Posts

Showing posts from July, 2019

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीला मोर्चा काढण्याचा अधिकार नाही - बदामराव पंडित

Image
उसाचे पैसे कारखान्याकडे दाबून ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याचा अधिकार नाही -- बदामराव पंडित ====================  गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी घाम गाळून कष्टाने पिकवलेल्या उसाचे पेमेंट राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जय भवानी कारखान्याने अद्यापही दिलेले नाही. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या हक्काच्या परतीच्या ठेवी परत केलेल्या नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याचा नैतिक अधिकार नाही. शेतकऱ्यांचे पैसे अडवून त्यांचा खोटा पुळका दाखवत मोर्चा काढणे म्हणजे हे विजयसिंह पंडित यांचे शेतकऱ्यांविषयी पुतनामावशीचे प्रेम असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केला आहे.            शेतकऱ्यांच्या पीक विमा द्या, सोयाबीन, फळबाग आणि कांदा उत्पादकांना पिक विमा नुकसान भरपाई द्या. आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते विजयसिंह पंडित हे दिनांक 29 जुलै रोजी धडक मोर्चा काढत आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते माजी राज्यमंत्री

शिवसेनेच्या बदामराव पंडित यांचा पुन्हा एकदा भाजप आ लक्ष्मण पवारांना धक्का

Image
बदामराव पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आडगाव व गुंजाळाच्या ग्रा पं सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश ==================== पिंपळनेर सर्कलमध्ये आ पवारांना धक्का ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व जि प सभापती युधाजित पंडित यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन पिंपळनेर सर्कल मधील आडगाव व गुंजाळा येथील ग्रामपंचायत सदस्य असंख्य युवकांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून आ लक्ष्मणराव पवार यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.         बीड तालुक्यातील गेवराई मतदार संघात असलेल्या पिंपळनेर सर्कलच्या आडगाव व गुंजाळा येथील ग्रामपंचायत सदस्य बाबूलाल घुगे, शेख चांदभाई, नारायण घुगे यांच्यासह आसाराम घुगे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुहास जायभाय, गोवर्धन घुगे, चिंतामण घुगे, नितीन जायभाय, श्रीमंत घुगे, राजाभाऊ घुगे, तुळशीदास घुगे, दादासाहेब घुगे, रवी जायभाय, महादेव ढाकणे, विष्णू ढाकणे, आकाश ढाकणे, शांतीलाल घुगे आदींसह असंख्य युवकांनी शिवसेना बीड जिल्हा समन्वयक तथा जि प सभापती युधाजित पंडीत यांच

जि.प .शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठा प्रतिष्ठान देणार 13 हजार वह्या-पुस्तके

Image
जि.प .शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठा प्रतिष्ठानची देणार 13 हजार वह्या-पुस्तके == विनोद पाटील यांची राहणार विशेष उपस्थिती == सोयगाव ( प्रतिनिधी )  जरंडी ता.सोयगाव येथे दि 15 जुलै सोमवार रोजी गरजु विद्यार्थ्यांना मोफत वह्या-पुस्तके,कंपास इ.शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मराठा प्रतिष्ठान चे जिल्हा अध्यक्ष विजय काळे यांनी दिली.  १३,००० हजार वह्या-पुस्तके वाटप करण्याचा हा कार्यक्रम तालुक्यातील गरजु विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे मराठा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सोपान दादा गव्हांडे पाटील यांनी आव्हान केले आहे. या कार्यक्रमासाठी विषेश अतिथी म्हणून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी ज्यांनी अमाप कष्ट करून आरक्षण मिळवुन देते असे विनोद भैय्या पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच पोलीस निरीक्षक सिताराम म्हेत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक शकील शेख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी मराठा प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष विजय काळे, ता.अध्यक्ष विजय चौधरी, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर युवरे, खजिनदार आप्पासाहेब वाघ, सचिव सचिन महाजन, प्रसिद्धीप्रमुख स

मुस्लिम बांधवांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही कोणत्याही संकटासमोर सर्वात पुढे मी उभा राहील -- बदामराव पंडित

