Posts

Showing posts from March, 2019

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

Image
अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन करून दाभाडे परिवाराने मराठा समाजाला घालून दिला नवा आदर्श ==================== प्रत्येक आत्मा पवित्रच ; मग निधनानंतर सुतक का पाळायचे?  ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई येथील सेवानिवृत्त तहसीलदार रामराव दाभाडे यांच्या पत्नी गंगाबाई दाभाडे यांच्या निधनानंतर त्यांच्या उच्चशिक्षित  मुला-मुलींनी अंत्यविधी करून, तिसऱ्याच दिवशी दहावा, तेरावा व गंगा पूजनाचा कार्यक्रम एकत्र करत मराठा समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या कृतीचे उपस्थित सर्व नातेवाईकांनी कौतुक करून  मराठा समाजातील प्रत्येकाने हा आदर्श घ्यावा अशा भावना व्यक्त केल्या आहेत.           याबाबत अधिक माहिती अशी की, सेवानिवृत्त तहसीलदार रामराव दाभाडे यांच्या पत्नी गंगाबाई दाभाडे यांचे दि 28 मार्च रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. दि 29 मार्च रोजी चिंतेश्वर मंदिर परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दहावा, तेरावा आणि गंगा पूजनाच्या वेगवेगळ्या करण्यात येणाऱ्या विधीमुळे नातेवाईक व मित्र परिवारास विनाकारण त्रास होऊ नये. तसेच दुष्

ना पंकजाताई मुंडे यांची किमया भारी लक्ष्मणराव पवार - बदामराव पंडित एकाच गाडीत

Image
पंकजाताई मुंडे यांनी जादूची कांडी फिरवली लक्ष्मण पवार - बदामराव पंडित एकाच गाडीत ==================== कार्यकर्त्यांचे मात्र अद्यापही मनोमिलन नाही ==================== बीड ( प्रतिनिधी ) पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  जादूची कांडी फिरवली असून, गेवराईत एकमेकांविरुद्ध लढलेले भाजप आ लक्ष्मणराव पवार आणि शिवसेना नेते बदामराव पंडित या दोघांनाही एकाच गाडीत बसवून युतीच्या उमेदवार प्रीतमताई मुंडे या आपल्या भगिणीचा उमेदवारी अर्ज दाखल करत आपली राजकिय किमया दाखवून दिली आहे.             लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे राजकीय जादूची कांडी असल्याची चर्चा नेहमीच कोणत्याही आलेल्या निवडणुकीमध्ये ऐकायला मिळायची. परंतु हीच जादूची कांडी आता त्यांची कन्या पालक मंत्री पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यात फिरवायला सुरू केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मणराव पवार आणि बदामराव पंडित हे एकमेकांविरुद्ध निवडणूक लढले होते. या दोघांमधून विस्तूही आडवा जात नाही असे चित्र भासत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि केंद्रात भाजप-शिवसेना युती झाली आणि या यु

मोहनराव जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे युतीची ताकद वाढली -- बदामराव पंडित

Image
मोहनराव जगताप यांच्या प्रवेशामुळे युतीची ताकद वाढल्याने प्रीतमताई मुंडे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार -- बदामराव पंडित ========== ========== गेवराई ( प्रतिनिधी ) छत्रपती साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहनराव जगताप यांच्या भाजपा प्रवेशामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीची ताकत वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत यामुळे डॉ प्रीतमताई मुंडे यांचा विजय मोठ्या मताधिक्क्याने होणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त केला आहे.             बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना रासप रिपाई या माहितीच्या उमेदवार डॉ प्रीतमताई गोपीनाथ मुंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी शिवसेना नेते बदामराव पंडित यांनी धडाडीने प्रचाराला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसापासून तालखेड सर्कलमधील प्रत्येक गावांत जाऊन बदामराव पंडित हे मतदारांच्या भेटी घेऊन, डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी मतदान मागत आहेत. दि 28 मार्च रोजी खेर्डा, वारोळा, बाराभाई तांडा, हरकी निमगाव, राम पिंपळगाव, मंगरूळ नंबर 1, सावरगाव आदि गावातील मतदारांच्या बदामराव पंडित यांनी भेट घेऊन

रखरखत्या उन्हात घरोघरी जाऊन युधाजित पंडित यांनी डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी मागितली मते

Image
रखरखत्या उन्हात घरोघरी जाऊन युधाजित पंडित यांनी डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी मागितली मते ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना - रासप - रिपाई महायुतीच्या उमेदवार डाॅ. प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांच्या विजयासाठी  जि प सभापती तथा शिवसेनेचे बीड जिल्हा समन्वयक युधाजित पंडित यांनी रखरखत्या उन्हात मतदारांच्या घरोघरी जाऊन मते मागितली आहेत.             शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी युतीचे उमेदवार प्रीतमताई मुंडे यांच्या प्रचारात आघाडी घेतली असतानाच आता बीड जिल्हा शिवसेना समन्वयक तथा जि प सभापती युधाजित पंडित यांनीही प्रचारात उडी घेतली आहे. दि 28 मार्च रोजी गेवराई तालुक्यातील आतंरवाली, मिरगाव, पांढरी, भोगलगाव, बोरगाव थडी, राहेरी आधी गावात जाऊन सभापती युधाजित पंडित यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना युधाजित पंडित म्हणाले की, पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि खा प्रीतमताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक विकास योजनेसाठी भरभरून निधी दिला आहे. ग्रामीण भागाच्या

