Posts

Showing posts from June, 2019

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यकारिणी बैठक नाशिक येथे संपन्न

Image
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यकारिणी बैठक नाशिक येथे संपन्न ===================== नाशिक ( प्रतिनिधी ) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक ठरली. संघटनात्मक बांधणी आणि महिला सशक्तीकरण यासाठी नवीन उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत, त्याची सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी मा. ना. रावसाहेब पाटील दानवे, मा. सौ. विजयाताई रहाटकर, मा. श्री. विजय पुराणिक, मा. सौ. माधवीताई नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या वेळी सौ.पुष्पाताई  प्रकाश काळे जि.प.सदस्य व  (संयोजक सिल्लोड- सोयगाव विधान सभा), सौ. रेखाताई कुलकर्णी, सौ. सविताताई कुलकर्णी, सौ. पुनमताई पवार, सौ. मंगलाताई वाहेगांवकर,सौ अनुराधा ताई चव्हाण-सौ.तळेगांवकर ताई  यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ना गिरीश महाजन व आ एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.

Image
ना गिरीश महाजन व आ एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत जळगाव भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. ======================== जळगाव ( प्रतिनिधी ) भाजपा जिल्हा विस्तृत बैठक दि.२९ जून शनिवार रोजी दु.२:०० वा. ब्राम्हण सभा जळगांव येथे झाली.   सदर बैठक जिल्हा पालकमंत्री मा.ना. गिरीषभाऊ महाजन, मा.मंत्री मा.आ.एकनाथराव खडसे, विभाग संघटन मंत्री मा.अँड.किशोरभाऊ काळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मा. डॉ.संजीव पाटील व महानगराचे अध्यक्ष तथा मा.आ.सुरेश भोळे (राजुमामा) मा.खा. उन्मेषदादा पाटील व मा.खा.रक्षाताई खडसे, मा.आ.तथा प्रदेश चिटणीस मा.आ.स्मिताताई वाघ, मा.आ.चंदुभाई पटेल, मा.आ.हरिभाऊ जावळे, मा.आ.संजयभाऊ सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.       सदर बैठकीला प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष/सरचिटणीस, मंडल सदस्य नोंदणी प्रमुख/सहप्रमुख, जिल्हा आघाडी अध्यक्ष/ सरचिटणीस, विस्तारक, जि.प.व पं. स. सभापती/सदस्य, नगराध्यक्ष/नगरसेवक, शक्तिकेंद्र प्रमुख यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे ,जिल्हा सरचिटणीस पोप
Image
फळबागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या शिवसेना नेते बदामराव पंडित यांची प्रशासनाकडे मागणी ==================== शेतकऱ्यांना बाग न तोडण्याचे केले आवाहन ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) अत्यल्प पावस झाल्याने पडलेल्या दुष्काळात गेवराई मतदारसंघात माणसांना व जनावरांनाही प्यायला पाणी उपलब्ध नाही. अशा स्थितीत गेल्या कित्येक वर्षापासून जगविलेल्या फळबागा जिवंत ठेवणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. अनेकांच्या बागा जळून गेल्या आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ नुकसान झालेल्या फळबागांचा पंचनामा करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यासोबतच कोणत्याही शेतकऱ्यांनी फळबागा तोडू नयेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.              शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी दिनांक 29 जून रोजी गेवराईचे तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्या गेवराई मतदार संघातील पिण्याच्या पाण्याचा  प्रश्न गंभीर असल्याने, आपल्या फळबागा जगवायच्या कशा ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य कर्मचारी 3 जुलैला पाळणार "लक्षवेधी दिन" तर 20 ऑगष्टला "लाक्षणिक संप"