Image
मुस्लिम बांधवांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही कोणत्याही संकटासमोर सर्वात पुढे मी उभा राहील -- बदामराव पंडित ========================= शेख सिराज यांच्यासह 150 जणांचा शिवसेनेत प्रवेश ========================= गेवराई ( प्रतिनिधी ) शिवसेना हा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. मुस्लिम समाजाला वेगवेगळ्या पदांवर शिवसेनेने नेहमी संधी दिलेली आहे. परंतु काही लोक मुद्दाम भीती निर्माण करण्यासाठी चुकीच्या गोष्टी सांगून आपला उद्देश साध्य करून घेत आहेत. मुस्लिम समाजावर आलेल्या कोणत्याही संकटासमोर सर्वात पुढे मी उभा राहील, मुस्लिम बांधवांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाने मनात कोणतीही भीती न बाळगता शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहावे असे आवाहन व ठाम विश्वास शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त केला आहे.          मादळमोही येथील 65 लक्ष रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी चळवळीचे युवा पदाधिकारी शेख सिराज यांनी आपल्या 150 सहकाऱ्यांसह सहकारी व त्यांच्या कुटुंबीयांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला त्याप

बदामराव पंडितांच्या नेतृत्वाखाली 150 जण करणार शिवसेनेत जाहीर प्रवेश

Image
मादळमोहीतील 65 लक्ष रुपयांच्या कामाचा उद्या बदामराव पंडित यांच्या हस्ते लोकार्पण व शुभारंभ ==================== शेख सिराज यांच्यासह 150 जण शिवसेनेत करणार प्रवेश ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) सामान्य लोकांच्या अडचणी सोडविण्या सोबतच, विकास कामे करण्यावर भर असलेल्या शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते मादळमोहीत 55 लक्ष रुपयांच्या कामाचा शुभारंभ तर 10 लक्ष रुपयांच्या कामाचा लोकार्पण सोहळा उद्या दिनांक 6 जुलै रोजी होणार आहे. यावेळी शेख सिराज यांच्यासह 150 कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जि प सदस्य बाबासाहेब तळेकर यांनी दिली आहे.          लोकसभा निवडणुकीत गेवराई विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीच्या डॉ प्रीतमताई मुंडे यांना 36 हजाराचे मताधिक्‍य मिळाल्यानंतर, शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांची लोकप्रियता अधिकच वाढली असून, दररोज माजी आ पंडित व आ पवारांना सोडचिठ्ठी देऊन असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत. दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता मादळमोही येथील चळवळीतील पदाधिकारी असलेल

पार्श्वभूमीचे संपादक गंमतभाऊ भंडारी याना नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे

Image
बातमी टाकली म्हणून पार्श्वभूमीचे संपादक गंमतभाऊ भंडारी याना  नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे === पाटोदा तहसिल मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन ===== पाटोदा (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील सर्व सामान्य माणसाच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवणारे दैनिक म्हणून पार्श्वभूमी पेपरची ओळख आहे. दैनिक पार्श्वभूमी मध्ये 21 जूनच्या अंकात बीड जिल्ह्यातील वाळु वाहतूक ठेकेदारांन कडुन काही अधिकारी हाप्ते घेतात अशी बातमी दैनिक पार्श्वभूमी मध्ये छापली म्हणून काही अधिकाऱ्यांचे काळे धंदे वरिष्ठ अधिकारी व जनते समोर आल्याने चिडलेल्या अधिकाऱ्यांनी संपादकाचा राग मनात धरुन  दैनिक पार्श्वभूमीचे निर्भिड संपादक गंमत भाऊ भंडारी यांना नोटीस पाठवून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे, वाळु ठेकेदारा कडुन हाप्ते वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांचे सत्य वरिष्ठ अधिकारी व जनते समोर आणले म्हणून वर्तमानपत्राच्या संपादकला सतरा अधिकाऱ्यांनी नोटीस देऊन लोकशाहीचा चौथा आवाज दाबन्याचा प्रयत्न केला आहे. या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा असे निवेदन पाटोदा तहसिलचे नायब तहसिलदार टाकसाहेब यांना शेतकरी नेते राजाभाऊ देशमुख,

सोयगाव परिसरात वीजगुल...२२ गावे अंधारात.....