कोठेही तडजोड करू पण गेवराईत बदामराव पंडितच शिवसेनेचे आमदार होतील -- आनंदराव जाधव

Image
युतीची राज्यात कोठेही तडजोड करू पण.. गेवराईत बदामराव पंडित हेच शिवसेनेचे आमदार होतील -- आनंदराव जाधव ==================== गेवराई ( प्रतिनिधी )  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात सर्वप्रथम गेवराईतून बदामराव पंडित यांना शिवसेनेचा आमदार करून नामदार  करण्याचा राज्यात सर्वप्रथम शब्द दिला आहे. त्यामुळे राज्यात युतीची कोठेही तडजोड करू, पण बीड जिल्ह्यातील गेवराई मतदार संघ शिवसेनेचाच राहील आणि बदामराव पंडित हेच शिवसेनेचे प्रचंड मताने आमदार होतील असा दृढ विश्वास शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.            लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष संघटन मजबूत तिचा आढावा घेण्यासाठी गेवराई येथे दिनांक 18 मार्च रोजी जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांची व्यापक बैठक घेतली याप्रसंगी ते बोलत होते बैठकीस माजी राज्यमंत्री बदामराव पंडित जिल्हाप्रमुख  कुंडलिक खांडे सभापती अभयसिंह पंडित युवा नेते रोहित पंडित माजी सभापती पंढरीनाथ लगड जि प सदस्य युवराज डोंगरे गटनेते बापूराव चव्हाण तालुकाप्रमुख  कालिदास नवले आदींची

अमरसिंह पंडित समर्थक नाराज ; ना धनंजय मुंडेंची बैठक रद्द ; बजरंग सोनावणेंना विरोधच

Image
उमेदवारी न मिळाल्याने अमरसिंह पंडित समर्थक नाराज  मुंडेंच्या उपस्थितीत होणारी गेवराईतील बैठक रद्द ==================== सामान्य कार्यकर्त्यांच्या उमेदवारीला प्रस्थापितांकडून विरोधच ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये राष्ट्रवादी पक्षाने अनेक नवीन नेत्यांना संधी दिली आहे. बीडमध्ये माजी आ अमरसिंह पंडित यांना वगळून बजरंग सोनावणे या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली आहे. ही घोषणा होताच बीड राष्ट्रवादीतील अंतर्गत दुफळी चव्हाट्यावर आली असून आधीच जिल्ह्यात खिळखिळ्या झालेल्या राष्ट्रवादीला आता अमरसिंह पंडित यांच्या समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. ना धनंजय मुंडे यांची यामुळे गेवराईतील बैठक ऐन वेळी रद्द करण्यात आली.       राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थित पाटोदा, आष्टी, शिरूर आणि गेवराई येथे आज बैठक पार पडणार होती. मात्र अमरसिंह पंडित यांच्या समर्थकांचा रोष पाहता प

पवार - पंडित दोघेही अडचणीत ; कार्यकर्त्यांची पक्षविरोधी भूमिका भोवणार

Image
गेवराईत आ पवार व माजी आ पंडित दोघेही अडचणीत कार्यकर्त्यांची पक्षविरोधी भूमिका भोवणार ==================== बीड ( प्रतिनिधी ) गेल्या आठवड्यात गेवराई झालेल्या कार्यक्रमात भाजप आ लक्ष्मणराव पवार यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्या नंतर त्यांना वेडे, पागल म्हणाल्याने पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात आ पवारांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून आगपाखड केल्यानंतर आता बीड लोकसभा मतदारसंघातून  राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित यांना उमेदवारी न मिळाल्याने  माजी आ पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आगपाखड सुरू केली आहे. दोघांच्या कार्यकर्त्यांनी चालवलेल्या पक्षविरोधी  हुल्लडबाजीमुळे गेवराईतील भाजपा व राष्ट्रवादीचे पवार व पंडित हे दोन्ही आजी - माजी आमदार चांगलेच अडचणीत आले असून, असेच सुरू राहिल्यास पक्षनेतृत्वाची नाराजी दोघांनाही भोवणार हे नक्की.           गेल्या आठवड्यात गेवराईत विकास कामांच्या उद्घाटनाचा शासकीय कार्यक्रम झाला. यात भाजप नेत्या, पालकमंत्री पंकजाताई मुंडे भाषणाला उभा राहताच आ लक्ष्मणराव पवार यांच्या कार्यकर्त्यांनी

शरद पवारांकडून धक्कातंत्र ; बीडसाठी राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडितच ?

