चालत्या बसचा टप कोसळला ; प्रवाशी बालंबाल बचावले ; सुरक्षा दक्षता विभाग काय करतो ?

बसचा टप अचानक कोसळला ; प्रवाशी बालबाल बचावले 
कोठे आहे सुरक्षा दक्षता विभाग ? संतप्त प्रवाशांचा सवाल

--------------------------------------
गेवराई  (प्रतिनिधी ) येथील  स्थानकात प्रवेश करीत असताना अचानक बस वरील टप सटकून  खाली पडला. यावेळी रस्त्यावर चालणारे प्रवासी जवळ नसल्याने कोणालाही इजा झाली नाही. यावेळी मोठा अनर्थ टळला असला तरी  या घटनेला जबाबदार कोण? आशा घटना का टळू शकत नाहीत ? असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
              याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई बसस्थानकामध्ये बस क्रमांक एम एच 20 18 16  ही बस  जात असताना  अचानक तिच्या टपावर असलेली  पाईप ची पूर्ण जाळी  अचानक सटकून खाली पडली  नशीब म्हणजे  यावेळी आजूबाजूला रस्त्यावर चालणार्‍या प्रवाशांची वर्दळ कमी होती  मोठ्या आकारात आणि भारी वजनदार जाळी  खाली जाणाऱ्या प्रवाशांच्या  अंगावर पडली असती  तर मोठी दुर्दैवी घटना  घडू शकली असती. बस स्टॉप खाली कोसळून पडला तर काही बस च्या खिडक्या खिळखिळ्या अवस्थेत आढळून येत आहेत. तसेच वाहन चालकाच्या गाडी चालवताना बसण्यासाठी असलेल्या आसनांना कुशन ऐवजी केवळ पट्ट्या बांधलेल्या आढळतात. अनेक बसचे बिकट हाल झाले आहेत. एकीकडे शिवशाही ही सुसज्ज आणि ए सी असलेली गाडी रस्त्यावर धावत आहे . मात्र दुसरीकडे ग्रामीण भागाची धमणी म्हणून ओळखली जाणारी लाल परी म्हणजेच एसटी बस अशा अवस्थेत असेल तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
       गेवराईतील सुरक्षा दक्षता विभाग कोठे आहे? जो स्वतंत्र देखरेख ठेवण्यासाठी निर्माण केला आहे. ज्या गोष्टीची देखरेख ठेवणे अपेक्षित आहे, त्याची काळजी ठेवली जात नाही. सर्रास खीळ खिळ्या झालेल्या बस ग्रामीण मार्गावर बळचच चालकाच्या हाती दिल्या जात आहेत आणि त्या धावत आहेत. चालकाने नकार दिला तर त्यांना नोटीस दिली जाते. या नोटिसच्या  भिती पोटी चालक देखील त्या गाड्या घेत आहेत. वरील घटनेत जर प्रवाश्यांना काही झाले असते तर याची जवाबदारी कोणी घेतली असती ? हा प्रश्न गंभीर आहे. या खिळखिळया झालेल्या बस चांगल्या प्रकारे सुस्थितीत कराव्यात. जेणे करून अशा दुर्दैवी घटना घङनार नाहीत. संबंधित विभागाने या कङे लक्ष देऊन, चांगल्या प्रकारे बस द्वारे उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी प्रवासी करत आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....