अमरसिंह पंडित समर्थक नाराज ; ना धनंजय मुंडेंची बैठक रद्द ; बजरंग सोनावणेंना विरोधच

उमेदवारी न मिळाल्याने अमरसिंह पंडित समर्थक नाराज
 मुंडेंच्या उपस्थितीत होणारी गेवराईतील बैठक रद्द
====================

सामान्य कार्यकर्त्यांच्या उमेदवारीला प्रस्थापितांकडून विरोधच
====================
गेवराई ( प्रतिनिधी ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये राष्ट्रवादी पक्षाने अनेक नवीन नेत्यांना संधी दिली आहे. बीडमध्ये माजी आ अमरसिंह पंडित यांना वगळून बजरंग सोनावणे या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली आहे. ही घोषणा होताच बीड राष्ट्रवादीतील अंतर्गत दुफळी चव्हाट्यावर आली असून आधीच जिल्ह्यात खिळखिळ्या झालेल्या राष्ट्रवादीला आता अमरसिंह पंडित यांच्या समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. ना धनंजय मुंडे यांची यामुळे गेवराईतील बैठक ऐन वेळी रद्द करण्यात आली.
      राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थित पाटोदा, आष्टी, शिरूर आणि गेवराई येथे आज बैठक पार पडणार होती. मात्र अमरसिंह पंडित यांच्या समर्थकांचा रोष पाहता पक्षावर गेवराईमध्ये संध्याकाळी सात वाजता होणारी बैठक ऐन वेळू रद्द करण्याची वेळ आली आहे. बीड लोकसभा मतदार संघातून माजी आ अमरसिंह पंडित हे यंदाचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार मानले जात होते. दुसरी यादी जाहीर होण्याच्या क्षणापर्यंत अमरसिंह पंडित यांचे नाव निश्चीत मानले जात होते. परंतु दुसऱ्या यादीत पंडीत यांचे नाव बाजूला सारून बजरंग सोनावणे याचं नाव जाहीर करण्यात आले आहे. यामुळे गेवराईतील अमरसिंह पंडित यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत लोकसभा निवडणुकीत नोटावर बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन ते सोशल मीडियावरून करू लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रचाराला गेवराईतच खीळ बसल्याचे दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....