Image
शरद पवारांकडून धक्कातंत्र ; बीडसाठी राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडितच ? भाजप-शिवसेनेकडून सावध पवित्रा ==================== मुंबई ( प्रतिनिधी ) बीड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून बजरंग सोनवणे या नवख्या तरुणाला उमेदवारी जाहीर केली असली तरी हा भाजप-शिवसेना युतीला चकवा देण्यासाठी पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केला असून, राजकीय धक्कातंत्राचा वापर करून, उद्या जिल्ह्यातील अभ्यासू नेतृत्व प्रदेश सरचिटणीस माजी आ अमरसिंह पंडित यांनाच  राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर होणार असल्याची चर्चा जेष्ठ पदाधिकाऱ्यांकडून तसेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत आहे.              याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीचे प्रदेशसरचिटनिस माजी आ अमरसिंह पंडित यांनाच उमेदवारी मिळेल हा बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना अपेक्षा  आणि विश्वास होता. विशेष म्हणजे दि 13 मार्च रोज खुद्द अमरसिंह पंडित यांनी भरगच्च पत्रकार परिषद घेऊन आपण लोकसभेसाठी इच्छूक असून राष्ट्रवाडीकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असे स्पष्ट संकेत देऊन, पक्ष, गट, तट सोडून गेवराईकरांनी तालुक्यातील उमेदवार म्हणून आपल्

लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे 11 उमेदवार जाहीर

Image
लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे 11 उमेदवार जाहीर ================================= मुंबई ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.  सुप्रिया सुळे - बारामती, उदयनराजे - सातारा, सुनील तटकरे -रायगड तर शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या आनंद परांजपे यांना ठाण्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. अहमदनगर, माढा येथील उमेदवार आणि पार्थ पवार यांच्या उमेदवारी बाबत सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे.  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही पहिली यादी जाहीर केली आहे.  ● परभणी – राजेश विटेकर, ● ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील, ● कल्याण – बाबाजी बाळाराम पाटील, ● कोल्हापूरमधून - धनंजय महाडिक, ● बुलडाणातून - डॉ. राजेंद्र शिंगणे, ● जळगाव – गुलाबराव देवकर, ● लक्षद्वीप – महम्मद फैझल ●  यांचा जाहीर केलेल्या पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यासोबतच हातकणंगले या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठींबा देण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.       देशभर चर्चा झालेल्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ

भारतासह, जर्मनी, फ्रांस, सिंगापूर, इटली, सौदी अरेबियात पोहचले "A to Z महाराष्ट्र न्यूज"

Image
भारतासह, जर्मनी, फ्रांस, सिंगापूर, इटली, सौदी अरेबियात पोहचले "A to Z महाराष्ट्र न्यूज" ==================== [ दिल्ली / विशेष प्रतिनिधी ]       विविध क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी, राजकीय हालचाली, मनोरंजन आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या घटनांना तात्काळ सर्वांसमोर आणणारे "A to Z महाराष्ट्र न्यूज" आता केवळ भारतीय राहिले नसून भारतासह जर्मनी, फ्रान्स, सिंगापूर, इटली, सौदी अरेबिया येथील लोकांपर्यंत पोहोचले आहे. विश्वासहर्ता वाढल्याने दररोज देश-विदेशातील असंख्य वाचक  "A to Z महाराष्ट्र न्यूज" ला भेट देऊन माहिती घेत आहेत.           याबाबत अधिक माहिती अशी की ए टू झेड महाराष्ट्र न्यूज या भारतीय वेब चाललंय पेजने अल्पवधीत आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. दररोज विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहोचणारे "A to Z महाराष्ट्र न्यूज" हे आता देश विदेशातही लोकप्रिय झाले आहे. ऑनलाइन गुगल सर्वेनुसार "A to Z महाराष्ट्र न्यूज" ला भारतासह जर्मनी, फ्रान्स, सिंगापूर, इटली, सौदी अरेबिया, युनायटेड स्टेट, बेलजीयम, युक्रेन आदी देशात

चालत्या बसचा टप कोसळला ; प्रवाशी बालंबाल बचावले ; सुरक्षा दक्षता विभाग काय करतो ?

Image
बसचा टप अचानक कोसळला ; प्रवाशी बालबाल बचावले  कोठे आहे सुरक्षा दक्षता विभाग ? संतप्त प्रवाशांचा सवाल -------------------------------------- गेवराई  (प्रतिनिधी ) येथील  स्थानकात प्रवेश करीत असताना अचानक बस वरील टप सटकून  खाली पडला. यावेळी रस्त्यावर चालणारे प्रवासी जवळ नसल्याने कोणालाही इजा झाली नाही. यावेळी मोठा अनर्थ टळला असला तरी  या घटनेला जबाबदार कोण? आशा घटना का टळू शकत नाहीत ? असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.               याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई बसस्थानकामध्ये बस क्रमांक एम एच 20 18 16  ही बस  जात असताना  अचानक तिच्या टपावर असलेली  पाईप ची पूर्ण जाळी  अचानक सटकून खाली पडली  नशीब म्हणजे  यावेळी आजूबाजूला रस्त्यावर चालणार्‍या प्रवाशांची वर्दळ कमी होती  मोठ्या आकारात आणि भारी वजनदार जाळी  खाली जाणाऱ्या प्रवाशांच्या  अंगावर पडली असती  तर मोठी दुर्दैवी घटना  घडू शकली असती. बस स्टॉप खाली कोसळून पडला तर काही बस च्या खिडक्या खिळखिळ्या अवस्थेत आढळून येत आहेत. तसेच वाहन चालकाच्या गाडी चालवताना बसण्यासाठी असलेल्या आसनांना कुशन ऐवजी केवळ पट्ट्या बांधलेल्या आढळतात. अन

