Posts

Image
जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्यासाठी कामाला लागा --  बदामराव पंडित ==================== गेवराईतील शिवसेना भवनातून पुन्हा संपर्क केला सुरू ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) राज्यात झालेल्या महायुती विरुद्ध महाआघाडीच्या तुल्यबळ लढतीत, भल्याभल्यांचा दारुण पराभव झाला आहे. आपण तर लोकभावनेचा आदर करून अपक्ष निवडणूक लढलो आहोत. अपक्ष असूनही मतदारसंघातील लाखो लोकांनी भरभरून प्रेम दिले तर 50 हजार मतदारांनी आवल्यावर विश्वास टाकून मतदान दिले आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांनी व शिवसैनिकांनी खचून न जाता प्रामाणिकपणे शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर व सामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कामाला लागावे. यापुढील काळात बीड जिल्ह्यात शिवसेना मजबूत करून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी 24 तास काम करणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त केले आहे. यावेळी गहिवरलेल्या शिवसैनिक व कार्यकर्त्यांना त्यांनी मोठे बळ दिले आहे.           गेवराई विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी न मिळाल्याने लोकभावनेचा आदर करत शिवसेना नेते माजी राज

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीला मोर्चा काढण्याचा अधिकार नाही - बदामराव पंडित

Image
उसाचे पैसे कारखान्याकडे दाबून ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याचा अधिकार नाही -- बदामराव पंडित ====================  गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी घाम गाळून कष्टाने पिकवलेल्या उसाचे पेमेंट राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जय भवानी कारखान्याने अद्यापही दिलेले नाही. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या हक्काच्या परतीच्या ठेवी परत केलेल्या नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याचा नैतिक अधिकार नाही. शेतकऱ्यांचे पैसे अडवून त्यांचा खोटा पुळका दाखवत मोर्चा काढणे म्हणजे हे विजयसिंह पंडित यांचे शेतकऱ्यांविषयी पुतनामावशीचे प्रेम असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केला आहे.            शेतकऱ्यांच्या पीक विमा द्या, सोयाबीन, फळबाग आणि कांदा उत्पादकांना पिक विमा नुकसान भरपाई द्या. आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते विजयसिंह पंडित हे दिनांक 29 जुलै रोजी धडक मोर्चा काढत आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते माजी राज्यमंत्री

शिवसेनेच्या बदामराव पंडित यांचा पुन्हा एकदा भाजप आ लक्ष्मण पवारांना धक्का

Image
बदामराव पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आडगाव व गुंजाळाच्या ग्रा पं सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश ==================== पिंपळनेर सर्कलमध्ये आ पवारांना धक्का ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व जि प सभापती युधाजित पंडित यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन पिंपळनेर सर्कल मधील आडगाव व गुंजाळा येथील ग्रामपंचायत सदस्य असंख्य युवकांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून आ लक्ष्मणराव पवार यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.         बीड तालुक्यातील गेवराई मतदार संघात असलेल्या पिंपळनेर सर्कलच्या आडगाव व गुंजाळा येथील ग्रामपंचायत सदस्य बाबूलाल घुगे, शेख चांदभाई, नारायण घुगे यांच्यासह आसाराम घुगे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुहास जायभाय, गोवर्धन घुगे, चिंतामण घुगे, नितीन जायभाय, श्रीमंत घुगे, राजाभाऊ घुगे, तुळशीदास घुगे, दादासाहेब घुगे, रवी जायभाय, महादेव ढाकणे, विष्णू ढाकणे, आकाश ढाकणे, शांतीलाल घुगे आदींसह असंख्य युवकांनी शिवसेना बीड जिल्हा समन्वयक तथा जि प सभापती युधाजित पंडीत यांच

जि.प .शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठा प्रतिष्ठान देणार 13 हजार वह्या-पुस्तके

