लोकसभेचे मतदान होताच पवारांना हादरा

लोकसभेचे मतदान होताच आ लक्ष्मणराव पवारांना हादरा 
सेलूच्या उपसरपंचासह 5 सदस्यांचा शिवसेनेत जाहीर  प्रवेश
====================
टाकरवन मधील मुस्लिम युवकही  शिवसेनेत दाखल
====================

गेवराई ( प्रतिनिधी ) बीड लोकसभा मतदारसंघाचे मतदान होताच, गेवराई तालुक्यातील सेलू ग्रामपंचायतचे भाजपा उपसरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्यांनी आ लक्ष्मणराव पवार यांना सोडचिठ्ठी देवून
बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यासोबतच टाकरवन येथील असंख्य मुस्लीम युवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून, सर्वांना शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले आहे.
             राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर नुकत्याच झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघात युतीचा उमेदवार डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी स्वतःला झोकून देत शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्यासह त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी प्रचारात सक्रिय भाग घेतला होता. लोकसभेचे मतदान होताच बदामराव पंडित यांनी शिवसेना पक्ष बांधणी आणखी मजबूत करायला सुरुवात केली असून,   दिनांक 20 एप्रिल रोजी टाकरवन येथील युनुस पटेल, असेफ पटेल, असद देशमुख, अखिल शेख, जुबेर पटेल, गोविंद गरड, अलीम शेख, शाहबाज इनामदार, समीर शेख आदींसह असंख्य मुस्लीम युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी सर्वांच्या गळ्यात भगवे रुमाल घालून  स्वागत केले. याप्रसंगी युवानेते यशराज पंडित, सोहेल शेख, सोनू पठाण, शेख नविद आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. तर दिनांक 21 एप्रिल रोजी तालुक्यातील सेलू ग्रामपंचायत मधील भाजपाचे उपसरपंच बाबासाहेब जगताप, ग्रामपंचायत सदस्य मदन यादव, आसाराम पांचाळ, बालासाहेब भोईटे, दिलीप डोंगरे, संतराम जगताप यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी आ लक्ष्मणराव पवार यांना सोडचिठ्ठी देवून, शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते सर्वांना शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी युवानेते यशराज पंडित, सुरेश जैन, भागवत आरबड,  महादेव चव्हाण, नितीन पवार, राजाभाऊ टकले, शेख नविद आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजप युती कायम राहणार असून, गेवराई मतदार संघ बदामराव पंडित यांच्यासाठी शिवसेनेकडून फिक्स असल्याचे जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी स्पष्ट केल्याने, मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते दररोज बदामराव पंडित यांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे त्यांची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....