गेवराईतील वखारच्या गोदामाला आग; कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक ; दुष्काळात तेरावा..!

Image
गेवराईतील वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक ;  दुष्काळात तेरावा..! ====================   गेवराई ( प्रतिनिधी ) शहरातील शासकीय वखार महामंडळाच्या गोडाऊनला आग लागून पंधरा कोटी 46 लाख रुपयांचे नुकसान झाले असून ही आग आकरा तासानंतर आटोक्यात आली.ही आग नेमकी कशामुळे याची माहिती मिळाली नाही.परंतु यामध्ये कापसाचे गठाण, तूर,सोयबीन याचे नुकसान झाले आहे.  गेवराई शहरातील शासकिय वखार महामंडळाचे चार गोडाऊन आहेत.यामध्ये 31 कोटी 63 लाख 53 हजार रुपये किमतीचा माल आहे.यापैकी दि 10 मार्च रविवार रोजी रात्री दीड वाजेनेच्या सुमारास गोडाऊन नंबर चारला अचानक आग लागली.ही आग नेमकी कशामुळे लागली याचा प्राथमिक अंदाज देखील सांगता येत नाही. याचे कारण म्हणजे या ठिकाणी वीज देखील उपलब्ध नाही. परंतु या लागलेल्या आगीत गोडाऊनमध्ये सीसीआयच्या कापसाच्या 1208 गठन ज्याची किंमत 2 कोटी 5 लाख, खाजगी वखार महामंडळाच्या ठेवींवरील 5100 गठन ज्याची किंमत 10 कोटी, नाफेडची तूर 3400 पोते ज्याची किंमत 1 कोटी व खाजगी तूर 1 लाख 81 हजार रुपये तसेच गोडाऊन नुकसान दीड कोटी रुपये असे एकूण 15 कोटी 46 ल

छत्रपती मल्टीस्टेटच्या महिला दिन सप्ताहानिमित्त, योजनेस महिलांकडून प्रचंड प्रतिसाद

Image
छत्रपती मल्टीस्टेटच्या महिला दिन सप्ताहानिमित्त जाहीर केलेल्या योजनेस महिलांकडून प्रचंड प्रतिसाद ==================== ============================== गेवराई ( प्रतिनिधी ) येथील अल्पवधीत लोकांच्या पसंतीला उतरलेल्या छत्रपती मल्टीस्टेट बँक आपल्या विविध योजना राबवून ग्राहकांना नेहमीच आकर्षित केले आहे. महिला दिन सप्ताहाचे आयोजन करून छत्रपती मल्टीस्टेटने जाहीर केलेल्या महिलांसाठीच्या नवीन योजनेला जिल्ह्यातील महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.            चेअरमन संतोष भंडारी यांनी छत्रपती मल्टीस्टेटच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात टाकलेले पाऊल, आता प्रगतीपथावर असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांसाठी सुलभ आर्थिक बचत करणाऱ्या विविध योजना छत्रपती मल्टीस्टेटच्या वतीने राबविण्यात येत असल्याने, हजारो खातेदार आणि कोट्यवधी रुपयांची ठेवी या मल्टीस्टेट मध्ये जमा आहेत. त्या तुलनेत कर्जपुरवठाही मोठ्या प्रमाणावर करून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कामही छत्रपती मल्टीस्टेटने प्रामाणिकपणे सुरू केले आहे. राज्यातील बीड, पुणे, औरंगाबाद, जालना, अहमदनगर अशा विविध जिल्ह्यांमध्ये शाखांचे जाळ

जिजाऊ ब्रिगेडने आनाथ महिलांना सदभावनेने साड्या भेट देऊन साजरा केला जागतिक महिला दिन