Image
जि.प .शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठा प्रतिष्ठानची देणार 13 हजार वह्या-पुस्तके == विनोद पाटील यांची राहणार विशेष उपस्थिती == सोयगाव ( प्रतिनिधी )  जरंडी ता.सोयगाव येथे दि 15 जुलै सोमवार रोजी गरजु विद्यार्थ्यांना मोफत वह्या-पुस्तके,कंपास इ.शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मराठा प्रतिष्ठान चे जिल्हा अध्यक्ष विजय काळे यांनी दिली.  १३,००० हजार वह्या-पुस्तके वाटप करण्याचा हा कार्यक्रम तालुक्यातील गरजु विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे मराठा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सोपान दादा गव्हांडे पाटील यांनी आव्हान केले आहे. या कार्यक्रमासाठी विषेश अतिथी म्हणून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी ज्यांनी अमाप कष्ट करून आरक्षण मिळवुन देते असे विनोद भैय्या पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच पोलीस निरीक्षक सिताराम म्हेत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक शकील शेख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी मराठा प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष विजय काळे, ता.अध्यक्ष विजय चौधरी, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर युवरे, खजिनदार आप्पासाहेब वाघ, सचिव सचिन महाजन, प्रसिद्धीप्रमुख स

मुस्लिम बांधवांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही कोणत्याही संकटासमोर सर्वात पुढे मी उभा राहील -- बदामराव पंडित

Image
मुस्लिम बांधवांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही कोणत्याही संकटासमोर सर्वात पुढे मी उभा राहील -- बदामराव पंडित ========================= शेख सिराज यांच्यासह 150 जणांचा शिवसेनेत प्रवेश ========================= गेवराई ( प्रतिनिधी ) शिवसेना हा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. मुस्लिम समाजाला वेगवेगळ्या पदांवर शिवसेनेने नेहमी संधी दिलेली आहे. परंतु काही लोक मुद्दाम भीती निर्माण करण्यासाठी चुकीच्या गोष्टी सांगून आपला उद्देश साध्य करून घेत आहेत. मुस्लिम समाजावर आलेल्या कोणत्याही संकटासमोर सर्वात पुढे मी उभा राहील, मुस्लिम बांधवांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाने मनात कोणतीही भीती न बाळगता शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहावे असे आवाहन व ठाम विश्वास शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त केला आहे.          मादळमोही येथील 65 लक्ष रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी चळवळीचे युवा पदाधिकारी शेख सिराज यांनी आपल्या 150 सहकाऱ्यांसह सहकारी व त्यांच्या कुटुंबीयांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला त्याप

बदामराव पंडितांच्या नेतृत्वाखाली 150 जण करणार शिवसेनेत जाहीर प्रवेश

Image
मादळमोहीतील 65 लक्ष रुपयांच्या कामाचा उद्या बदामराव पंडित यांच्या हस्ते लोकार्पण व शुभारंभ ==================== शेख सिराज यांच्यासह 150 जण शिवसेनेत करणार प्रवेश ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) सामान्य लोकांच्या अडचणी सोडविण्या सोबतच, विकास कामे करण्यावर भर असलेल्या शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते मादळमोहीत 55 लक्ष रुपयांच्या कामाचा शुभारंभ तर 10 लक्ष रुपयांच्या कामाचा लोकार्पण सोहळा उद्या दिनांक 6 जुलै रोजी होणार आहे. यावेळी शेख सिराज यांच्यासह 150 कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जि प सदस्य बाबासाहेब तळेकर यांनी दिली आहे.          लोकसभा निवडणुकीत गेवराई विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीच्या डॉ प्रीतमताई मुंडे यांना 36 हजाराचे मताधिक्‍य मिळाल्यानंतर, शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांची लोकप्रियता अधिकच वाढली असून, दररोज माजी आ पंडित व आ पवारांना सोडचिठ्ठी देऊन असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत. दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता मादळमोही येथील चळवळीतील पदाधिकारी असलेल

पार्श्वभूमीचे संपादक गंमतभाऊ भंडारी याना नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे

