जि.प .शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठा प्रतिष्ठान देणार 13 हजार वह्या-पुस्तके

जि.प .शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठा प्रतिष्ठानची देणार 13 हजार वह्या-पुस्तके
== विनोद पाटील यांची राहणार विशेष उपस्थिती ==

सोयगाव ( प्रतिनिधी )  जरंडी ता.सोयगाव येथे दि 15 जुलै सोमवार रोजी गरजु विद्यार्थ्यांना मोफत वह्या-पुस्तके,कंपास इ.शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मराठा प्रतिष्ठान चे जिल्हा अध्यक्ष विजय काळे यांनी दिली.  १३,००० हजार वह्या-पुस्तके वाटप करण्याचा हा कार्यक्रम तालुक्यातील गरजु विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे मराठा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सोपान दादा गव्हांडे पाटील यांनी आव्हान केले आहे.
या कार्यक्रमासाठी विषेश अतिथी म्हणून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी ज्यांनी अमाप कष्ट करून आरक्षण मिळवुन देते असे विनोद भैय्या पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच पोलीस निरीक्षक सिताराम म्हेत्रे
सहाय्यक पोलीस निरीक्षक शकील शेख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी मराठा प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष विजय काळे, ता.अध्यक्ष विजय चौधरी, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर युवरे, खजिनदार आप्पासाहेब वाघ, सचिव सचिन महाजन, प्रसिद्धीप्रमुख समाधान शिंदे, ता.उपाध्यक्ष समाधान जाधव, राहुल सोनी, सागर शिंदे, प्रमोद वाघ, गणेश गवळी, (सचिव) गुणवंत ढमाले, बबलू बावस्कर,  नाना जुनघरे, आबा ऊगले .प्रवीण गव्हांडे, पिटू गवळी, प्रकाश गव्हांडे, .गणेश तायडे,. समाधान शिंदे, गणेश गवळी आदी मराठा प्रतिष्ठान पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....