Image
आनाथ महिलांना सदभावनेने साड्या भेट देऊन जिजाऊ ब्रिगेडने साजरा केला जागतिक महिला दिन ==================== महिलांचा सन्मान करणे ही काळाची गरज -- सौ अनिता नितीन भोसले ==================== बीड ( प्रतिनिधी ) महिलांना सन्मान देणे ही आज काळाची गरज आहे. कारण आई, बहीण, पत्नी आणि मुलगी या नात्यांमुळेच आज प्रत्येक घरात स्नेह, आपुलकी आणि जिव्हाळा जिवंत असल्याचे प्रतिपादन जिजाऊ महिला ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षा सौ अनिता नितीन भोसले यांनी केले आहे.          मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अनाथ व गरजू महिलांना सदभावनेने आणि सन्मानाने साड्या भेट देऊन जागतिक महिला दिन उत्साहात  साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी सौ भोसले बोलत होत्या. राष्ट्रमाता जिजाऊ,  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरू झालेल्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आश्रम शाळेचे समुपदेशक उमेश होमकर, तर जिजाऊ ब्रिगेडच्या बीड शहराध्यक्ष सुचेता माने, सुजाता माने,  प्रा नितीन भोसले, मराठा सेवा संघाचे गेवराई तालुका प्रसिद्धीप्रमुख विनायक उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोल

गेवराई तालुक्यातील 14 ग्रा पं इमारतीच्या बांधकामास मंजुरी

Image
मा बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रा पं योजनेतून गेवराई तालुक्यातील 14 ग्रा पं इमारतीच्या बांधकामास मंजुरी ==================== बीड जिल्ह्यातील 108 ग्रा पं इमारतीस मंजुरी ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या आणि ग्रामीण भागातील विकासासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सूचित केलेल्या मा बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत राज्यातील 538 ग्रामपंचायतीच्या बांधकामास मंजुरी मिळाली असून, त्यापैकी 108 बीड जिल्ह्यात तर गेवराई तालुक्यातील 14 ग्रामपंचायतच्या इमारती आता सुसज्ज होणार आहेत.          गावाच्या विकासाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतीच्या इमारती सर्व सोयींयुक्त सुसज्ज असल्या पाहिजेत ही भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी मांडली. त्यांच्या  सूचनेनंतर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या मा बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत  बांधणी योजनेअंतर्गत ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी राज्यातील 538 ग्रा

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले ; आपल्या राज्यात मतदान कधी?

Image
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले ==================== दिल्ली ( प्रतिनिधी ) जगात सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारतातील लोकसभेच्या निवडणुका केव्हा जाहीर होतात याकडे संपूर्ण देशाचे आणि जगाचे लक्ष लागले होते. दिनांक 9 मार्च रोजी निवडणूक आयोगाने बैठक घेतली तेव्हाच सर्वांना वाटले की, आता निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागेल. परंतु निवडणूक आयोगाने संभाव्य लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आणि बैठक संपली. परंतु आज दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता निवडणूक आयोगाची बैठक होणार असून या बैठकीमध्ये लोकसभा निवडणूकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशात 6 ते 9 टप्प्यांमध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता असून, यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये धावपळ उडाली आहे. आता सर्वच पक्षांना आपापल्या पक्षांचे उमेदवार येत्या 2 ते 3 दिवसात जाहीर करावे लागतील आणि उमेदवारीबाबत असलेला  सस्पेन्स आता उठावावाच लागणार आहे. कोणत्या राज्यात किती तारखेला मतदान होईल हे अवघ्या काही तासांमध्येच आता संपूर्ण देशवासीयांना समजणार आहे. त्यामुळे लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या संपूर्ण भारतीयांचे लक्ष 5 वाजत

ना पंकजाताईंचा गेवराईकरांना सूचक इशारा ; चांगला आणि सर्वांचा लाडका नेता कोण?

Image
ना पंकजाताई मुंडे यांचा गेवराईकरांना सूचक इशारा ; चांगला आणि सर्वांचा लाडका नेता कोण ? लोकांत चर्चा ================================== गेवराई ( प्रतिनिधी ) गेल्या काही महिन्यांपूर्वी तालुक्यातील पंचाळेश्वर येथील कार्यक्रमासाठी आलेल्या पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी जाहीर सभेत बदामराव पंडित सर्वांचे लाडके नेते आहेत. आगामी काळात तुम्हाला आवडणाऱ्या योग्य माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहा असे आवाहन करून बदामराव पंडित यांच्या चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह निर्माण केला . त्यानंतर दिनांक 9 मार्च रोजी झालेल्या गेवराईतील कार्यक्रमात आ लक्ष्मणराव पवार यांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी जाहीर करा म्हणून गोंधळ घालल्याने, संतप्त होऊन त्यांना झापल्यानंतर पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी उमेदवारी जाहीर न करता पक्ष चांगल्या माणसाच्या पाठीशी आहे आणि मैने एक बार कमेंट कर दी तो मै अपने आप की भी नहीं सुनती हा डायलॉग बोलून गेवराई करांना सूचक इशारा दिला आहे.              गेवराई येथे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालक मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थिती

भाजपच्या स्टेजवर जाऊन आ जयदत्त क्षिरसागर यांना नेमके साधायचे तरी काय?