Image
बातमी टाकली म्हणून पार्श्वभूमीचे संपादक गंमतभाऊ भंडारी याना  नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे === पाटोदा तहसिल मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन ===== पाटोदा (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील सर्व सामान्य माणसाच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवणारे दैनिक म्हणून पार्श्वभूमी पेपरची ओळख आहे. दैनिक पार्श्वभूमी मध्ये 21 जूनच्या अंकात बीड जिल्ह्यातील वाळु वाहतूक ठेकेदारांन कडुन काही अधिकारी हाप्ते घेतात अशी बातमी दैनिक पार्श्वभूमी मध्ये छापली म्हणून काही अधिकाऱ्यांचे काळे धंदे वरिष्ठ अधिकारी व जनते समोर आल्याने चिडलेल्या अधिकाऱ्यांनी संपादकाचा राग मनात धरुन  दैनिक पार्श्वभूमीचे निर्भिड संपादक गंमत भाऊ भंडारी यांना नोटीस पाठवून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे, वाळु ठेकेदारा कडुन हाप्ते वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांचे सत्य वरिष्ठ अधिकारी व जनते समोर आणले म्हणून वर्तमानपत्राच्या संपादकला सतरा अधिकाऱ्यांनी नोटीस देऊन लोकशाहीचा चौथा आवाज दाबन्याचा प्रयत्न केला आहे. या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा असे निवेदन पाटोदा तहसिलचे नायब तहसिलदार टाकसाहेब यांना शेतकरी नेते राजाभाऊ देशमुख,

सोयगाव परिसरात वीजगुल...२२ गावे अंधारात.....

Image
सोयगाव परिसरात वीजगुल...२२ गावे अंधारात.....      जरंडी,ता.३( प्रतिनिधी );      सोयगावच्या वीजउपकेंद्रातील इनकमिंग रोहित्रात झालेला बिघाड आणि जरंडी वीजउपकेंद्रात झालेला तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही वीजउपकेंद्राला जोडणी करण्यात आलेले तब्बल २२ गावे अंधारात होती.रात्री उशिरा सोयगाव शहरात आलेला वीज पुरवठा पुन्हा बुधवारी पहाटे गुल झाल्याने शहरासह पाच गावांना बुधवारीही वीज विरहित राहावे लागले.        १३२ के.व्ही वीज केंद्रातून पुरवठा होणार्या इनकमिंग रोहित्रात अचानक बिघाड झाल्याने सोयगाव शहर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अंधारात असतांना अचानक जरंडी फिडरमध्ये बिघाड झाल्याने जरंडी परीसरही अंधारात बुडाल्याने सोयगाव परिसरातील तब्बल २२ गावांना २० तासांपासून विजेविना राहावे लागल्याने मोठी गैरसोय झाली होती.जरंडी वीज उपकेंद्रातील जरंडी,बहुलखेडा,आणि घोसला या तीन फिडरचा वीज पुरवठा ठप्प झाल्याने या वीज उपकेंद्रातील १३ गावे रात्रभर अंधारात होती.सोयगाव वीज उपकेंद्रातील बिघाड दुरुस्तच होत नसल्याने अखेरीस सिल्लोड वरुण तंत्रज्ञ आल्यावर सायंकाळी उशिरा शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला.जरंडी उपकेंद्राचा वीज पु

पुलावरील सिमेंट बंधारा फुटला,शेती पिकांचे नुकसान, बंधाऱ्याच्या भिंतीही वहिल्या...

