गेवराईत संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त रुग्णांना फळ वाटप



गेवराई (प्रतिनिधी )
   संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त गेवराई येथे बंजारा क्रांती दलाच्या वतीने सामाजिक भान जोपासत बंजारा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकारातून येथील उपजिल्हा रुग्णालयात दि.१५ शुक्रवार रोजी रुग्णांना फळ वाटप करुन संत सद्गुरु सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
    यावेळी बंजारा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण,ज्येष्ठ नेते किसन राठोड, डॉ.राजेश शिंदे,डाॅ.आंधळे,बबनराव राठोड,भीमराव चव्हाण, काशिनाथ राठोड, शिवाजीराव राठोड ,बन्सी पवार, राम पवार, आपासाहेब चव्हाण, लहूराव राठोड, बबन राठोड, बंडू राठोड, बाबुराव राठोड, कृष्णा ढाकणे, संतोष राठोड, वडते मामा ,संजय चव्हाण, संजय राठोड, आकाश जाधव, एकनाथ चव्हाण, सुधिर राठोड, श्याम चव्हाण, अमोल राठोड, छगनराव पवार यांच्या सह बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर शेवटी अतेरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना बंजारा क्रांती दलाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....