Posts

Showing posts from April, 2019

लोकसभेचे मतदान होताच पवारांना हादरा

Image
लोकसभेचे मतदान होताच आ लक्ष्मणराव पवारांना हादरा  सेलूच्या उपसरपंचासह 5 सदस्यांचा शिवसेनेत जाहीर  प्रवेश ==================== टाकरवन मधील मुस्लिम युवकही  शिवसेनेत दाखल ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) बीड लोकसभा मतदारसंघाचे मतदान होताच, गेवराई तालुक्यातील सेलू ग्रामपंचायतचे भाजपा उपसरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्यांनी आ लक्ष्मणराव पवार यांना सोडचिठ्ठी देवून बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यासोबतच टाकरवन येथील असंख्य मुस्लीम युवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून, सर्वांना शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले आहे.              राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर नुकत्याच झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघात युतीचा उमेदवार डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी स्वतःला झोकून देत शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्यासह त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी प्रचारात सक्रिय भाग घेतला होता. लोकसभेचे मतदान होताच बदामराव पंडित यांनी शिवसेना पक्ष बांधणी आणखी मजबूत करायला सुरुवा