Image
सोयगाव: रामपुरवाडी पुलावरील सिमेंट बंधारा फुटला,शेती पिकांचे नुकसान.......बंधाऱ्याच्या भिंतीही वहिल्या...  सोयगाव,ता.३(प्रतिनिधी): अजिंठा डोंगरात झालेल्या मुसळधार पावसाने रामपूरवाडी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात नदीच्या पात्रात बांधलेला सिमेंट बंधारा बुधवारी पहाटे वाहून गेल्याची घटना घडली.महिनाभरापूर्वी बांधलेल्या सिमेंट बांधाची अख्खी भिंत फुटल्याने बंधाऱ्यातील पाणी शेती शिवारात शिरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तर बंधाऱ्यातील अडविण्यात आलेले लाखो लिटर पाणी जळगाव जिल्ह्यात वाहून गेले आहे.दरम्यान या घटनेमुळे नदीकाठच्या  रामपूरवाडी शेती क्षेत्राला धोका निर्माण झाला आहे.          जलसंधारण विभागाच्या वतीने महिनाभरापूर्वी या नदीवर सिमेंट बंधारे उभारण्यात आले.दरम्यान फुटलेल्या बंधाऱ्याच्या केवळ दोनशे फुटावर पुन्हा एक बंधारा नव्यानेच उभारण्यात आला आहे.या बंधाऱ्याला गळती लागून दुसऱ्या बंधाऱ्यात शिरलेले अतिरिक्त पाण्याच्या दाबाने दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट बंधारा फुटून यातून हजारो लिटर पाणी वाहून शेतात शिरले आहे,तर काही पाणी नदीपात्रातून जळगाव जिल्ह्यात गेले,दरम्यान जलसंधारण विभागाच्य

मुसळधार पावसात शिवसेना धावली प्रवाशांच्या मदतीला

Image
कार्य शिवसेनेचे २० टक्के राजकारण ८० टक्के समाजसेवा  मुसळधार पावसात शिवसेना धावली प्रवाशांच्या मदतीला ===================== मुंबई ( प्रतिनिधी ) मुंबई येथे मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे रेल्वे वाहतूक सेवा ठप्प होऊन लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द झाल्याने, पाचोरा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पाचोरा शिवसेनेकडून भर पावसात प्रवाशांना फळ व चहा बिस्किट वाटप व मेडीकल सेवा देण्यात आली. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील, उद्योगपती मुकंद आण्णा बिल्दीकर, उपनगराध्यक्ष शरद पाटे, शिवसेना शहरप्रमुख किशोर आप्पा बारावकर, युवासेना शहरप्रमुख संदीपरांजे पाटील,दादा भाऊ चौधरी, सतिष आबा चेडे, रेहमान तडवी, आनंद पगारे, गंगाराम पाटील, जितेंद्र पाटील, जितेंद्र पेंढारकर, वैभव राजपूत, चेतन सपकाळे, आण्णा चौधरी, विजय भोई, अजय पाटील व शिवसैनिक उपस्थित होते. त्यानंतर प्रवाशांनी शिवसैनिकांचे आभार मानून कौतुक केले...

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यकारिणी बैठक नाशिक येथे संपन्न

Image
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यकारिणी बैठक नाशिक येथे संपन्न ===================== नाशिक ( प्रतिनिधी ) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक ठरली. संघटनात्मक बांधणी आणि महिला सशक्तीकरण यासाठी नवीन उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत, त्याची सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी मा. ना. रावसाहेब पाटील दानवे, मा. सौ. विजयाताई रहाटकर, मा. श्री. विजय पुराणिक, मा. सौ. माधवीताई नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या वेळी सौ.पुष्पाताई  प्रकाश काळे जि.प.सदस्य व  (संयोजक सिल्लोड- सोयगाव विधान सभा), सौ. रेखाताई कुलकर्णी, सौ. सविताताई कुलकर्णी, सौ. पुनमताई पवार, सौ. मंगलाताई वाहेगांवकर,सौ अनुराधा ताई चव्हाण-सौ.तळेगांवकर ताई  यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ना गिरीश महाजन व आ एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.

