लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले ; आपल्या राज्यात मतदान कधी?

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले
====================

दिल्ली ( प्रतिनिधी )
जगात सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारतातील लोकसभेच्या निवडणुका केव्हा जाहीर होतात याकडे संपूर्ण देशाचे आणि जगाचे लक्ष
लागले होते. दिनांक 9 मार्च रोजी निवडणूक आयोगाने बैठक घेतली तेव्हाच सर्वांना वाटले की, आता निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागेल. परंतु निवडणूक आयोगाने संभाव्य लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आणि बैठक संपली. परंतु आज दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता निवडणूक आयोगाची बैठक होणार असून या बैठकीमध्ये लोकसभा निवडणूकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशात 6 ते 9 टप्प्यांमध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता असून, यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये धावपळ उडाली आहे. आता सर्वच पक्षांना आपापल्या पक्षांचे उमेदवार येत्या 2 ते 3 दिवसात जाहीर करावे लागतील आणि उमेदवारीबाबत असलेला  सस्पेन्स आता उठावावाच लागणार आहे. कोणत्या राज्यात किती तारखेला मतदान होईल हे अवघ्या काही तासांमध्येच आता संपूर्ण देशवासीयांना समजणार आहे. त्यामुळे लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या संपूर्ण भारतीयांचे लक्ष 5 वाजता होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या बैठकीकडे लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....