Image
राष्ट्रवादीचे नेते आ जयदत्त क्षीरसागर यांना भाजपच्या स्टेजवर जाऊन नेमके साधायचे तरी काय? ---------------- बीड ( प्रतिनिधी ) राज्यातील आणि जिल्ह्यातील पक्षनेतृत्वावर नाराज असलेले राष्ट्रवादीचे विधीमंडळातील उपनेते आ जयदत्त क्षीरसागर यांनी  पुन्हा एकदा  भाजपच्या स्टेजवर उपस्थिती लावली  परळी येथील राष्ट्रवादीच्या सभेला उपस्थित न राहणारे  जयदत्त क्षीरसागर यांना भाजपच्या स्टेजवर जाऊन नेमके साधायचे तरी काय ? असा प्रश्न सामान्य मतदारांना पडला आहे.         राष्ट्रीय महामार्ग २११ औरंगाबाद - येडशी या महामार्गाच्या लोकार्पण सोहळा दिनांक  9 मार्च रोजी गेवराई संपन्न झाला यावेळी जाहीर सभाही घेण्यात आली. या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकजाताई मुंडे, खा.प्रीतमताई मुंडे, आ.सुरेश धस, आ.आर.टी.देशमुख, आ.भीमराव धोंडे, आ.संगिताताई ठोंबरे, आ लक्ष्मणराव पवार हे सर्व भाजपचे आमदार उपस्थिती होते. मात्र अचानक पत्रिकेवर आणि कार्यक्रमात नाव नसताना लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात, राष्ट्रवादीचे विधीमंडळातील उपनेते आ. जयदत्त क्षीरसागर दाखल झाले, ते व्यासपीठावर विजरामानही झाले. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या केंद्रीयमंत

"तिकीट जाहीर करा" म्हणणाऱ्या आ पवारांच्या कार्यकर्त्यांना पंकजाताईंनी झापले

Image
"तिकीट जाहीर करा" म्हणणाऱ्या आ पवारांच्या कार्यकर्त्यांना पंकजाताईंनी झापले ================================= "तो मैं आपने आपकी भी नहीं सूनती" -- ना पंकजाताई ================================ बीड ( प्रतिनिधी ) शासकीय कामांच्या शुभारंभासाठी आलेल्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासमोर  गेवराईत "जाहीर करा.. जाहीर करा.. गेवराई चे तिकीट जाहीर करा" म्हणणार्‍या आ लक्ष्मणराव पवार यांच्या कार्यकर्त्यांना पंकजाताईंनी चांगलेच झापले आहे.             राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण आणि टोल नाक्याचा शुभारंभ त्यासोबतच गेवराईत जाहीर सभा घेण्यासाठी भाजपा आ लक्ष्मणराव पवार यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना निमंत्रित करून कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु ऐनवेळी ना गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस या दोन्ही मान्यवर नेत्यांनी आपला दौरा रद्द करत गेवराईकडे पाठ फिरवली. त्यानंतर उपस्थित नागरिकांशी पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी संवाद साधला. त्या भाषण करण्यासाठी उभा राहताच गेवराईतील आ लक्ष्मणराव पव

गेवराईत ना गडकरी आले, ना फडणवीस आ पवारांना धोक्याची घंटा ; पंकजाताईच किंग मेकर

Image
गेवराईत ना गडकरी आले, ना फडणवीस आ पवारांना धोक्याची घंटा ; पंकजाताईच किंग मेकर ============================== "A to Z महाराष्ट्र न्यूज" चे वृत्त खरे ठरले ============================== ==================== बीड ( प्रतिनिधी ) राष्ट्रीय महामार्गाचा आणि टोल नाक्याचा शुभारंभ करुन गेवराईत सभा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री ना नितिन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस येणार असल्याचे आ पवार यांनी जाहीर केले होते.  मात्र दोन दिवसापूर्वीच "A to Z महाराष्ट्र न्यूज" ने  याबाबत वृत्त प्रकाशित करून ना नितिन गडकरी आणि मुख्यमंत्री गेवराईत येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. अखेर  गेवराई ना गडकरी आले ना फडणवीस  केवळ  बीड जिल्ह्यावर प्राबल्य असलेल्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे  यांनीच कार्यक्रमाला उपस्थिती लावली यामुळे या पुढील काळात  आ लक्ष्मणराव पवार यांच्यासाठी ही धोक्याचा घंटा समजली जात आहे. जिल्ह्यात पालकमंत्री पंकजाताईच किंगमेकर असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.          दिनांक 9 मार्च रोजी गेवराई राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण आणि टोल नाक्याच्या शुभारंभासाठी केंद्रीय मंत्री न

"शेतकरी नेते" राजू शेट्टींची जात काढणाऱ्या शरद पवारांचे कार्यकर्ते आढळराव पाटलांनी "कलावंत" अमोल कोल्हेची जात काढताच खवळले

