बदामरांव पंडितांचा फोन, युवराज डोंगरेंची मध्यस्थी आणी मंगरुळ बंधाऱ्यात दोन दिवसात पाणी



बदामरांव पंडितांचा फोन, युवराज डोंगरेंची मध्यस्थी
 आणी मंगरुळ बंधाऱ्यात दोन दिवसात पाणी
===================
 शेतकर्‍यांनी अखेर आमरण उपोषण सोडले.
====================
गेवराई (प्रतिनिधी)
दुष्काळाने होरपळलेल्या व पाणीटंचाईने ग्रासलेल्या शेतकऱ्यांनी पैठणच्या धरणातून गोदावरी नदीवर असलेल्या मंगरूळ बंधाऱ्यात पाणी सोडावे या मागणीसाठी दि 2 मार्च रोजी  आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाला शेतकरी बसताच या सर्कलमधील शिवसेनेचे जि प सदस्य युवराज डोंगरे यांनी त्या स्थळी भेट देऊन उपोषणकर्ते व माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या माध्यमातून संबंधित विभागाला परिस्थितीची कल्पना दिली. दोन दिवसात पाणी सोडण्याचे लेखी देण्यास भाग पाडल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
          यावर्षी निसर्गाने पाठ फिरवल्याने बीड जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ पसरला आहे. यात सर्वत्र पाणीटंचाईने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. चारा तर नाहीच पण पाणी मिळणेही कठीण झाले आहे.  शेतकऱ्यांवर आपल्या हक्काचे आणि सोयीचे पाणी मिळविण्यासाठी आमरण उपोषणास बसण्याची वेळ आली. यासाठी गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या काठोडा, राजापुर, गंगावाडी, मनूबाई जवळा, राहेरी, मंगरुळ, भोगगाव, तलवाडा या गावच्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी दि 2 मार्च रोजी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आणि तात्काळ या गटाचे जिल्हा परिषद सदस्य युवराज डोंगरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत आपला पाठिंबा दर्शवला.  शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांना भ्रमणध्वनी केला. बदामराव पंडित यांनी संबंधित विभागाला धारेवर धरत दुष्काळाची दाहकता व पाणी सोडण्याची गरज याविषयी कल्पना देऊन उपोषणकर्ते व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचे बोलणे करून दिले. दोन दिवसात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देण्यास भाग पाडले.  शेवटी  गोदाकाठच्या 10 गावांनी उपोषण मागे घेतले. यामुळे मंगरूळच्या बंधाऱ्यात लवकरच पाणी सोडले जाईल, हा विश्वास वाढल्याने बदामराव पंडित यांचा फोन युवराज डोंगरे यांची मध्यस्थी कामी आल्याने त्यांचे गोदाकाठच्या गावांनी आभार मानले आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....