भाजपच्या स्टेजवर जाऊन आ जयदत्त क्षिरसागर यांना नेमके साधायचे तरी काय?

राष्ट्रवादीचे नेते आ जयदत्त क्षीरसागर यांना भाजपच्या स्टेजवर जाऊन नेमके साधायचे तरी काय?
----------------
बीड ( प्रतिनिधी ) राज्यातील आणि जिल्ह्यातील पक्षनेतृत्वावर नाराज असलेले राष्ट्रवादीचे विधीमंडळातील उपनेते आ जयदत्त क्षीरसागर यांनी  पुन्हा एकदा  भाजपच्या स्टेजवर उपस्थिती लावली  परळी येथील राष्ट्रवादीच्या सभेला उपस्थित न राहणारे  जयदत्त क्षीरसागर यांना भाजपच्या स्टेजवर जाऊन नेमके साधायचे तरी काय ? असा प्रश्न सामान्य मतदारांना पडला आहे.
        राष्ट्रीय महामार्ग २११ औरंगाबाद - येडशी या महामार्गाच्या लोकार्पण सोहळा दिनांक  9 मार्च रोजी गेवराई संपन्न झाला यावेळी जाहीर सभाही घेण्यात आली. या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकजाताई मुंडे, खा.प्रीतमताई मुंडे, आ.सुरेश धस, आ.आर.टी.देशमुख, आ.भीमराव धोंडे, आ.संगिताताई ठोंबरे, आ लक्ष्मणराव पवार हे सर्व भाजपचे आमदार उपस्थिती होते. मात्र अचानक पत्रिकेवर आणि कार्यक्रमात नाव नसताना लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात, राष्ट्रवादीचे विधीमंडळातील उपनेते आ. जयदत्त क्षीरसागर दाखल झाले, ते व्यासपीठावर विजरामानही झाले. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दौरा रद्द केला. याची लोकांमध्ये चर्चा होत असतानाच नेमकी राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थित कसे हाही प्रश्न उपस्थित चव्हाण चवीने चर्चेत होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्ह्यातील परळी येथील समारोपाच्या सभेला गैरहजर राहणारे आमदार जयदत्त क्षीरसागर नेमके भाजपच्या स्टेजवर उपस्थित राहून त्यांना साधायचे  काय ? असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे. यावरून जयदत्त क्षीरसागर हे लवकरच राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र घालून भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता राजकीय व्यक्त होत असली तरी, शिवसेना-भाजप युती झाल्याने नेमकी बीडची जागा कोणाला सुटते ?  यावरच आमदार क्षीरसागर यांची भूमिका  ठरणार हे नक्की.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....