जिजाऊ ब्रिगेडने आनाथ महिलांना सदभावनेने साड्या भेट देऊन साजरा केला जागतिक महिला दिन

आनाथ महिलांना सदभावनेने साड्या भेट देऊन
जिजाऊ ब्रिगेडने साजरा केला जागतिक महिला दिन
====================
महिलांचा सन्मान करणे ही काळाची गरज -- सौ अनिता नितीन भोसले

====================
बीड ( प्रतिनिधी ) महिलांना सन्मान देणे ही आज काळाची गरज आहे. कारण आई, बहीण, पत्नी आणि मुलगी या नात्यांमुळेच आज प्रत्येक घरात स्नेह, आपुलकी आणि जिव्हाळा जिवंत असल्याचे प्रतिपादन जिजाऊ महिला ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षा सौ अनिता नितीन भोसले यांनी केले आहे.
         मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अनाथ व गरजू महिलांना सदभावनेने आणि सन्मानाने साड्या भेट देऊन जागतिक महिला दिन उत्साहात  साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी सौ भोसले बोलत होत्या. राष्ट्रमाता जिजाऊ,  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरू झालेल्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आश्रम शाळेचे समुपदेशक उमेश होमकर, तर जिजाऊ ब्रिगेडच्या बीड शहराध्यक्ष सुचेता माने, सुजाता माने,  प्रा नितीन भोसले, मराठा सेवा संघाचे गेवराई तालुका प्रसिद्धीप्रमुख विनायक उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना जिजाऊ ब्रिगेडच्या बीड जिल्हा कार्याध्यक्ष अनीता भोसले म्हणाल्या की, महिला या प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर चाललेल्या आहेत. त्यांना पुरुषांचा पाठिंबा हवा असून महिलांना सन्मानाची वागणूक देणे हे पुरुषांचं कर्तव्य आहे. कुटुंबातील कलह शमविण्याची आणि अडीअडचणीवर संयमी,  खंबीरपणे मात करण्याची ताकद खऱ्या अर्थाने महिलांमध्येच आहे. आज आपल्या हातून, समाजातील गरजू महिलांना साड्या वाटून गौरव करण्यात आला हे आपले परमभाग्य असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळ आश्रमातील महिलांना साडीवाटप करून जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने गौरविण्यात आले. कार्यक्रमाला जाधव मॅडम यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....