Image
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य कर्मचारी पाळणार 3 जुलैला "लक्षवेधी दिन" तर 20 ऑगष्टला "लाक्षणिक संप" ==================== महाराष्ट्र राज्य जुनी हक्क पेन्शन संघटनाही होणार सहभागी ==================== मुंबई  ( प्रतिनिधी ) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ पेन्शन योजना लागू करावी, निवृत्तीचे वय ६० करावे, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, यांसह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारच्या संथ कारभारामुळे सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी अपूर्ण असल्यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहे. मध्यवर्ती संघटनेच्या दिनांक 16 जून 2019 च्या पदाधिकारी मंडळाच्या सभेत मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली असून बुधवार दिनांक 3 जुलै 2019 रोजी सर्व कार्यालयात भोजनाच्या सुटटीत उग्र निदर्शने करु ‘लक्षवेधी दिन पाळण्याचे ठरविण्यात आले आहे. अंशदायी पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी १९ जानेवारी रोजी अभ्यास समितीची घोषणा केली. परंतु, ही समिती योजनेतील त्रुटींचा विचार करणार आहे. योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी संघटनेने स्पष्
Image
पावसात उभ्या पिकांसह शेत जमिनी वाहून गेल्या  सोयगाव,जंगला आणि कवली शिवारात नुकसान ====================    सोयगाव ( प्रतिनिधी )सोयगावसह परिसरात शुक्रवारी झालेल्या दमदार पावसाने सोयगाव,जंगला, बोहुलखेडा आणि कवली शिवारातील शेतजमिनी उभ्या कोवळ्या पिकांसह वाहून गेल्याने शेतात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.कवली शिवारातील बहुला नदीला आलेल्या पुराचे पाणी कवली शेती शिवारात शिरल्याने गुंताबाई जाधव आणि गजमल हरी पाटील यांचे पिकांसह चक्क शेतच वाहून गेल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे.याप्रकरणी महसूल आणि कृषी विभागांकडून शनिवारी पाहणी करण्यात येणार असल्याचे महसूलच्या सूत्रांनी सांगितले.           सोयगावसह परिसरात शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने शेती क्षेत्रात दाणादाण उडाली असून कपाशी पिके कोवळ्या अंकुरासह शेतीच वाहून गेली असून सोयगाव आणि जंगला शिवारात नाल्याच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतात नाला तयार झाला आहे.भैरवनाथ शिवारातही शेती वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहे.दरम्यान ऐन खरिपाच्या हंगामाच्या प्रारंभापासून नैसर्गिक संकांटाची मालिका सोयगाव परिसरात सुरु झ

नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांनी घेतला पोलीस ठाण्याचा पदभार : तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्वागत

Image
नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांनी घेतला पोलीस ठाण्याचा पदभार : तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्वागत ======================== सोयगाव ( प्रतिनिधी ) सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माधव गुंडीले यांच्या जागी नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांची सोयगावला बदली झाली शुक्रवारी  नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात तातडीने हजर होवून पदभार घेतला. शुक्रवारी पो. नि. सीताराम म्हेत्रे यांचा सोयगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष भरत पगारे, राजू दुतोंडे, विजय पगारे, सुनील काळे, पूनम परदेशी,यादवकुमार शिंदे ,योगेश बोखारे,  विजय काळे, गुलाब शेख, शेख सुलेमान, फोटो ग्राफर विवेक महाजन व मराठा प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष  विजय काळे, समाधान जाधव, विजय चौधरी , समाधान शिंदे, प्रमोद वाघ, अमोल बोरशे,  यांनी पुष्प बुके देऊन स्वागत केले. यावेळी पत्रकारांच्या अडीअडचणी विषयी चर्चा करण्यात आली. यावेळी पो.नि. सीताराम मेहेत्रे यांनी पत्रकाराबाबत सहकार्याची व  सहानुभतीची ठेवण्याचे आश्वासन दिले.

