लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे 11 उमेदवार जाहीर

लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे 11 उमेदवार जाहीर
=================================

मुंबई ( प्रतिनिधी )
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.  सुप्रिया सुळे - बारामती, उदयनराजे - सातारा, सुनील तटकरे -रायगड तर शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या आनंद परांजपे यांना ठाण्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. अहमदनगर, माढा येथील उमेदवार आणि पार्थ पवार यांच्या उमेदवारी बाबत सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे.  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही पहिली यादी जाहीर केली आहे. 
● परभणी – राजेश विटेकर, ● ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील, ● कल्याण – बाबाजी बाळाराम पाटील,
● कोल्हापूरमधून - धनंजय महाडिक, ● बुलडाणातून - डॉ. राजेंद्र शिंगणे, ● जळगाव – गुलाबराव देवकर,
● लक्षद्वीप – महम्मद फैझल ●  यांचा जाहीर केलेल्या पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यासोबतच हातकणंगले या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठींबा देण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
      देशभर चर्चा झालेल्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छूक असले तरी त्यांना राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले नाही. मावळ आणि माढा लोकसभा मतदारसंघात सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. अहमदनगर आणि बीड या मतदारसंघाबाबत आज दि 14 मार्च रोजी चर्चा करून उद्या नावे जाहीर केली जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....