कोठेही तडजोड करू पण गेवराईत बदामराव पंडितच शिवसेनेचे आमदार होतील -- आनंदराव जाधव

युतीची राज्यात कोठेही तडजोड करू पण..
गेवराईत बदामराव पंडित हेच शिवसेनेचे आमदार होतील -- आनंदराव जाधव
====================


गेवराई ( प्रतिनिधी )  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात सर्वप्रथम गेवराईतून बदामराव पंडित यांना शिवसेनेचा आमदार करून नामदार  करण्याचा राज्यात सर्वप्रथम शब्द दिला आहे. त्यामुळे राज्यात युतीची कोठेही तडजोड करू, पण बीड जिल्ह्यातील गेवराई मतदार संघ शिवसेनेचाच राहील आणि बदामराव पंडित हेच शिवसेनेचे प्रचंड मताने आमदार होतील असा दृढ विश्वास शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.
           लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष संघटन मजबूत तिचा आढावा घेण्यासाठी गेवराई येथे दिनांक 18 मार्च रोजी जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांची व्यापक बैठक घेतली याप्रसंगी ते बोलत होते बैठकीस माजी राज्यमंत्री बदामराव पंडित जिल्हाप्रमुख  कुंडलिक खांडे सभापती अभयसिंह पंडित युवा नेते रोहित पंडित माजी सभापती पंढरीनाथ लगड जि प सदस्य युवराज डोंगरे गटनेते बापूराव चव्हाण तालुकाप्रमुख  कालिदास नवले आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवसेना तालुका उपप्रमुख दिनकर शिंदे यांनी केले यावेळी बोलताना जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव म्हणाले की गेवराई तालुक्यात बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे संघटन अत्यंत मजबूत आणि तळागळापर्यंत ग्रामीण भागातील घराघरापर्यंत पोहोचलेले आहे सर्वसामान्यांच्या मदतीला सहज उपलब्ध होत असल्याने बदामराव आबा यांच्या पाठीशी सर्वसामान्य मतदार खंबीरपणे उभा आहे गेवराई विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा भाग आहेच परंतु बीड या मतदारसंघात सह आणखी एक मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेला घेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगून येत्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक शिवसैनिकांनी बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात आघाडी घ्यावी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बहीण मानलेल्या ना पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून, बीडच्या युतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताने खासदार म्हणून विजय करावे असे आवाहन केले. कोणतीही शंका-कुशंका मनात न ठेवता हातात भगवा घेऊन कामाला लागा गेवराई तून शिवसेनेचे बदामराव पंडित हेच आमदार होणार असून बीडचा खासदारही भाजप- शिवसेना युतीचाच असेल असा दृढ विश्वास संपर्कप्रमुख अंगदराव जाधव यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना बदामराव पंडित यांनी, बीड लोकसभा मतदार संघाच्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार प्रीतमताई मुंडे यांना गेवराई विधानसभा मतदारसंघातून आम्ही सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करू अशी स्पष्ट ग्वाही दिली. जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होत असून, येणाऱ्या काळात युतीच्या प्रत्येक विजयामध्ये शिवसेना आणि शिवसैनिक सहभागी असतील असे म्हटले. यावेळी पंढरीनाथ लगड, युवराज डोंगरे, अशोक आठवले यांचीही समयोचित भाषणे झाली.
 बैठकीस अंकुशराव मस्के, उपसभापती भीष्माचार्य दाभाडे, गहिनीनाथ ढाकणे, महादेव औटी, मुकुंद बाबर, माजी उपनगराध्यक्ष आजमखान पठाण, चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र बोराडे, भास्करराव कचरे, सय्यद मुस्ताकिम, उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे शहर प्रमुख शिनुभाऊ बेदरे, गणेश चव्हाण, सुनील चव्हाण, युवासेना तालुका अधिकारी साहिल देशमुख, विद्यार्थी कक्ष जिल्हा अधिकारी शेखर शिंदे, बंडू आप्पा घोलप, प्रभाकर लांडे, सुभाष शिंदे, शिवाजीराव डोंगरे, अशोक वंजारे, प्रतापसिंह पाटील, जहुर काझी, सुनील राऊत, अंगतराव तौर, महादेव सुरवसे, विलास शिंदे, रमेश लाड, गोविंद लाड, राम वारांगे, आदींसह शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....