Image
"शेतकरी नेते" राजू शेट्टींची जात काढणाऱ्या शरद पवारांचे कार्यकर्ते आढळराव पाटलांनी "कलाकार" अमोल कोल्हेची जात काढताच खवळले ==================== ====================    मुंबई ( प्रतिनिधी ) शिवसेना खा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या टी व्ही "कलाकार" अमोल कोल्हे यांची जात काढताच, ऊसाच्या भावासाठी आंदोलन करणाऱ्या "शेतकरी नेते" खा राजू शेट्टी यांची जात काढणाऱ्या "जाणता राजा" शरदचंद्र पवार यांचे, धर्मनिरपेक्षतेचा "बुरखा" पांघरलेले कार्यकर्ते अचानक जागे झाले असून, सोशल मीडियावरून आपले मन "मोकळे" करत शिवसेना - भाजप वर तोंडसुख घेताना दिसत आहेत.            शिरूर मतदारसंघांमध्ये लोकसभेला विजयाची हॅटट्रिक करणारे शिवसेनेचे मातब्बर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासात शिरूर मतदारसंघाचा विकासात्मक काय कायापालट तर केला आहेच, परंतु प्रत्येक सामान्य माणसाशी त्यांचे वैयक्तिक संबंध आणि प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून त्या सोडवण्याची पद्धत यामुळे आजही शिरूर मतदारसंघात त्

लक्ष्मण सेनेच्या झेंड्याला गडकरींचा दांडा ना पंकजाताई मुंडेंना आ लक्ष्मण पवारांचा पुन्हा शह

Image
गेवराईत लक्ष्मण सेनेच्या झेंड्याला गडकरींचा दांडा लावून ना पंकजाताई मुंडेंना शह देण्याचा आ लक्ष्मण पवारांचा प्रयत्न ==================================== ●  ना नितीन गडकरींचा दौरा रद्द होण्याची शक्यता ● ==================================== बीड ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच खऱ्या अर्थाने राजकीय टक्कर नेहमीच दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकानिहाय वेगवेगळे नेते काम करत असले तरी परस्परांचे नेतृत्व मान्य करायला ते तयार नाहीत. दुसरीकडे मात्र भाजपाचे सर्व तालुक्यातील आमदार आणि नेते यांच्यावर पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाची छाप आहे. त्यामुळे पक्षातील इतर नेत्यांना जिल्ह्यात आणून ना पंकजाताई मुंढे यांना आव्हान देण्याचे धाडस एव्हाना कुणी करताना दिसत नाही. परंतु गेवराईचे आमदार लक्ष्मणराव पवार यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना आपल्या मतदारसंघात आणून पुन्हा एकदा पालक मंत्री ना पंकजाताई मुंडे यांना शह देण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यात होत आहे. एकंदरीत लक्ष्मण सेनेच्या झेंड्याला ग

गेवराई पं स च्या 7 योजनांसाठी 60 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी -- अभयसिंह पंडित

Image
गेवराई पंचायत समितीच्या 7 योजनांसाठी 60 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी -- अभयसिंह पंडित ==================== पवार व पंडित हे आजी-माजी आमदार तोंडघशी पडले -- बदामराव पंडित ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) ऐन दुष्काळात गेवराई तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी आणि काम करणाऱ्या मजुरांसाठी गेवराई पंचायत समितीने दाखल केलेल्या विविध सात योजनांमधील 2738 कामांना तब्बल 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच सर्व कामे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील असा विश्वास पंचायत समिती सभापती अभयसिंह पंडित यांनी व्यक्त केला. तर विविध कामांमध्ये  राष्ट्रवादीच्या अमरसिंह पंडित  यांनी वेळोवेळी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, तसेच आ लक्ष्मणराव पवार यांनी खोटी कागदपत्रे दाखल करून कार्यकर्त्यांना बोगस बिले उचलण्यासाठी केलेला मदतीचा प्रयत्न शिवसेना सरपंचांनी हाणून पाडला. त्यामुळे पवार व पंडित  हे आजी - माजी आमदार दोघेही  तोंडघशी पडले असल्याचे सांगून, आपण आमदार नसतानाही पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱयांसाठी 60 कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असल्याचे समाधान माजी राज्यमंत्री बदामराव पं

बनावट कागदपत्र दाखल केलेल्या कामाचे कार्यारंभ आदेश काढू नयेत -- बदामराव पंडित

Image
गेवराईतील बनावट कागदपत्र दाखल केलेल्या कामाचे कार्यारंभ आदेश काढू नयेत -- बदामराव पंडित ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांचे बनावट शिक्के व खोट्या सह्या करून ना हरकत व  देखभाल दुरुस्ती प्रमाणपत्र दाखल केलेल्या कामाच्या प्रस्तावाचे कार्यारंभ आदेश काढू नयेत, असे लेखी निवेदन शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी कार्यकारी अभियंता सानप यांना दिले आहे. यामुळे आता या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.             याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांचे खोटे रबरी शिक्के तयार करून बनावट सह्या करून ग्रामविकासासाठी असलेल्या 25/15 च्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्र व  देखभाल दुरुस्ती प्रमाणपत्र बोगस तयार करून प्रस्तावाला जोडले आहेत. या बनावट आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे उपविभागीय अभियंता मार्फत प्रस्ताव दाखल करून, काम न करता बिले लाटण्याचा प्रयत्न काही गुत्तेदारांकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे  यातील काही प्रस्तावातील कामे हे यापूर्वीच डीपीडीसी सारख्या वेगळ्या योजनेतून

