शिवसेनेच्या बदामराव पंडित यांचा पुन्हा एकदा भाजप आ लक्ष्मण पवारांना धक्का

बदामराव पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून
आडगाव व गुंजाळाच्या ग्रा पं सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश
====================
पिंपळनेर सर्कलमध्ये आ पवारांना धक्का

====================
गेवराई ( प्रतिनिधी ) शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व जि प सभापती युधाजित पंडित यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन पिंपळनेर सर्कल मधील आडगाव व गुंजाळा येथील ग्रामपंचायत सदस्य असंख्य युवकांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून आ लक्ष्मणराव पवार यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.
        बीड तालुक्यातील गेवराई मतदार संघात असलेल्या पिंपळनेर सर्कलच्या आडगाव व गुंजाळा येथील ग्रामपंचायत सदस्य बाबूलाल घुगे, शेख चांदभाई, नारायण घुगे यांच्यासह आसाराम घुगे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुहास जायभाय, गोवर्धन घुगे, चिंतामण घुगे, नितीन जायभाय, श्रीमंत घुगे, राजाभाऊ घुगे, तुळशीदास घुगे, दादासाहेब घुगे, रवी जायभाय, महादेव ढाकणे, विष्णू ढाकणे, आकाश ढाकणे, शांतीलाल घुगे आदींसह असंख्य युवकांनी शिवसेना बीड जिल्हा समन्वयक तथा जि प सभापती युधाजित पंडीत यांच्या उपस्थितीत भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रसंगी शिवसेना किसान सेलचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, महादेव औटी, बाळासाहेब नागटिळक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. सभापती युधाजित पंडीत यांनी, प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे गळ्यात भगवा रुमाल घालून स्वागत केले. कोणतेही काम निसंकोचपणे घेऊन या ते प्रामाणिकपणे केले जाईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी प्रवेशकर्त्या पदाधिकाऱ्यांना दिली.

Comments

Popular posts from this blog

शरद पवारांकडून धक्कातंत्र ; बीडसाठी राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडितच ?

वाढत्या गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर विद्या पवार यांनी दिला हा सल्ला