पार्श्वभूमीचे संपादक गंमतभाऊ भंडारी याना नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे

बातमी टाकली म्हणून पार्श्वभूमीचे संपादक गंमतभाऊ भंडारी याना
 नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे
=== पाटोदा तहसिल मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन =====

पाटोदा (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील सर्व सामान्य माणसाच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवणारे दैनिक म्हणून पार्श्वभूमी पेपरची ओळख आहे. दैनिक पार्श्वभूमी मध्ये 21 जूनच्या अंकात बीड जिल्ह्यातील वाळु वाहतूक ठेकेदारांन कडुन काही अधिकारी हाप्ते घेतात अशी बातमी दैनिक पार्श्वभूमी मध्ये छापली म्हणून काही अधिकाऱ्यांचे काळे धंदे वरिष्ठ अधिकारी व जनते समोर आल्याने चिडलेल्या अधिकाऱ्यांनी संपादकाचा राग मनात धरुन  दैनिक पार्श्वभूमीचे निर्भिड संपादक गंमत भाऊ भंडारी यांना नोटीस पाठवून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे, वाळु ठेकेदारा कडुन हाप्ते वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांचे सत्य वरिष्ठ अधिकारी व जनते समोर आणले म्हणून वर्तमानपत्राच्या संपादकला सतरा अधिकाऱ्यांनी नोटीस देऊन लोकशाहीचा चौथा आवाज दाबन्याचा प्रयत्न केला आहे. या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा असे निवेदन पाटोदा तहसिलचे नायब तहसिलदार टाकसाहेब यांना शेतकरी नेते राजाभाऊ देशमुख, कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे, आबलुक घुगे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवभुषण जाधव, पञकार कांदरभाऊ चाऊस, पञकार गणेश शेवाळे, पञकार सय्यद साजेद, पञकार शेलार हारिदास, पञकार भोसले जितेद्र, पञकार नाना डिडुळ आदींनी दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....