गेवराई तालुक्यातील 14 ग्रा पं इमारतीच्या बांधकामास मंजुरी


मा बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रा पं योजनेतून

गेवराई तालुक्यातील 14 ग्रा पं इमारतीच्या बांधकामास मंजुरी
====================
बीड जिल्ह्यातील 108 ग्रा पं इमारतीस मंजुरी
====================

गेवराई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या आणि ग्रामीण भागातील विकासासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सूचित केलेल्या मा बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत राज्यातील 538 ग्रामपंचायतीच्या बांधकामास मंजुरी मिळाली असून, त्यापैकी 108 बीड जिल्ह्यात तर गेवराई तालुक्यातील 14 ग्रामपंचायतच्या इमारती आता सुसज्ज होणार आहेत.
         गावाच्या विकासाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतीच्या इमारती सर्व सोयींयुक्त सुसज्ज असल्या पाहिजेत ही भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी मांडली. त्यांच्या  सूचनेनंतर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या मा बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत  बांधणी योजनेअंतर्गत ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी राज्यातील 538 ग्रामपंचायतीच्या बांधकामास मंजुरी दिली आहेत. यापैकी एकट्या बीड जिल्ह्यात 108 तर गेवराई तालुक्यात 14 ग्रामपंचायतीच्या इमारती सुसज्ज होणार आहेत. या 14 ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये नांदगाव, वसंत नगर तांडा, उक्कड पिंपरी, वाहेगाव आम्ला, मन्यारवाडी, गंगावाडी, ठाकर आडगाव, महारटाकळी, रानमळा, भोजगाव, कुम्भेजळगाव, आहेर वाहेगाव, तळणेवाडी आणि मादळमोही यांचा समावेश आहे. सदर इमारतीच्या बांधकामाचा निधी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे, अवर सचिव, महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभाग यांनी कळवले आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....