आता 16 टक्के आरक्षणासाठी एकत्रित लढा उभारू --- गणेश बजगुडे पाटिल

Image
मराठ्यांच्या एकजुटिचा विजय आसुन क्रांतीकारी निर्णयाचे स्वागत  आता 16 टक्के आरक्षणासाठी एकत्रित लढा उभारू --- गणेश बजगुडे पाटिल =================== बीड ( प्रतिनिधी )  गेली 37 वर्ष मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यामागणीसाठी मराठा समाज बांधव लढा देत आहेत. आनेकांनी स्वत: आत्मबलिदान केले, आमच्या सारख्या आनेक तरुनांने कारावास भोगला गुन्हे दाखल झाली परंतु हाती घेतलेली आरक्षणाची लढाई आम्हि कधीहि शांत होवु दिली नाहि. आरक्षणामुळे मराठा समाजातील तरुणांचा विधार्थांचा शिक्षणाकडिल कौल वाढेल व समाज शिक्षीत होईल सुजान होईल व नोकर्यां व उधोगधंदयामधे वाढ होवुन समाजाची प्रगती होईल. आजचा निर्णय हा क्रांतीकारी निर्णय आसुन आम्हि न्यायदेवतेचे जाहिर आभार मानतो व येणार्या काळात 16 टक्के आरक्षण देण्यात यावे यासाठी एकजुटिने लढा आभारु.
Image
शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तात्काळ द्या ; नसतात आंदोलन बदामराव पंडित यांचा विमा कंपनीसह प्रशासनाला इशारा ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघातील गेवराई तालुक्यासह माजलगाव, बीड या तालुक्यातील पिंपळनेर, पेंडगाव आणि तालखेड या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अद्यापही मिळालेले नाहीत. ते पैसे तात्काळ शेतकऱ्यांना द्यावेत नसतात, शिवसेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी विमा कंपनीसह जिल्हा प्रशासनाला दिला आहे.          शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलनासाठी परिचित असलेल्या शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी म्हटले आहे की, गेवराई विधानसभा मतदारसंघात गेवराई महसूल मंडळ, जातेगाव महसूल मंडळ ता.गेवराई , तालखेड महसूल मंडळ ता. माजलगाव या महसूल मंडळात दुष्काळ असुन देखील कापूस, तूर, मुग या पिकाचा विमा मिळाला नाही. तस

सुसंस्कृत घर आणि गावातूनच गुणवंत विद्यार्थी घडतात -- सौ गिरिकाभाभी पंडित

Image
सुसंस्कृत घर आणि गावातूनच गुणवंत विद्यार्थी घडतात        -- सौ गिरिकाभाभी पंडित ==================== कुर्ल्यात गावकऱ्यांच्या उपस्थितीत गुणवंतांचा सत्कार ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) घराची कळा जसे अंगण दाखवते तसेच सुसंस्कृत गावाचे लक्षण हे त्या गावातील गुणवंत विद्यार्थ्यांवर ठरते जे गाव सुसंस्कृत आहेत त्याच गावात गुणवंत विद्यार्थी करतात गेवराई मतदार संघातील प्रत्येक गावात मोठी शैक्षणिक क्रांती होत असून ग्रामीण भागातील मुले आणि मुली उच्चशिक्षित होऊन मोठ्या पदावर जात आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेविका सौ गिरीकाभाभी बदामराव पंडित यांनी व्यक्त केले आहे.            गेवराई मतदार संघातील कुर्ला येथे आयोजित गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. येथील सक्रिय युवा कार्यकर्ते राहुल गुंड व तुषार पाटील यांच्या प्रयत्नाने इयत्ता दहावी व बारावीच्या प्राजक्ता गुंड, वैष्णवी गव्हाणे, साक्षी पाटील, रेवती पाटील, पायल पाटील, ज्ञाणेश्वरी गुंड, सागर कदम, ओंकार सोनार, शुभम गुंड, वैष्णवी गुंड, अनुष्का पाटील, आश्लेषा पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांचा

मराठा प्रतिष्ठान कडून टँकर द्वारे मोफत पाणीपुरवठा...