Image
सोयगाव परिसरात वीजगुल...२२ गावे अंधारात.....      जरंडी,ता.३( प्रतिनिधी );      सोयगावच्या वीजउपकेंद्रातील इनकमिंग रोहित्रात झालेला बिघाड आणि जरंडी वीजउपकेंद्रात झालेला तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही वीजउपकेंद्राला जोडणी करण्यात आलेले तब्बल २२ गावे अंधारात होती.रात्री उशिरा सोयगाव शहरात आलेला वीज पुरवठा पुन्हा बुधवारी पहाटे गुल झाल्याने शहरासह पाच गावांना बुधवारीही वीज विरहित राहावे लागले.        १३२ के.व्ही वीज केंद्रातून पुरवठा होणार्या इनकमिंग रोहित्रात अचानक बिघाड झाल्याने सोयगाव शहर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अंधारात असतांना अचानक जरंडी फिडरमध्ये बिघाड झाल्याने जरंडी परीसरही अंधारात बुडाल्याने सोयगाव परिसरातील तब्बल २२ गावांना २० तासांपासून विजेविना राहावे लागल्याने मोठी गैरसोय झाली होती.जरंडी वीज उपकेंद्रातील जरंडी,बहुलखेडा,आणि घोसला या तीन फिडरचा वीज पुरवठा ठप्प झाल्याने या वीज उपकेंद्रातील १३ गावे रात्रभर अंधारात होती.सोयगाव वीज उपकेंद्रातील बिघाड दुरुस्तच होत नसल्याने अखेरीस सिल्लोड वरुण तंत्रज्ञ आल्यावर सायंकाळी उशिरा शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला.जरंडी उपकेंद्राचा वीज पु

पुलावरील सिमेंट बंधारा फुटला,शेती पिकांचे नुकसान, बंधाऱ्याच्या भिंतीही वहिल्या...

Image
सोयगाव: रामपुरवाडी पुलावरील सिमेंट बंधारा फुटला,शेती पिकांचे नुकसान.......बंधाऱ्याच्या भिंतीही वहिल्या...  सोयगाव,ता.३(प्रतिनिधी): अजिंठा डोंगरात झालेल्या मुसळधार पावसाने रामपूरवाडी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात नदीच्या पात्रात बांधलेला सिमेंट बंधारा बुधवारी पहाटे वाहून गेल्याची घटना घडली.महिनाभरापूर्वी बांधलेल्या सिमेंट बांधाची अख्खी भिंत फुटल्याने बंधाऱ्यातील पाणी शेती शिवारात शिरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तर बंधाऱ्यातील अडविण्यात आलेले लाखो लिटर पाणी जळगाव जिल्ह्यात वाहून गेले आहे.दरम्यान या घटनेमुळे नदीकाठच्या  रामपूरवाडी शेती क्षेत्राला धोका निर्माण झाला आहे.          जलसंधारण विभागाच्या वतीने महिनाभरापूर्वी या नदीवर सिमेंट बंधारे उभारण्यात आले.दरम्यान फुटलेल्या बंधाऱ्याच्या केवळ दोनशे फुटावर पुन्हा एक बंधारा नव्यानेच उभारण्यात आला आहे.या बंधाऱ्याला गळती लागून दुसऱ्या बंधाऱ्यात शिरलेले अतिरिक्त पाण्याच्या दाबाने दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट बंधारा फुटून यातून हजारो लिटर पाणी वाहून शेतात शिरले आहे,तर काही पाणी नदीपात्रातून जळगाव जिल्ह्यात गेले,दरम्यान जलसंधारण विभागाच्य

मुसळधार पावसात शिवसेना धावली प्रवाशांच्या मदतीला

Image
कार्य शिवसेनेचे २० टक्के राजकारण ८० टक्के समाजसेवा  मुसळधार पावसात शिवसेना धावली प्रवाशांच्या मदतीला ===================== मुंबई ( प्रतिनिधी ) मुंबई येथे मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे रेल्वे वाहतूक सेवा ठप्प होऊन लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द झाल्याने, पाचोरा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पाचोरा शिवसेनेकडून भर पावसात प्रवाशांना फळ व चहा बिस्किट वाटप व मेडीकल सेवा देण्यात आली. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील, उद्योगपती मुकंद आण्णा बिल्दीकर, उपनगराध्यक्ष शरद पाटे, शिवसेना शहरप्रमुख किशोर आप्पा बारावकर, युवासेना शहरप्रमुख संदीपरांजे पाटील,दादा भाऊ चौधरी, सतिष आबा चेडे, रेहमान तडवी, आनंद पगारे, गंगाराम पाटील, जितेंद्र पाटील, जितेंद्र पेंढारकर, वैभव राजपूत, चेतन सपकाळे, आण्णा चौधरी, विजय भोई, अजय पाटील व शिवसैनिक उपस्थित होते. त्यानंतर प्रवाशांनी शिवसैनिकांचे आभार मानून कौतुक केले...