गेवराईतील वखारच्या गोदामाला आग; कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक ; दुष्काळात तेरावा..!

गेवराईतील वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेल्या आगीत
कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक ;  दुष्काळात तेरावा..!
====================

  गेवराई ( प्रतिनिधी )
शहरातील शासकीय वखार महामंडळाच्या गोडाऊनला आग लागून पंधरा कोटी 46 लाख रुपयांचे नुकसान झाले असून ही आग आकरा तासानंतर आटोक्यात आली.ही आग नेमकी कशामुळे याची माहिती मिळाली नाही.परंतु यामध्ये कापसाचे गठाण, तूर,सोयबीन याचे नुकसान झाले आहे.
 गेवराई शहरातील शासकिय वखार महामंडळाचे चार गोडाऊन आहेत.यामध्ये 31 कोटी 63 लाख 53 हजार रुपये किमतीचा माल आहे.यापैकी दि 10 मार्च रविवार रोजी रात्री दीड वाजेनेच्या सुमारास गोडाऊन नंबर चारला अचानक आग लागली.ही आग नेमकी कशामुळे लागली याचा प्राथमिक अंदाज देखील सांगता येत नाही. याचे कारण म्हणजे या ठिकाणी वीज देखील उपलब्ध नाही. परंतु या लागलेल्या आगीत गोडाऊनमध्ये सीसीआयच्या कापसाच्या 1208 गठन ज्याची किंमत 2 कोटी 5 लाख, खाजगी वखार महामंडळाच्या ठेवींवरील 5100 गठन ज्याची किंमत 10 कोटी, नाफेडची तूर 3400 पोते ज्याची किंमत 1 कोटी व खाजगी तूर 1 लाख 81 हजार रुपये तसेच गोडाऊन नुकसान दीड कोटी रुपये असे एकूण 15 कोटी 46 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. ही आग विजवण्यासाठी रात्री पासून अग्निशामक दल गेवराईच्या दोन गाड्या, औरंगाबाद येथून एक गाडी, जालना येथून एक गाडी व पाणी पुरवठा करणारे बारा टँकर प्रयत्न करत होते.परंतु ही आग विजवण्यासाठी आकरा तास लागले.यावेळी यामध्ये ठेवण्यात आलेला माल जळून खाक झाला आहे. अगोदरच दुष्काळी स्थितीमुळे अन्नधान्याचे उत्पादन घटलेल्या गेवराई तालुक्यात वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....