Image
मराठा प्रतिष्ठान कडून टँकर द्वारे मोफत पाणीपुरवठा... सोयगाव ( प्रतिनिधी )  सोयगाव तालूका दुष्काळी परिस्थितीने होरपळत आहे आणि या मुळे झालेली  बिकट पाण्याची टंचाईला  नागरिक हैराण झाले आहेत अशातच मराठा प्रतिष्ठान एक सामाजिक संस्था या द्वारे जरंडी येथील ग्रामस्थाना टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा केला जात आहे पाण्याची तीव्र टंचाई बघून मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  सोपानदादा पाटील यांनी जरंडीसह इतर गावासाठी सात पाणी टँकर ची व्यवस्था करून दिली आहे  मराठा प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष विजय काळे ,विजय चौधरी ,तालुका अध्यक्ष  सचिव ज्ञानेश्वर वाघ, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धोंडू  युवरे,  यांच्या मार्गदर्शनाखाली उपतालूका अध्यक्ष समाधान जाधव, जरंडी शाखा प्रमुख प्रशांत पाटील, सचिव सचिन महाजन व बापू सोंने  गुणवंत ढमाले, प्रकाश गव्हाडे ,प्रमोद वाघ, किशोर बावस्कर  ,ज्ञानेश्वर गवळी, प्रवीण गव्हाडे ,नानासाहेब जुनघरे ,सुनील ढमाले. गणेश गवळी पिंटू गवळी.  दिवस रात्र परिश्रम घेत आहेत  यात जरंडी ग्रामपंचायत देखील पाण्याचे सहकार्य कारीत आहे अत्यंत बिकट पाणी टंचाईचा काळात  प्रत्यक्ष मराठा प्रतिष्ठानने

288 मतदारसंघाच्या आढाव्यासाठी पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक

Image
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार महाराष्ट्रातील 288 मतदारसंघाचा आढावा ; मुंबईत बोलावली तातडीची बैठक मुंबई  ( प्रतिनिधी )– विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. अशातच आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील 288 विधानसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख आणि उपसंपर्कप्रमुख यांची तातडीने बैठक बोलावली आहे. उद्या शिवसेना भवन येथे दुपारी 12 वाजता ही बैठक सुरु होणार आहे. या बैठकीत विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान शिवसेना पक्षाचा 53 वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात काल साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या वाटाघाटीबद्दल भाष्य केलं. ‘आमचं सगळं ठरलंय. योग्य वेळी जाहीर करू. आता सगळं समसमान पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांकडे पाहून उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच आता यापुढे एका युतीची पुढची गोष्ट असेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.य होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सर्वात मोठा खुलासा केला. आम्ही

पाण्याच्या दुजाभावावर जाब विचारण्यासाठी नागरिक सोयगाव नगर पंचायतीवर.......

Image
सोयगाव शहराच्या प्रभाग चार मध्ये कमी दाबाने तर इतर प्रभागात मात्र जास्तीचा पाणी पुरवठा  दुजाभावावर जाब विचारण्यासाठी नागरिक नगर पंचायतीवर.......        सोयगाव,(प्रतिनिधी ):    शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये हेतुपुरस्कर कमी दाबाने पाण्याचा पुरवठा करण्यात येवून या प्रभागाचाय तुलनेने उर्वरित प्रभागांना पुरेपूर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो असा दुजाभाव का याचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी नागरिकांनी नगर पंचायतीवर धडक मोर्चा काढून लेखी निवेदन दिले.          दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे,कि शहरतील उच्चभ्रू वस्ती असलेल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये संबंधित पाणी पुरवठा कर्मचारी कमी दाबाने केवळ दहा मिनिटे पाण्याचा पुरवठा करत असतो,उर्वरित प्रभागांना मात्र पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येत आहे.त्यामुळे याप्रभागात पिण्याच्या पाण्यासाठी दुजाभाव का असा जाब विचारण्यासाठी नागरिकांनी नगर पंचायतीवर धडक मोर्चा काढून निवेगन दिले आहे.संबंधित पाणी पुरवठा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर दिलीप चौधरी,दिनेश काळे,त्रंबक अप्पा,पुंडलिक पाटील,अमोल मापारी,सचिन देसले,त

वाढत्या गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर विद्या पवार यांनी दिला हा सल्ला

