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गेवराई कडकडीत बंद

Image
गेवराई ( प्रतिनिधी ) जम्मू काश्मीर मधील पुलवाम येथे भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात शोककळा पसरली असून, या हल्ल्याच्या निषेधार्थ गेवराई शहर स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.         जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी  रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. या दुर्घटनेच्या निषेधार्थ गेवराई शहरातील व्यापारी, सर्वपक्षीय संघटना व नागरीकांनी निषेध रँली काढुन शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करणयात आली. दि 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, शास्त्री चौक, मेन रोड मार्ग निषेध रँली काढण्यात आली. मोंढा नाका, संतोष नगर येथे पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद घोषणा देत पाकच्या पंतप्रधानाच्या  पुतळ्यावर चपलाचा हार घालुन पुतळा दहन करण्यात आला. यावेळी गेवराई शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या दुकान कडकडीत बंद ठेवत शहिद जवानांना श्रद्धांंजली अर्पण केली. यावेळी शहरातील सर्व समाजबांधवांसह व्यापारी, डॉक

भगवा अन बाण बघून कामाला लागायचं; एकजूट हीच आपली ताकद - खा. खैरे

Image
शिवसेनेसाठी तळमळीने काम करा; दोन्ही जिल्हाप्रमुखांचे काम चांगले - संपर्कप्रमुख जाधव बीड  ( प्रतिनिधी ) शिवसेना नेते, मराठवाडा संपर्कप्रमुख, खा चंद्रकांत खैरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना नवनियुक्त बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव साहेब यांच्या नेतृत्वात बीड येथे जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांना अभिप्रेत असणारा पक्ष आपल्याला उभा करायचा आहे . त्यासाठी पदाधिकाऱ्यांचे काम प्रामाणिक असले पाहिजे. निवडणुका समोर आहेत. पक्षासाठी काम करा. एकमेकांच्या तक्रारी नको. कामचुकारपणा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात बीडचे संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी पदाधिकाऱ्यांच्या बजावले. त्यांची नियुक्ती झाल्यानंतर बीडमध्ये काल ते पहिल्यांदाच आले होते. मराठवाडा संपर्कप्रमुख तथा शिवसेना नेते खा चंद्रकांत खैरे यांनी यावेळी भगवा अन बाण बघून कामाला लागायचं,  एकजूट हीच आपली ताकद आहे असे सांगत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.      आजी - माजी पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी झाली. यावेळी मराठवाडा संपर्कप्रमुख तथा शिवस

मराठा सेवा संघाचे समाजभूषण पुरस्कार जाहीर

Image
    बीड ( प्रतिनिधी )  बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी मराठा सेवा संघाच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.        यावर्षी देखील अनेक मान्यवर व्यक्तीना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.प्रशासकीय क्षेत्रातील मराठा समाजभूषण पुरस्कार यावर्षी पाटोदा तहसीलचे नायब तहसिलदार मा.गणेशजी जाधव  यांना तर,सामाजिक क्षेत्रातील मराठा समाजभूषण पुरस्कार मराठा क्रांती मोर्च्याचे लढवय्ये शिलेदार  अशोकभाऊ हिंगे यांना व उद्योग क्षेत्रातील आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणारे राजकमल कन्ट्रक्शन चे संस्थापक राजेंद्रजी आप्पा लाटे यांना तर साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल जिजाउरत्न पुरस्कार बीडच्या आद्य मराठी स्त्री गझलकारा प्रा.सौ.सुहासिनी विवेकरंजन देशमुख यांना जाहीर करण्यात आले आहेत.      हे सर्व पुरस्कार 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मानव्यरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.         या कार्यक्रमात जेष्ठ विचारवंत प्रा.गंगाधर बनबरें यांचे व्याख्य

