ना पंकजाताईंचा गेवराईकरांना सूचक इशारा ; चांगला आणि सर्वांचा लाडका नेता कोण?

ना पंकजाताई मुंडे यांचा गेवराईकरांना सूचक इशारा ; चांगला आणि सर्वांचा लाडका नेता कोण ? लोकांत चर्चा
==================================

गेवराई ( प्रतिनिधी ) गेल्या काही महिन्यांपूर्वी तालुक्यातील पंचाळेश्वर येथील कार्यक्रमासाठी आलेल्या पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी जाहीर सभेत बदामराव पंडित सर्वांचे लाडके नेते आहेत. आगामी काळात तुम्हाला आवडणाऱ्या योग्य माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहा असे आवाहन करून बदामराव पंडित यांच्या चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह निर्माण केला . त्यानंतर दिनांक 9 मार्च रोजी झालेल्या गेवराईतील कार्यक्रमात आ लक्ष्मणराव पवार यांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी जाहीर करा म्हणून गोंधळ घालल्याने, संतप्त होऊन त्यांना झापल्यानंतर पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी उमेदवारी जाहीर न करता पक्ष चांगल्या माणसाच्या पाठीशी आहे आणि मैने एक बार कमेंट कर दी तो मै अपने आप की भी नहीं सुनती हा डायलॉग बोलून गेवराई करांना सूचक इशारा दिला आहे.
             गेवराई येथे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालक मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत सभा होणार असल्याने भाजपाचे वरिष्ठ नेते विकी झाल्यानंतर उमेदवारीबद्दल गेवराईत काय बोलतात याची आतुरतेने असल्याने या कार्यक्रमाला जिल्ह्यातून लोक आले होते. परंतु नामदार नितिन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला येथील की नाही याबाबत शंका घेतली जात होती  आणि घडलेही तसेच ऐनवेळी दोघांनीही आपला कार्यक्रम व दौरा रद्द केला. यावेळी सभेला संबोधित करताना पालक मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ना नितीन गडकरी यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यात पंकजाताई सारखे खंबीर नेतृत्व असताना मला तिकडे येण्याची गरज काय ? कारण त्यांना माहित आहे बीड जिल्हा सांभाळायला ही पंकजा मुंडे मजबूत आहे. इथले निर्णय घ्यायला खंबीर आहे. या वेळी आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून आमदार पवार यांना तिकीट जाहीर करण्याची मागणी केली. यावेळी चिडलेल्या पंकजाताई मुंडे यांनी त्यांना शेलक्या भाषेत झापले. येडे कुठले ? पागल आहात काय? राज्यात तुमच्यासारखी वेडे मी कुठे पाहिले नाहीत, विनाकारण आपल्या नेत्याचे वाटोळ करून घेऊ नका. अशा शब्दात त्यांची खरडपट्टी केली. यावेळी आमदार पवार यांनीही ही त्यांच्याजवळ जाऊन आपल्याला उमेदवारी जाहीर करण्याची विनंती केली मात्र त्यांच्याकडेही लक्ष न देता पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, पक्ष चांगल्या माणसाच्या पाठीशी उभा राहील. परंतु तालुक्यातील पांचाळेश्वर येथे विकास कामाच्या शुभारंभासाठी आलेल्या पंकजाताई मुंडे यांनी हजारो लोकांसोबत समोर बोलताना बदामराव पंडित हे लोक नेते असून ते सर्वांचे लाडके नेते आहेत. यापुढील काळात आपल्या आवडत्या नेत्या च्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा असे आवाहन त्यांनी केले होते. त्या आणि 9 तारखेच्या कार्यक्रमातील दोन्ही आवाहनाचा संबंध असून पंकजाताई मुंडे यांनी गेवराईकरांना येत्या विधानसभा निवडणुकीसाठी सूचक इशारा दिल्याचे जनसामान्यांमधून बोलले जात आहे. याबाबत दैनिक पार्श्वभूमी आणि दैनिक कार्यारंभ या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या वरील बातम्या पाहता नेमका इशारा काय होता, हे न समजण्याइतकी गेवराईची जनता दुधखुळी नाही हे नक्की.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....