Image
वाढत्या गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निरोगी व पोषणयुक्त आहार गरजेचा... सोयगाव( प्रतिनिधी ) गरोदर पणात वाढत्या   गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गर्भवती महिलेने निरोगी पोषणयुक्त आहात गरजेचा आहे असे वैद्यकीय अधिकारी डॉ  विद्या पवार  कंक्राळा येथील महिला आरोग्य तपासणी शिबिरात सांगितले प्राथमिक आरोग्य केंद्र जरंडी  एकात्मिक बालविकास योजना व संजय शहापुरकर  यांच्या संयुक्त विद्यमाने कंक्राळा येथे महिला व  किशोरवयीन  युवती   यांच्या आरोग्य तपासणी शिबिरात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते  प्रसंगी  बोलतांना डॉ विद्या पवार यांनी सांगितले की मातृत्व प्रत्येक स्त्रीला हवे असते गर्भवती राहिल्यानंतर नियमित आरोग्य तपासणी रक्तदाब  व रक्त तपासणी   करून वेळेवर लसीकरण करावे असे सांगितले या नतर  संजय  शहापुरकर  यानी  सांगितले की कुपोषण चा उगम थांब वन्या साठी गर्भवती  महिला सशक्त असणे गरजेचे आहे  त्या साठी दर महिन्याला मोफत  आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाणार आहे त्या नंतर या महिलाना मोफत औषधे  दिली जाईल या शिबिरात 15 गर्भवती  महिला  व 22 किशोर वयीन मुलीची आरोग्य  तपासणी करण्यात  आली तर  आ

सोयगाव नगर पंचायत,प्रचाराची धुमाळी सुरु, सौ इंगळे व तडवी यांनी हा केला दावा

Image
सोयगाव नगर पंचायत,प्रचाराची धुमाळी सुरु, सौ इंगळे व तडवी या दोघांचाही विजयाचा दावा ======================       सोयगाव, ( प्रतिनिधी )     सोयगाव नगर पंचायतीच्या एका जागेसाठी दि.२३ मतदान होवू घातले असून एका जागेसाठी प्रभाग क्रमांक-१६ साठी दोन उमेदवार रिंगणात आहे.त्यामुळे प्रचाराची रंगत वाढली असल्याने या पोट निवडणुकीत अचानक रंग राजकीय भरला आहे.           नगर पंचायतीच्या एका जागेसाठी भारती इंगळे(शिवसेना)आणि सिकंदर तडवी(अपक्ष)हे दोन उमेदवार रिंगणात असून दोघांनीही विजयाचा दावा केल्याने प्रचाराच्या पहिल्याच दिवशी चुरस वाढली आहे.दरम्यान या एका जागेवर शहराच्या नगराध्यक्ष पदाची धुरा अवलंबून असल्याने एका जागेची लढत प्रतिष्ठेची ठरली आहे.दरम्यान भाजपच्या ताब्यातून नुकतेच शिवसेनेने ऐनवेळी झालेल्या निवड प्रक्रियेतून नगराध्यक्ष पद ताब्यात घेतले असल्याने नगराध्यक्ष पद कायमस्वरूपी ठेवण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून अपक्ष उमेदवार विजयी झाल्यास शहराच्या राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सोयगावला निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे.

वाढदिवसानिमित्त छत्रपती मल्टीस्टेट चेअरमन संतोष भंडारी यांनी लावली झाडे

Image
छत्रपती मल्टिस्टेटचे चेअरमन संतोष भंडारी यांचा वृक्षारोपण करून वाढदिवस उत्साहात साजरा =========================== गेवराई ( प्रतिनिधी ) येथील छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमन युवा उद्योजक संतोष भंडारी यांचा वाढदिवस वृक्षारोपनासह विविध सामाजिक उपक्रमाने गेवराईत उत्साहात साजरा करण्यात आला.                 छत्रपती मल्टीस्टेट च्या माध्यमातून सहकार क्षेत्रात दमदार पाऊल टाकल्यानंतर  राज्यातील अनेक जिल्ह्यात  शाखा स्थापन करून  तरुणांना नोकरी आणि रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या  चेअरमन संतोष भंडारी  यांनी  विविध  उपक्रम राबवून आपली एक वेगळी छाप निर्माण केली आहे  त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग  मोठ्या प्रमाणात  त्यांचा वाढदिवस साजरा करत असतो परंतु यावर्षी दुष्काळाची दाहकता लक्षात घेता,  छत्रपती परिवाराच्या वतीने परीसरात चेअरमन संतोष भंडारी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ आरतीताई भंडारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मुक बधीर शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना संतोष भंडारी म्हणाले की, बेसुमार झाडांची कत्तल केली जात आहे. पाण्याचे पुनर्भरणही व्यवस्थित होत नसल

सोयगावला उन्हाचा फटका,पाउसच नसल्याने कपाशी पिके होरपळली........