जातेगावात येथे गणेश सावंत यांचे व्याखान तर सोनाली सागडेच्या शिवकिर्तनाचे आयोजन

Image
==================== डिजे व वर्गणी मुक्त शिवजयंती   होणार साजरी ==================== गेवराई  ( प्रतिनीधी )     गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. या वर्षी दुष्काऴाचे भान ठेऊन आदर्श राजा शिवछञपती महोत्सव साजरा करण्यात येत आसुन न्रत्य, स्पर्धा, शोभायाञा आणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून डिजे व वर्गणी मुक्त शिवजयंती साजरी होणार आहे.       तालुक्यातील जातेगाव येथे सार्वजनिक शिवजयंतीनिमीत्त संयोजन समितीच्या वतीने दि 18  फेब्रुवारी रोजी सांस्क्रतीक कार्यक्रम दि 19 रोजी सकाऴी 10 वा शिवप्रतिमा पुजन व भव्य शोभा याञा मिरवनुक काढण्यात येणार आहे. दुपारी 1 वा यमाई मंदीर येथे ह. भ. प. कु.सोनाली सागडे या सात वर्षीय बाल किर्तनकाराचे शिवकिर्तन व तदनंतर उपस्थितांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. राञी 8 वाजटा बाजारस्थऴ येथे प्रख्यात शिवव्याख्याते गणेश सावंत यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.  डिजे व वर्गणी मुक्त शिवजयंती साजरी करण्यात येत असुन जयंतीतुन गोरगरीबांना धान्य संकलन  उपक्रम, महापुरुष ग्रंथालय प्रतिमा व व

शिक्षक व शाळांची ही कोणती आदर्श शिक्षण पद्धती ?

Image
हात आणि मानदुखेपर्यंत खरडपट्टीचा गृहपाठ देणाऱ्या शिक्षक व शाळांची ही कोणती आदर्श शिक्षण पद्धती ? =================== 12 ते 15 पान लिखाणकामामुळे विद्यार्थी निरुत्साही =============             ● [ दिनकर शिंदे / गेवराई ] ● निसर्गाच्या सानिध्यात, दऱ्याखोऱ्यात हसत, खेळत चिमुकल्यांनी शिक्षण घ्यावे यासाठी रवींद्रनाथ टॅगोर,  शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. खऱ्या अर्थाने विद्यार्थी सर्व गुण संपन्न करायचा असेल तर त्याच्या मनाचा विचार करून त्याला शिकवा, असा संदेश त्यांनी दिला. मात्र आज याचा विसर पडलेल्या जिल्ह्यातील तथाकथित आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत मात्र विद्यार्थ्यांना खरडपट्टी करणाऱ्या गृहपाठाच्या शिक्षणपद्धतीने पार निरुत्साही करण्याचा प्रयत्न चालवला आहे. यामुळे अनेक विद्यार्थी हात आणि मानेसह मानसिकदृष्ट्या थकल्याने, गृहपाठ करतानाच डोळे झाकून आहे त्याच जागेवर पडत आहेत. यामुळे ही कोणती आदर्श शिक्षण पद्धती असा यक्ष प्रश्न सामान्य पालकांना पडला आहे.           विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, उत्साह आणि आनंदाने त्यांनी प्रत्येक विषयाचा अभ्यास करावा.

गेवराईत संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त रुग्णांना फळ वाटप

Image
गेवराई (प्रतिनिधी )    संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त गेवराई येथे बंजारा क्रांती दलाच्या वतीने सामाजिक भान जोपासत बंजारा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकारातून येथील उपजिल्हा रुग्णालयात दि.१५ शुक्रवार रोजी रुग्णांना फळ वाटप करुन संत सद्गुरु सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.     यावेळी बंजारा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण,ज्येष्ठ नेते किसन राठोड, डॉ.राजेश शिंदे,डाॅ.आंधळे,बबनराव राठोड,भीमराव चव्हाण, काशिनाथ राठोड, शिवाजीराव राठोड ,बन्सी पवार, राम पवार, आपासाहेब चव्हाण, लहूराव राठोड, बबन राठोड, बंडू राठोड, बाबुराव राठोड, कृष्णा ढाकणे, संतोष राठोड, वडते मामा ,संजय चव्हाण, संजय राठोड, आकाश जाधव, एकनाथ चव्हाण, सुधिर राठोड, श्याम चव्हाण, अमोल राठोड, छगनराव पवार यांच्या सह बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर शेवटी अतेरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना बंजारा क्रांती दलाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

गेवराईतील वाळू माफियांना प्रशासनाचे अभय आहे का? -- राहुल चाळक

Image
गेवराई, दि. १५  __ अवैद्य वाळू उपसा प्रकरणी सध्या गेवराई मध्ये मनाई आदेश असताना देखील सर्रासपणे गंगावाडी आणि राजापूर या गावातून अवैध वाळू वाहतूक होत आहे. वाळू माफियांना प्रशासनाचे अभय आहे का असा प्रश्न आता गावकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.        गेवराई तालुक्यातील मौजे राजापूर व गंगावाडी या गावातील नागरिकांनी छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी यांच्याकडे मदतीची हाक दिली होती. गावातील व्यक्तींनी अनेक वेळा गेवराई येथील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, गेवराई व तलवाडा पोलीस स्टेशन यांकडे वाळू माफियांची सतत तक्रार करूनही प्रशासन यांची पाठराखण करत आहे. वाळू माफिया हे टिप्परने बीड आणि औरंगाबाद या ठिकाणी विक्री करत आहेत. हीच गोष्ट लक्षात घेता आज छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेवराईचे तहसिलदार जोशी यांना निवेदन दिले आहे. निवेदनावर छावा शे.आ.जिल्हाध्यक्ष राहुल चाळक, तालुकाध्यक्ष दिलीप मोटे, शे.आ. तालुकाध्यक्ष मुक्ताराम मोटे, जय राम काळे, बापूसाहेब मुळे, वामन मुळे, उद्धव मुळे आदींच्या सह्या आहेत. लवकरात लवकर राजापूर गंगावाडी या भागातील वाळू माफियांवर आळा घालण्यात यावा अन्य

