शरद पवारांकडून धक्कातंत्र ; बीडसाठी राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडितच ?

शरद पवारांकडून धक्कातंत्र ; बीडसाठी राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडितच ? भाजप-शिवसेनेकडून सावध पवित्रा
====================

मुंबई ( प्रतिनिधी ) बीड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून बजरंग सोनवणे या नवख्या तरुणाला उमेदवारी जाहीर केली असली तरी हा भाजप-शिवसेना युतीला चकवा देण्यासाठी पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केला असून, राजकीय धक्कातंत्राचा वापर करून, उद्या जिल्ह्यातील अभ्यासू नेतृत्व प्रदेश सरचिटणीस माजी आ अमरसिंह पंडित यांनाच  राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर होणार असल्याची चर्चा जेष्ठ पदाधिकाऱ्यांकडून तसेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत आहे.
             याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीचे प्रदेशसरचिटनिस माजी आ अमरसिंह पंडित यांनाच उमेदवारी मिळेल हा बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना अपेक्षा  आणि विश्वास होता. विशेष म्हणजे दि 13 मार्च रोज खुद्द अमरसिंह पंडित यांनी भरगच्च पत्रकार परिषद घेऊन आपण लोकसभेसाठी इच्छूक असून राष्ट्रवाडीकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असे स्पष्ट संकेत देऊन, पक्ष, गट, तट सोडून गेवराईकरांनी तालुक्यातील उमेदवार म्हणून आपल्याला सहकार्य करावे असे आवाहनही केले होते. मात्र दि 15 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करून भाजपच्या खा प्रीतमताई मुंडे यांच्या विरोधात जि प मधील विरोधी गटनेते बजरंग सोनवणे या स्व गोपीनाथराव मुंडे यांच्याच तालमीत वाढलेल्या नवख्या तरुणाला उमेदवारी जाहीर केली. यामुळे अमरसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांचे अवसान गळाले. अनेकांनी तर आपल्या पक्षश्रेष्ठी विरोधात सोशल मीडियावर आगपाखडही सुरू केली. परंतु हा भाजप- शिवसेना युतीला शरद पवार या राजकीय चाणक्याने  दिलेला एक चकवा असून, नेहमी प्रमाणे "बोलणे एक आणि करणे दुसरेच" या राजकीय खेळीसाठी परिचित असलेल्या शरद पवार यांनी धक्कातंत्राचा वापर करून,  उद्या माजी आ अमरसिंह पंडित यांनाच उमेदवारी जाहीर करून युतीला हादरा तर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या मतदारांना सुखद धक्का देण्याचा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रवादीचे जेष्ठ पदाधिकारी आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते बोलताना ऐकावयास मिळत आहे. आता हे खरे की खोटे ही बाब उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आणि तो मागे घेण्याची तारीख संपल्यानंतरच स्पष्ट होईल हे नक्की. तोपर्यंत वेगवेगळ्या चर्चा चालणारच. मात्र यामुळे भाजप- शिवसेनेकडून गाफील न राहता सर्वबाजूने विजयासाठी मोर्चे बांधणी सुरू असल्याचे दिसते.

Comments

  1. बीड मध्ये अमरसिंह पंडित यांना तिकीट दिलं तरच ,काट्याची टक्कर होईल ..नसता बजरंग सोनवणे आजच पराभूत..१००% लिहून घ्या .. .
    अमरसिंह पंडित यांची अभ्यासू प्रतिमा, विकासकामे खेचून आणण्याची वृत्ती व काही जातीचे समीकरणे याच्या बळावर अमरसिंह पंडित हे लोकसभेचा गड यदाकदाचित नक्कीच सर करू शकतील..
    नसता आजच बीड मधुन राष्ट्रवादी पराभूत....

    ReplyDelete
  2. उमेदवारी अंतिम करण्यासाठी कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा दबाव पाठीशी असावा लागतो. विजयाची खात्री पटली तरच पक्ष त्याबाजूने झुकते माप देत असतो.

    ReplyDelete
  3. अमरसिंह पंडीत साहेबांचा माळवा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....