छत्रपती मल्टीस्टेटच्या महिला दिन सप्ताहानिमित्त, योजनेस महिलांकडून प्रचंड प्रतिसाद

छत्रपती मल्टीस्टेटच्या महिला दिन सप्ताहानिमित्त
जाहीर केलेल्या योजनेस महिलांकडून प्रचंड प्रतिसाद
====================

==============================
गेवराई ( प्रतिनिधी ) येथील अल्पवधीत लोकांच्या पसंतीला उतरलेल्या छत्रपती मल्टीस्टेट बँक आपल्या विविध योजना राबवून ग्राहकांना नेहमीच आकर्षित केले आहे. महिला दिन सप्ताहाचे आयोजन करून छत्रपती मल्टीस्टेटने जाहीर केलेल्या महिलांसाठीच्या नवीन योजनेला जिल्ह्यातील महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
           चेअरमन संतोष भंडारी यांनी छत्रपती मल्टीस्टेटच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात टाकलेले पाऊल, आता प्रगतीपथावर असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांसाठी सुलभ आर्थिक बचत करणाऱ्या विविध योजना छत्रपती मल्टीस्टेटच्या वतीने राबविण्यात येत असल्याने, हजारो खातेदार आणि कोट्यवधी रुपयांची ठेवी या मल्टीस्टेट मध्ये जमा आहेत. त्या तुलनेत कर्जपुरवठाही मोठ्या प्रमाणावर करून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कामही छत्रपती मल्टीस्टेटने प्रामाणिकपणे सुरू केले आहे. राज्यातील बीड, पुणे, औरंगाबाद, जालना, अहमदनगर अशा विविध जिल्ह्यांमध्ये शाखांचे जाळे निर्माण करून जवळपास 40 हजार कुटुंबाचा परिवार करण्याचा संकल्प चेअरमन संतोष भंडारी यांनी व्यक्त केलेला आहे. शंभर शाखा स्थापन करून 5 हजार तरुणांना रोजगार देण्याचा त्यांचा मानस आहे. नुकत्याच महिला दिनानिमित्त दिनांक 8 मार्च ते 15 मार्च दरम्यान महिला दिन सप्ताहाचे आयोजन करून मुलींना आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी छत्रपती मल्टीस्टेट मध्ये 99 रुपयांमध्ये बचत खाते उघडण्यात येत आहे. त्याचबरोबर महिलांच्या नावे ठेवींवर एक टक्का जास्त व्याजदर आणि एक लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स देण्याचेही छत्रपती मल्टीस्टेटने जाहीर केले आहे. ग्राहकांच्या विश्वास आणि पसंतीला उतरल्याने इतर योजनाप्रमाणे या योजनेलाही जिल्ह्यातील  महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. आणखी पाच दिवस ही योजना सुरू असून जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांनी आपल्या भविष्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमन संतोष भंडारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....