Image
ना गिरीश महाजन व आ एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत जळगाव भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. ======================== जळगाव ( प्रतिनिधी ) भाजपा जिल्हा विस्तृत बैठक दि.२९ जून शनिवार रोजी दु.२:०० वा. ब्राम्हण सभा जळगांव येथे झाली.   सदर बैठक जिल्हा पालकमंत्री मा.ना. गिरीषभाऊ महाजन, मा.मंत्री मा.आ.एकनाथराव खडसे, विभाग संघटन मंत्री मा.अँड.किशोरभाऊ काळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मा. डॉ.संजीव पाटील व महानगराचे अध्यक्ष तथा मा.आ.सुरेश भोळे (राजुमामा) मा.खा. उन्मेषदादा पाटील व मा.खा.रक्षाताई खडसे, मा.आ.तथा प्रदेश चिटणीस मा.आ.स्मिताताई वाघ, मा.आ.चंदुभाई पटेल, मा.आ.हरिभाऊ जावळे, मा.आ.संजयभाऊ सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.       सदर बैठकीला प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष/सरचिटणीस, मंडल सदस्य नोंदणी प्रमुख/सहप्रमुख, जिल्हा आघाडी अध्यक्ष/ सरचिटणीस, विस्तारक, जि.प.व पं. स. सभापती/सदस्य, नगराध्यक्ष/नगरसेवक, शक्तिकेंद्र प्रमुख यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे ,जिल्हा सरचिटणीस पोप
Image
फळबागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या शिवसेना नेते बदामराव पंडित यांची प्रशासनाकडे मागणी ==================== शेतकऱ्यांना बाग न तोडण्याचे केले आवाहन ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) अत्यल्प पावस झाल्याने पडलेल्या दुष्काळात गेवराई मतदारसंघात माणसांना व जनावरांनाही प्यायला पाणी उपलब्ध नाही. अशा स्थितीत गेल्या कित्येक वर्षापासून जगविलेल्या फळबागा जिवंत ठेवणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. अनेकांच्या बागा जळून गेल्या आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ नुकसान झालेल्या फळबागांचा पंचनामा करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यासोबतच कोणत्याही शेतकऱ्यांनी फळबागा तोडू नयेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.              शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी दिनांक 29 जून रोजी गेवराईचे तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्या गेवराई मतदार संघातील पिण्याच्या पाण्याचा  प्रश्न गंभीर असल्याने, आपल्या फळबागा जगवायच्या कशा ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य कर्मचारी 3 जुलैला पाळणार "लक्षवेधी दिन" तर 20 ऑगष्टला "लाक्षणिक संप"

Image
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य कर्मचारी पाळणार 3 जुलैला "लक्षवेधी दिन" तर 20 ऑगष्टला "लाक्षणिक संप" ==================== महाराष्ट्र राज्य जुनी हक्क पेन्शन संघटनाही होणार सहभागी ==================== मुंबई  ( प्रतिनिधी ) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ पेन्शन योजना लागू करावी, निवृत्तीचे वय ६० करावे, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, यांसह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारच्या संथ कारभारामुळे सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी अपूर्ण असल्यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहे. मध्यवर्ती संघटनेच्या दिनांक 16 जून 2019 च्या पदाधिकारी मंडळाच्या सभेत मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली असून बुधवार दिनांक 3 जुलै 2019 रोजी सर्व कार्यालयात भोजनाच्या सुटटीत उग्र निदर्शने करु ‘लक्षवेधी दिन पाळण्याचे ठरविण्यात आले आहे. अंशदायी पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी १९ जानेवारी रोजी अभ्यास समितीची घोषणा केली. परंतु, ही समिती योजनेतील त्रुटींचा विचार करणार आहे. योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी संघटनेने स्पष्
Image
पावसात उभ्या पिकांसह शेत जमिनी वाहून गेल्या  सोयगाव,जंगला आणि कवली शिवारात नुकसान ====================    सोयगाव ( प्रतिनिधी )सोयगावसह परिसरात शुक्रवारी झालेल्या दमदार पावसाने सोयगाव,जंगला, बोहुलखेडा आणि कवली शिवारातील शेतजमिनी उभ्या कोवळ्या पिकांसह वाहून गेल्याने शेतात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.कवली शिवारातील बहुला नदीला आलेल्या पुराचे पाणी कवली शेती शिवारात शिरल्याने गुंताबाई जाधव आणि गजमल हरी पाटील यांचे पिकांसह चक्क शेतच वाहून गेल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे.याप्रकरणी महसूल आणि कृषी विभागांकडून शनिवारी पाहणी करण्यात येणार असल्याचे महसूलच्या सूत्रांनी सांगितले.           सोयगावसह परिसरात शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने शेती क्षेत्रात दाणादाण उडाली असून कपाशी पिके कोवळ्या अंकुरासह शेतीच वाहून गेली असून सोयगाव आणि जंगला शिवारात नाल्याच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतात नाला तयार झाला आहे.भैरवनाथ शिवारातही शेती वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहे.दरम्यान ऐन खरिपाच्या हंगामाच्या प्रारंभापासून नैसर्गिक संकांटाची मालिका सोयगाव परिसरात सुरु झ

नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांनी घेतला पोलीस ठाण्याचा पदभार : तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्वागत

Image
नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांनी घेतला पोलीस ठाण्याचा पदभार : तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्वागत ======================== सोयगाव ( प्रतिनिधी ) सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माधव गुंडीले यांच्या जागी नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांची सोयगावला बदली झाली शुक्रवारी  नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात तातडीने हजर होवून पदभार घेतला. शुक्रवारी पो. नि. सीताराम म्हेत्रे यांचा सोयगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष भरत पगारे, राजू दुतोंडे, विजय पगारे, सुनील काळे, पूनम परदेशी,यादवकुमार शिंदे ,योगेश बोखारे,  विजय काळे, गुलाब शेख, शेख सुलेमान, फोटो ग्राफर विवेक महाजन व मराठा प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष  विजय काळे, समाधान जाधव, विजय चौधरी , समाधान शिंदे, प्रमोद वाघ, अमोल बोरशे,  यांनी पुष्प बुके देऊन स्वागत केले. यावेळी पत्रकारांच्या अडीअडचणी विषयी चर्चा करण्यात आली. यावेळी पो.नि. सीताराम मेहेत्रे यांनी पत्रकाराबाबत सहकार्याची व  सहानुभतीची ठेवण्याचे आश्वासन दिले.

आता 16 टक्के आरक्षणासाठी एकत्रित लढा उभारू --- गणेश बजगुडे पाटिल

Image
मराठ्यांच्या एकजुटिचा विजय आसुन क्रांतीकारी निर्णयाचे स्वागत  आता 16 टक्के आरक्षणासाठी एकत्रित लढा उभारू --- गणेश बजगुडे पाटिल =================== बीड ( प्रतिनिधी )  गेली 37 वर्ष मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यामागणीसाठी मराठा समाज बांधव लढा देत आहेत. आनेकांनी स्वत: आत्मबलिदान केले, आमच्या सारख्या आनेक तरुनांने कारावास भोगला गुन्हे दाखल झाली परंतु हाती घेतलेली आरक्षणाची लढाई आम्हि कधीहि शांत होवु दिली नाहि. आरक्षणामुळे मराठा समाजातील तरुणांचा विधार्थांचा शिक्षणाकडिल कौल वाढेल व समाज शिक्षीत होईल सुजान होईल व नोकर्यां व उधोगधंदयामधे वाढ होवुन समाजाची प्रगती होईल. आजचा निर्णय हा क्रांतीकारी निर्णय आसुन आम्हि न्यायदेवतेचे जाहिर आभार मानतो व येणार्या काळात 16 टक्के आरक्षण देण्यात यावे यासाठी एकजुटिने लढा आभारु.
Image
शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तात्काळ द्या ; नसतात आंदोलन बदामराव पंडित यांचा विमा कंपनीसह प्रशासनाला इशारा ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघातील गेवराई तालुक्यासह माजलगाव, बीड या तालुक्यातील पिंपळनेर, पेंडगाव आणि तालखेड या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अद्यापही मिळालेले नाहीत. ते पैसे तात्काळ शेतकऱ्यांना द्यावेत नसतात, शिवसेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी विमा कंपनीसह जिल्हा प्रशासनाला दिला आहे.          शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलनासाठी परिचित असलेल्या शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी म्हटले आहे की, गेवराई विधानसभा मतदारसंघात गेवराई महसूल मंडळ, जातेगाव महसूल मंडळ ता.गेवराई , तालखेड महसूल मंडळ ता. माजलगाव या महसूल मंडळात दुष्काळ असुन देखील कापूस, तूर, मुग या पिकाचा विमा मिळाला नाही. तस