एकदाचा पाकिस्तानचा सोक्ष मोक्ष लावून टाका -- उद्धव ठाकरे

Image
===================  मुंबई ----  जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील हल्ल्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. आता केंद्र सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले पाहिजे,  एकदाच पाकिस्तानचा सोक्ष मोक्ष लावून टाका, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पुलवामामधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारकडे पाकिस्तानसंदर्भात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली आहे.     या आधी झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचा अभिमान आहे. मात्र तो सर्जिकल स्ट्राइक आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये केला होता. ती लोक आपल्या देशात घुसून घातपात घडवत आहे. जनतेच्या मनात संताप असून जनता सरकारच्या पाठिशी आहे असही ठाकरे यांनी म्हटलं आहे.     दरम्यान नुसत्या घोषणा देऊन किंवा दंड थोपटून काहीही होणार नाही. आता या विषयाचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे. आता पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. गुप्तचर यंत्रणांनी हल्ल्यापूर्वी इशारा दिला होता, मग अधिकारी नेमके काय करत होते असंही उद्धव ठ

हभप दत्ता महाराज गिरी यांचे कीर्तन आणि बदामराव पंडित यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे सप्ताहाची उत्साहात सांगता

Image
साधु संतांच्या कृपेने मनुष्य जिवन सार्थकी लागते - ह.भ.प.दत्ता महाराज गिरी  ---------------------- श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता;हाजारो भाविकांची मांदियाळी  ---------------------- गेवराई: ( प्रतिनिधी )      भगवान श्रीकृष्णाच्या गुणाने काला संपन्न होतो.साधु- संत आणि भगवान श्रीकृष्णाचे चरित्र प्रत्येकाने आचरणात आणले पाहिजे.काल्याचा आनंद तुम्हाला इतरत्र कुठेही मिळणार नाही.म्हणुन ज्ञानयज्ञ मंडपात येवून भगवंताचे सदैव नामस्मरण केले पाहिजे.तसेच जिवनात साधुसंतांची कृपा झाली तर जिवनात कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नाही.आणि खऱ्या अर्थाने मनुष्य जीवन सार्थकी लागते.म्हणुन प्रत्येकाने साधु संतांच्या सानिध्यात राहून त्यांचे आशिर्वाद प्राप्त करुन घ्यावेत असे प्रतिपादन महंत दत्ता महाराज गिरी यांनी श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहात काल्याच्या किर्तन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.     श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव(ता.गेवराई) येथे वै.ब्रम्हनिष्ठ गुरूवर्य महंत ह.भ.प.वामन महाराज गिरी यांच्या ४७ व्या पुण्यतिथी सोहळ्या निमी

संतप्त भारतीयांचे रक्त खवळले ... जम्मू- काश्मीर मध्ये झालेल्या भ्याड हल्यात 42 भारतीय जवान शहीद

Image
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर दशहतवाद्यांकडून आयईडी हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये 42 जवान शहीद झाल्याची माहिती आहे. तर 45 पेक्षा जास्त जवान जखमी असल्याची प्राथमिक माहित देण्यात येत आहे. भयानक स्फोटानंतर सैन्यावर अतिरेक्यांनी गोळीबारही केला. जैश ए मोहम्मदने या हल्लाची जबाबदारी स्वीकारली आहे. गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील गोरिपोरा येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला टार्गेट केले. लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी मार्गावर स्फोट घडवला. यानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर अंदाधूंद गोळीबार केला.  आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवला. आदिल अहमद हा 2016 नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, अशी माहिती आहे. गुरुवारी पुलवामा येथील महामार्गावरुन सीआरपीएफचा ताफा जात होता. या ताफ्यात जवळपास २५ बस होत्या. एकूण अडीच हजार जवानांचा हा ताफा होता, असे स्थानिक वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. जम्मूवरुन श्रीनगरला हा ताफा जात होता.  घटनास्थळी व