25/15 मध्ये घोटाळ्याचा प्रयत्न ; शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचे सरपंचही खडबडून झाले जागे

Image
ना हरकत व देखभाल दुरुस्ती बोगस प्रमाणपत्र जोडल्या प्रकरणी शिवसेनेपाठोपाठ गेवराईतील राष्ट्रवादीचे सरपंचही खडबडून झाले जागे ==================== अभियंता व गुत्तेदारांवर 420 चा गुन्हा दाखल होऊ शकतो ? ==================== गेवराई ( दिनकर शिंदे ) गेवराई तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांचे बनावट रबरी शिक्के मारून व खोट्या सह्या करून 25/ 15 च्या कामासाठी बोगस ना हरकत प्रमाणपत्र आणि देखभाल दुरुस्ती प्रमाणपत्र जोडल्याची तक्रार शिवसेनेच्या 16 सरपंचांनी केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचेही सरपंच खडबडून जागे झाले आहेत. रविवार व सोमवारी महाशिवरात्रीची सुट्टी असल्याने आज दि 5 मार्च रोजी आपापल्या ग्रामपंचायती अंतर्गत कामाची माहिती घेऊन तक्रार तक्रार करणार असल्याचे समजते.   याप्रकरणी संबंधित गुत्तेदार आणि अभियंता यांच्यावर शासनाची फसवणूक करण्यासाठी बनावट कागदपत्र बनवल्या प्रकरणी 420 चे गुन्हे दाखल होऊ शकतात, असे कायदे तज्ञांनी स्पष्ट केले आहे.              याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती अंतर्गत  करण्यात येत असलेल्या 25/15 च्या कामासाठी ला

बदामरांव पंडितांचा फोन, युवराज डोंगरेंची मध्यस्थी आणी मंगरुळ बंधाऱ्यात दोन दिवसात पाणी

Image
बदामरांव पंडितांचा फोन, युवराज डोंगरेंची मध्यस्थी  आणी मंगरुळ बंधाऱ्यात दोन दिवसात पाणी ===================  शेतकर्‍यांनी अखेर आमरण उपोषण सोडले. ==================== गेवराई (प्रतिनिधी) दुष्काळाने होरपळलेल्या व पाणीटंचाईने ग्रासलेल्या शेतकऱ्यांनी पैठणच्या धरणातून गोदावरी नदीवर असलेल्या मंगरूळ बंधाऱ्यात पाणी सोडावे या मागणीसाठी दि 2 मार्च रोजी  आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाला शेतकरी बसताच या सर्कलमधील शिवसेनेचे जि प सदस्य युवराज डोंगरे यांनी त्या स्थळी भेट देऊन उपोषणकर्ते व माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या माध्यमातून संबंधित विभागाला परिस्थितीची कल्पना दिली. दोन दिवसात पाणी सोडण्याचे लेखी देण्यास भाग पाडल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.           यावर्षी निसर्गाने पाठ फिरवल्याने बीड जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ पसरला आहे. यात सर्वत्र पाणीटंचाईने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. चारा तर नाहीच पण पाणी मिळणेही कठीण झाले आहे.  शेतकऱ्यांवर आपल्या हक्काचे आणि सोयीचे पाणी मिळविण्यासाठी आमरण उपोषणास बसण्याची वेळ आली. यासाठी गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या काठोडा, राजापुर,

गेवराई तालुक्यातील 25/15 च्या कामातील होणारा भ्रष्टाचार शिवसेनेच्या सरपंचांनी उघडकीस आणला

Image
बोगस नाहरकत जोडून, मंजूर कामावर दुसऱ्यांदा काम टाकून बोगस बिले उचलण्याचा गेवराईत प्रयत्न ; शिवसेनेच्या सरपंचांनी केली तक्रार  =================== उपविभागीय अभियंता व गुत्तेदाराचे संगनमत उघडकीस ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या कामांसाठी संबंधित ग्रामपंचायतचे बोगस नाहरकत प्रमाणपत्र व देखभाल दुरुस्ती प्रमाणपत्र जोडून एकदा मंजूर झालेल्या कामावर पुन्हा दुसऱ्यांदा काम टाकून बोगस बिले उचलून भ्रष्टाचार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुत्तेदार व उपविभागीय अभियंता यांच्या विरुद्ध शिवसेनेच्या सरपंचांनी लेखी तक्रार दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून कार्यकारी अभियंता यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून पुन्हा माहिती कळविण्याचे आदेश उपविभागीय अभियंता गेवराई यांनाच दिले आहेत.            याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या कामांना संबंधित ग्रामपंचायतीकडून रीतसर ना हरकत प्रमाणपत्र न घेता, संबंधित 25/15 मधील कामांना बोगस ना हरकत प्रमाणपत्र जोडून कामाची मागणी करण्याचा आणि ती मंजूर करण्य