"शेतकरी नेते" राजू शेट्टींची जात काढणाऱ्या शरद पवारांचे कार्यकर्ते आढळराव पाटलांनी "कलावंत" अमोल कोल्हेची जात काढताच खवळले

"शेतकरी नेते" राजू शेट्टींची जात काढणाऱ्या शरद पवारांचे कार्यकर्ते
आढळराव पाटलांनी "कलाकार" अमोल कोल्हेची जात काढताच खवळले
====================

====================
   मुंबई ( प्रतिनिधी ) शिवसेना खा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या टी व्ही "कलाकार" अमोल कोल्हे यांची जात काढताच, ऊसाच्या भावासाठी आंदोलन करणाऱ्या "शेतकरी नेते" खा राजू शेट्टी यांची जात काढणाऱ्या "जाणता राजा" शरदचंद्र पवार यांचे, धर्मनिरपेक्षतेचा "बुरखा" पांघरलेले कार्यकर्ते अचानक जागे झाले असून, सोशल मीडियावरून आपले मन "मोकळे" करत शिवसेना - भाजप वर तोंडसुख घेताना दिसत आहेत.
           शिरूर मतदारसंघांमध्ये लोकसभेला विजयाची हॅटट्रिक करणारे शिवसेनेचे मातब्बर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासात शिरूर मतदारसंघाचा विकासात्मक काय कायापालट तर केला आहेच, परंतु प्रत्येक सामान्य माणसाशी त्यांचे वैयक्तिक संबंध आणि प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून त्या सोडवण्याची पद्धत यामुळे आजही शिरूर मतदारसंघात त्यांचे प्राबल्य आहे. आज पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा शरदचंद्र पवार आणि महाराष्ट्रातले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची  वेळोवेळी भाषा केली मात्र अध्याप कधीच लढले नाहीत. यावेळीही अजित पवारांनी खा आढळराव पाटील यांचे विरुद्ध दंड थोपटण्याची भाषा केली मात्र काकांच्या सूचनेनंतर तेही शांत झाले. आढळराव पाटील यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा असेल तर त्यांच्याच पक्षाचा एखादा उमेदवार आयात करावा आणि तो उभा करावा ही भूमिका डोक्यात घेऊन, शिवसेनेचे नेते आणि टी व्ही कलाकार डॉ अमोल कोल्हे यांना शरदचंद्र पवार यांनी आपल्या पक्षात घेतले. डॉ कोल्हे हे लोकसभेचे संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चाही सुरू झाली. टी व्ही वरील गाजत असलेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत चांगली वटवून चर्चेत आलेले आणि शिवसेनेत असताना एकनिष्ठतेचे उपदेश देणारे डॉ अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच, खा आढळराव पाटील यांनी त्यांच्यावर घणाघाती टीका करून ते मराठा नसून माळी असल्याचे सांगीतले. त्यामुळे जाणता राजा शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरलेले कार्यकर्ते अचानक खडबडून जागे झाले. आढळराव पाटील यांनी आमच्या नेत्याची जात काढली असे म्हणत सोशल मीडियावर आपली मने मोकळी करत, शिवसेना-भाजपवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे. विशेषतः ही आग पाखड करताना काही अपवाद वगळता, मराठा समाजातील कार्यकर्तेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढे होताना दिसत आहेत. यावेळी हे कार्यकर्ते  विसरले की, आपले राष्ट्रीय नेते, जाणता राजा खा शरदचंद्र पवार साहेब यांनीही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरलेल्या  शेतकऱ्यांचे लढवय्या नेते खा राजू शेट्टी यांचीही जात काढली होती. शेतकऱ्यांच्या उसाला हमीभाव द्या आणि उसाचे पेमेंट तात्काळ करा या मागणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे राज्यात आणि देशात सरकार  असताना, शेतकरी नेते खा राजू शेट्टी यांनी गावोगाव जाऊन शेतकऱ्यांना जागृत करून आघाडी सरकार आणि साखर कारखान्या विरोधात मोठे आंदोलन उभे केले होते. अनेक कारखानेही बंद पाडले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री असलेल्या खा शरद पवार यांना घ्यावी लागली. जेव्हा खा राजू शेट्टी यांनी खा शरद पवार यांच्या विरोधातच माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली, तेव्हा मात्र राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आणि आपण निवडणूक लढणार नसल्याचे पवार साहेबांनी जाहीर केले होते. यावेळी खा शरदचंद्र पवार यांनी कारखान्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या खा राजू शेट्टी यांची जात आणि कारखानदारांची जात ही वेगळी असल्यानेच ते आंदोलन करीत असल्याचे जाहीर सभेत सांगितले होते. यावेळी मात्र अठरापगड जाती सोबत असल्याचे सांगणारे आणि धर्मनिरपेक्ष म्हणून फिरणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र तेव्हा मूग गिळून गप्प बसले. एकंदरीत काय तर आज जात काढल्याशिवाय राजकारण होत नाही आणि राजकारणात जात दाखवल्याशिवाय निवडून येता येत नाही. अशी नेत्यांची आणि  कार्यकर्त्यांची मनस्थिती झाली असल्याचे दिसते आहे. वास्तविक पाहता सामान्य माणूस आणि मतदार यात भरडला जातोय. त्यांच्या प्रश्नांचे काय ? त्यांच्या प्रश्नांकडे सहजासहजी कोणी पाहताना दिसत नाही. हे त्यांच्या दृष्टीने आज  सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.
■■■◆◆●

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....