बदामराव पंडितांच्या नेतृत्वाखाली 150 जण करणार शिवसेनेत जाहीर प्रवेश

मादळमोहीतील 65 लक्ष रुपयांच्या कामाचा उद्या
बदामराव पंडित यांच्या हस्ते लोकार्पण व शुभारंभ
====================
शेख सिराज यांच्यासह 150 जण शिवसेनेत करणार प्रवेश
====================

गेवराई ( प्रतिनिधी ) सामान्य लोकांच्या अडचणी सोडविण्या सोबतच, विकास कामे करण्यावर भर असलेल्या शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते मादळमोहीत 55 लक्ष रुपयांच्या कामाचा शुभारंभ तर 10 लक्ष रुपयांच्या कामाचा लोकार्पण सोहळा उद्या दिनांक 6 जुलै रोजी होणार आहे. यावेळी शेख सिराज यांच्यासह 150 कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जि प सदस्य बाबासाहेब तळेकर यांनी दिली आहे.
         लोकसभा निवडणुकीत गेवराई विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीच्या डॉ प्रीतमताई मुंडे यांना 36 हजाराचे मताधिक्‍य मिळाल्यानंतर, शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांची लोकप्रियता अधिकच वाढली असून, दररोज माजी आ पंडित व आ पवारांना सोडचिठ्ठी देऊन असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत. दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता मादळमोही येथील चळवळीतील पदाधिकारी असलेले शेख सिराज सर यांच्यासह 150 कार्यकर्ते आपल्या कुटुंबियांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. याच वेळी मादळमोही ग्रामपंचायत अंतर्गत माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, जि प सभापती यूधाजित पंडीत तसेच जि प सदस्य बाबासाहेब तळेकर यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या चौदाव्या वित्त आयोगातील 30 लक्ष रुपयांच्या कामासह, 25/15 योजनेअंतर्गत 22.50 लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्ता, नाली, विंधन विहीर आणि लाईट या कामाचा शुभारंभ तर 10 लक्ष रुपयांच्या कामाचे लोकार्पणही बदामराव पंडित यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी जि प सभापती युधाजित पंडित, जि प सदस्य बाबुराव जाधव, युवराज डोंगरे, पं स सभापती अभयसिंह पंडित, उपसभापती भीष्माचार्य दाभाडे, युवानेते रोहित पंडित, माजी सभापती पंढरीनाथ लगड, शिवसेना तालुकाप्रमुख कालिदास नवले आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....