Image
सोयगावला उन्हाचा फटका,पाउसच नसल्याने कपाशी पिके होरपळली........ ========================        सोयगाव,ता.१५(बातमीदार):     मृग नक्षत्रातही सोयगाव तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढती झाल्याने आठवडाभरापूर्वी लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकांची कोवळी अंकुर पाण्याआभावी होरपळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.ठिबक सिंचनवर लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकांना पावसाची गरज असतांना ऐन मृगाच्या नक्षत्रात पावसाने दांडी मारल्याने मृग कोरडे जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.           कपाशी लागवडीत असलेल्या सोयगाव तालुक्यात कपाशी पिकांनी बाळसे धरले आहे,परंतु या कोवळ्या अंकुरांना पहिल्या पाण्याची आवशकता असतांना,पावूस कोसळत नसल्याने पिकांची वाढीच्या काळातच स्थिती खराब झाली आहे विहिरींचा पाणीसाठा जेमतेम असल्याने ठिबक सिंचनवर तीन दिवसातून दोनवेळा पाणी भारती करण्याची स्थिती आहे.त्यातच उन्हाची तीव्रता कमी होत नसल्याने पिके चिंताग्रस्त झाली आहे.मृगच्या पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. ...........................................
Image
विद्यार्थ्यांना प्यायला पाणीच नाही तर शाळा भरणार कशा ? गेवराई तालुक्यातील शिक्षक व पालकांसमोर मोठा प्रश्न ==================== टँकरने पाणी द्या, नसता सुट्टी वाढवावी लागेल ==================== गेवराई ( प्रतिनिधी  ) दुष्काळाची गंभीर स्थिती असलेल्या गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात प्यायलाच पाणी नाही. अशा स्थितीत उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून सोमवारी दिनांक  17 जून रोजी सर्व शाळा सुरू होणार आहेत. परंतु  ग्रामीण भागातील बहुतांश शाळेत  प्यायला पाणीच नाही, मग शाळा भरवायची कशी ? असा प्रश्न  शिक्षक  व पालकांसमोर निर्माण झाला आहे.         गेल्या चार वर्षापासून अत्यंत कमी पाऊस झाल्याने गेवराई तालुक्यामध्ये पिण्यास पाणी नसल्याने, दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. सद्या गेवराई तालुक्यातील प्रत्येक गावात शासनाच्या वतीने दररोज जवळपास दोनशे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अनेक गावात टँकरची एकच फेरी होत असल्याने शेकडो नागरिक, महिला रात्रंदिवस या टँकरची वाट पाहत बसलेले असतात. ग्रामीण भागातील बहुतांश शाळांमध्ये तर प्यायला पाणीच उपलब्ध नाही. शालेय परीक्षा संपल्यानंतर सर्व शाळांना उन्ह

गेवराईत विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार ; शहरात चोट्टे करतायत राज्य

Image
गेवराईत विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार शहरातील ग्राहकांचे भवितव्य चोट्यांच्या हातात ==================== पावसाळ्याआधीच अनेक लाईनमन नॉट रीचेब ==================== गेवराई ( प्रतिन) दुष्काळात आणि कडक उन्हाळ्यात घरोघर जाऊन लाईट बिलाची वसुली करणारे लाईनमन, सध्या मात्र पावसाळ्या आधीच गेवराईतून नॉटरिचेबल झाले आहेत. शहरातील लाईट वेळोवेळी खंडित होत असून, अनेक ट्रान्सफार्मर मधील फ्यूज सतत उडत आहेत. यातून विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून शहरातील विद्युत ग्राहकांचे भवितव्य मात्र चोरट्यांच्या हातात गेल्याचे दिसत आहे.             याबाबत अधिक माहिती अशी की, अद्याप पावसाळा सुरूही झाला नाही त्या अगोदरच, गेवराई शहरातील अनेक लाईनमनचे मोबाईल नॉटरिचेबल झाले आहेत. तर काही जणांचे मोबाईल सुरू असले तरी ते ग्राहकांचे कॉल घेत नाहीत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. गेवराई शहरातील अनेक ट्रांसफार्मर मधील फ्युज सतत उडत आहेत. 90 टक्के वसुली असलेल्या भगवान नगर या भागातील ट्रांसफार्मर मधील फ्युज तर नेहमीच उडत आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा वेळी-अवेळी खंडीत होत आहे.

