सुसंस्कृत घर आणि गावातूनच गुणवंत विद्यार्थी घडतात -- सौ गिरिकाभाभी पंडित

सुसंस्कृत घर आणि गावातूनच गुणवंत विद्यार्थी घडतात
       -- सौ गिरिकाभाभी पंडित
====================
कुर्ल्यात गावकऱ्यांच्या उपस्थितीत गुणवंतांचा सत्कार
====================

गेवराई ( प्रतिनिधी ) घराची कळा जसे अंगण दाखवते तसेच सुसंस्कृत गावाचे लक्षण हे त्या गावातील गुणवंत विद्यार्थ्यांवर ठरते जे गाव सुसंस्कृत आहेत त्याच गावात गुणवंत विद्यार्थी करतात गेवराई मतदार संघातील प्रत्येक गावात मोठी शैक्षणिक क्रांती होत असून ग्रामीण भागातील मुले आणि मुली उच्चशिक्षित होऊन मोठ्या पदावर जात आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेविका सौ गिरीकाभाभी बदामराव पंडित यांनी व्यक्त केले आहे.
           गेवराई मतदार संघातील कुर्ला येथे आयोजित गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. येथील सक्रिय युवा कार्यकर्ते राहुल गुंड व तुषार पाटील यांच्या प्रयत्नाने इयत्ता दहावी व बारावीच्या प्राजक्ता गुंड, वैष्णवी गव्हाणे, साक्षी पाटील, रेवती पाटील, पायल पाटील, ज्ञाणेश्वरी गुंड, सागर कदम, ओंकार सोनार, शुभम गुंड, वैष्णवी गुंड, अनुष्का पाटील, आश्लेषा पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेनेच्या वतीने सौ गिरीकाभाभी पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच भगवान यादव, तर माजी सभापती पंढरीनाथ लगड, ऍड धर्मेंद्र भोपळे, शिवसेना महिला आघाडी संघटक ऍड ऊज्वला भोपळे, अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना सौ गिरीकाभाभी  पंडित म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांपासून  ग्रामीण भागातील पालकांनीही मुला मुलींच्या शिक्षणावर अधिक भर दिला आहे. त्यामुळेच आज ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन गेलेले अनेक विद्यार्थी उच्च पदावर पोहचल्याचे दिसत आहे. शिकलेली आई घर पुढे नेई या उक्तीप्रमाणे प्रत्येक पालकांनी मुलींच्या उच्च शिक्षणाकडे लक्ष द्यावे. कारण गुणवंत विद्यार्थी हे सुसंस्कृत घर आणि सुसंस्कृत गावाची ओळख आहे, असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी गावातील असंख्य प्रतिष्ठित नागरिक आणि महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....