गेवराईत ना गडकरी आले, ना फडणवीस आ पवारांना धोक्याची घंटा ; पंकजाताईच किंग मेकर

गेवराईत ना गडकरी आले, ना फडणवीस
आ पवारांना धोक्याची घंटा ; पंकजाताईच किंग मेकर
==============================
"A to Z महाराष्ट्र न्यूज" चे वृत्त खरे ठरले
==============================

====================
बीड ( प्रतिनिधी ) राष्ट्रीय महामार्गाचा आणि टोल नाक्याचा शुभारंभ करुन गेवराईत सभा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री ना नितिन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस येणार असल्याचे आ पवार यांनी जाहीर केले होते.  मात्र दोन दिवसापूर्वीच "A to Z महाराष्ट्र न्यूज" ने  याबाबत वृत्त प्रकाशित करून ना नितिन गडकरी आणि मुख्यमंत्री गेवराईत येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. अखेर  गेवराई ना गडकरी आले ना फडणवीस  केवळ  बीड जिल्ह्यावर प्राबल्य असलेल्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे  यांनीच कार्यक्रमाला उपस्थिती लावली यामुळे या पुढील काळात  आ लक्ष्मणराव पवार यांच्यासाठी ही धोक्याचा घंटा समजली जात आहे. जिल्ह्यात पालकमंत्री पंकजाताईच किंगमेकर असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
         दिनांक 9 मार्च रोजी गेवराई राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण आणि टोल नाक्याच्या शुभारंभासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री पंकजाताई मुंडे येणार असल्याचे जाहीर करून आमदार लक्ष्मणराव पवार यांनी कार्यक्रमाची पूर्ण तयारी केली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागताचे डिजिटल बोर्डही लावण्यात आले होते. हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड तयार केला होता तर सभेसाठी भव्य स्टेज उभारण्यात आले होते. परंतु ऐनवेळी गेवराई, ना गडकरी आले ना फडणवीस. फक्त पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनीच कार्यक्रमाला उपस्थिती लावली. ना नितीन गडकरी यांनी केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकांशी संवाद साधला. यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. नामदार नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी तयार होऊन बसलेल्या आ पवार यांच्या कार्यकर्त्यांचा मूड हाफ झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या बाबत "A to Z महाराष्ट्र न्यूज"  ने, याबाबत वृत्त प्रकाशित करून "नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द होऊ शकतो",  असे स्पष्ट म्हटले होते आणि झालेही तसेच. यामुळे A to Z महाराष्ट्र न्यूज च्या वृत्ताची विश्वासार्हता अधिक वाढली आहे. ऐनवेळी दौरा रद्द करून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेवराईत न आल्याने ही भाजप आ लक्ष्मणराव पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा असून युतीत शिवसेनेसाठी गेवराई हा मतदारसंघ सुटला असल्यानेच भाजपचे दोन्ही मातब्बर नेते कार्यक्रमाला आले नसल्याचे शिवसैनकातून बोलले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....