सुसंस्कृत घर आणि गावातूनच गुणवंत विद्यार्थी घडतात -- सौ गिरिकाभाभी पंडित

Image
सुसंस्कृत घर आणि गावातूनच गुणवंत विद्यार्थी घडतात        -- सौ गिरिकाभाभी पंडित ==================== कुर्ल्यात गावकऱ्यांच्या उपस्थितीत गुणवंतांचा सत्कार ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) घराची कळा जसे अंगण दाखवते तसेच सुसंस्कृत गावाचे लक्षण हे त्या गावातील गुणवंत विद्यार्थ्यांवर ठरते जे गाव सुसंस्कृत आहेत त्याच गावात गुणवंत विद्यार्थी करतात गेवराई मतदार संघातील प्रत्येक गावात मोठी शैक्षणिक क्रांती होत असून ग्रामीण भागातील मुले आणि मुली उच्चशिक्षित होऊन मोठ्या पदावर जात आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेविका सौ गिरीकाभाभी बदामराव पंडित यांनी व्यक्त केले आहे.            गेवराई मतदार संघातील कुर्ला येथे आयोजित गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. येथील सक्रिय युवा कार्यकर्ते राहुल गुंड व तुषार पाटील यांच्या प्रयत्नाने इयत्ता दहावी व बारावीच्या प्राजक्ता गुंड, वैष्णवी गव्हाणे, साक्षी पाटील, रेवती पाटील, पायल पाटील, ज्ञाणेश्वरी गुंड, सागर कदम, ओंकार सोनार, शुभम गुंड, वैष्णवी गुंड, अनुष्का पाटील, आश्लेषा पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांचा

मराठा प्रतिष्ठान कडून टँकर द्वारे मोफत पाणीपुरवठा...

Image
मराठा प्रतिष्ठान कडून टँकर द्वारे मोफत पाणीपुरवठा... सोयगाव ( प्रतिनिधी )  सोयगाव तालूका दुष्काळी परिस्थितीने होरपळत आहे आणि या मुळे झालेली  बिकट पाण्याची टंचाईला  नागरिक हैराण झाले आहेत अशातच मराठा प्रतिष्ठान एक सामाजिक संस्था या द्वारे जरंडी येथील ग्रामस्थाना टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा केला जात आहे पाण्याची तीव्र टंचाई बघून मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  सोपानदादा पाटील यांनी जरंडीसह इतर गावासाठी सात पाणी टँकर ची व्यवस्था करून दिली आहे  मराठा प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष विजय काळे ,विजय चौधरी ,तालुका अध्यक्ष  सचिव ज्ञानेश्वर वाघ, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धोंडू  युवरे,  यांच्या मार्गदर्शनाखाली उपतालूका अध्यक्ष समाधान जाधव, जरंडी शाखा प्रमुख प्रशांत पाटील, सचिव सचिन महाजन व बापू सोंने  गुणवंत ढमाले, प्रकाश गव्हाडे ,प्रमोद वाघ, किशोर बावस्कर  ,ज्ञानेश्वर गवळी, प्रवीण गव्हाडे ,नानासाहेब जुनघरे ,सुनील ढमाले. गणेश गवळी पिंटू गवळी.  दिवस रात्र परिश्रम घेत आहेत  यात जरंडी ग्रामपंचायत देखील पाण्याचे सहकार्य कारीत आहे अत्यंत बिकट पाणी टंचाईचा काळात  प्रत्यक्ष मराठा प्रतिष्ठानने