शिवसेना सोशल मीडियावर दादासाहेब खरात, सचिन पंडित व पिंटू काळेंची निवड

Image
शिवसेना गेवराई तालुका सोशल मीडियाच्या उपप्रमुखपदी दादासाहेब खरात व सचिन पंडित ==================== तलवाडा सर्कल प्रमुखपदी पिंटू काळे ==================== गेवराई ( प्रतिनिधी )  शिवसेनेच्या  गेवराई तालुका सोशल मीडिया कार्यकरण्याची नुतन पदाधिकाऱ्यांची दिनांक 3 जून रोजी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या शिफारशीवरून नियुक्ती करण्यात आली आहे. यात सोशल मीडियाच्या तालुका उपप्रमुखपदी दादासाहेब खरात आणि सचिन पंडित या दोघांची  तर सोशल मीडियाच्या तलवाडा सर्कल प्रमुखपदी पिंटू काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.                 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, जिल्हा संपर्क नेते अरविंद जाधव यांच्या आदेशान्वये आणि माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, शिवसेना जिल्हा समन्वयक सभापती युधाजित पंडित यांच्या शिफारशीवरून जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि तालुकाप्रमुख कालिदास नवले यांनी गेवराई तालुका शिवसेना सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त केल्या आहेत. युवानेते रोहित पंडित आणि पं स सभापती अभयसिंह पंडित यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन, सोशल मीडिया तालुका उपप्रमुख

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शरद पवारांनी केली यांची नियुक्ती..

Image
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शेख महेबूब यांची नियुक्ती करून शरद पवार यांनी सामान्य कार्यकर्त्याला दिली संधी : बीड जिल्ह्यातील प्रस्थापित युवानेत्यांना धक्का =========      लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत मोठे फेर बदल करायला सुरुवात केली आहे. याचे संकेत पक्षप्रमुख शरद पवार यांनी नुकतेच दिले होते. युवकांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी युवक अध्यक्ष हे त्यांच्यासाठी, जबाबदारीचे आणि महत्त्वाचे पद असते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील शेख महेबुब या सामान्य मुस्लिम कुटुंबातील चळवळीच्या कार्यकर्त्याला शरद पवार यांनी विराजमान केले आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही धक्का देऊन, एक प्रकारे शरद पवारांनी आपला पुढील राजकीय संदेश देण्याचे काम केले आहे.  एमआयएमचे प्रमुख खा असोद्दीन ओवेसी आणि  बहुजन चळवळीतील नेते प्रकाशराव आंबेडकर यांच्या वंचित आघाडीमुळे राज्यात लोकसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक मानला जाण

देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण करणार....

Image
मराठवाड्यातील आठही खासदार शिवसेना-भाजप युतीचे विजयी करून मुंडे साहेबांचे स्वप्न पुर्ण करणारच             ----- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  मराठवाड्यातील आठही खासदार भाजप-शिवसेना युतीचे निवडून आणणे हे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न याच वेळी आम्ही पूर्ण केले असते, परंतु औरंगाबादचे युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे अवघ्या काही मतांनी पराभूत झाल्याने, 8 पैकी 7 जागेवर युतीचे खासदार विजयी झाले आहेत. परंतु पुढच्या वेळी 8 ही खासदार भाजप-शिवसेना युतीचे निवडून आणून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार. असा ठाम विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  परळी येथील गोपीनाथ गडावर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला आहे. याप्रसंगी कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, बीड जिल्ह्याचे पालक मंत्री पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे यांच्यासह भाजपा खासदार, आमदार तसेच शिवसेना-भाजप चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासाठी राज्याची तिजोरी रिकामी करायला तयार

Image
राज्याची तिजोरी रिकामी झाली तरी चालेल पण मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडणारच -- देवेंद्र फडणवीस ========== परळी ( मराठवाडा )-- मराठवाड्यात गंभीर दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून पाण्याची ही स्थिती गंभीर आहे. आज प्रत्येक गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून जनावरांसाठी ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने छावण्या सुरु करण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या काळात मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी आमचा प्लॅन तयार आहे. नदीजोड प्रकल्पांतर्गत धरणातले पाणी पाइप लाईनद्वारे प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. लवकरच हा प्रकल्प पूर्ण होऊन बीड जिल्ह्यासह मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटणार आहे. यासाठी हजारो कोटी रुपये लागतील. वेळ आल्यास राज्याची तिजोरी रिकामी झाली तरी चालेल पण मराठवाड्याचा पाणीप्रश्न आम्ही सोडणारच, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथील गोपीनाथ गडावरून मराठवाड्यातील जनतेला दिला आहे. परळी येथील गोपीनाथ गडावर केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानसभा अ

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....

Image
पश्चिम महाराष्ट्रात मोठमोठे पाण्याचे धरणं आणि सत्ता देणाऱ्या बीड जिल्ह्यात मात्र पाण्याचे रिकामे टँकर ? ==================== शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर.... ====================          महाराष्ट्राच्या राजकारणात विकास पुरुष शंकरराव चव्हाण यांच्यानंतर सर्वाधिक टिकून कोण असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब. यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श नजरेसमोर ठेऊन आणि त्यांचे मानसपुत्र समजले जाणारे शरद पवार यांनी आज पर्यंत पश्चिम महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशात राजकारण केले. गेल्या तीस ते चाळीस वर्षाच्या राजकीय प्रवासात एक वेळेसही पराभूत न झालेले शरद पवार बारामतीत केलेल्या विकासकामांमुळे राज्यात परिचित आहेत. पश्चिम महाराष्ट्रातला नेता असूनही, त्यांच्याकडे विकासाची दृष्टी असल्याने ते आपल्यासाठी काहीतरी नक्कीच ठोस काम करतील. तसेच शेतकऱ्यांविषयी आणि शेती विषयी जाणीव असल्याने निश्चितपणे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, आणि विशेषतः मराठवाड्यात पाण्यासाठी ते काम करून, येथील शेतीला पुनर्जीवित करून शेतकऱ्यांना धनवान करतील अशी भाबड

शिवसेना नेते बदामराव पंडित यांनी कोणाचे विजयाबद्दल मानले आभार ?

Image
गेवराई मतदारसंघातून प्रीतमताईंना मोठे मताधिक्य देऊन शिवसैनिक व मतदारांनी शब्द पाळला -- बदामराव पंडित   ==================== धोंडराईत जाऊन मानले मतदारांचे आभार =================== गेवराई ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्यात विशेषतः गेवराई तालुक्यात जातीपातीचे राजकारण करण्याचा मोठा प्रयत्न झाला. परंतु त्यांच्या भूलथापांना बळी न पडता, सामाजिक सलोखा कायम ठेवत गेवराई मतदारसंघातील मतदारांनी व शिवसैनिकांनी शब्द पाळून प्रीतमताई मुंडे यांना मोठे माताधिक्य दिले. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी म्हटले आहे.              गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे दि 31 मे रोजी जाऊन शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी मतदारांचे व शिवसैनिकांचे जाहीर आभार मानले आहेत. दरम्यान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून बदामराव पंडित यांनी जयंती निमित्त अभिवादन केले. या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष आजमखान पठाण, शिवसेना तालुकाउपप्रमुख दिनकर शिंदे, राजेंद्र टकले, संभाजीराव खरात, सरपंच अशोक