रखरखत्या उन्हात घरोघरी जाऊन युधाजित पंडित यांनी डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी मागितली मते

रखरखत्या उन्हात घरोघरी जाऊन युधाजित पंडित यांनी
डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी मागितली मते
====================

गेवराई ( प्रतिनिधी ) बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना - रासप - रिपाई महायुतीच्या उमेदवार डाॅ. प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांच्या विजयासाठी  जि प सभापती तथा शिवसेनेचे बीड जिल्हा समन्वयक युधाजित पंडित यांनी रखरखत्या उन्हात मतदारांच्या घरोघरी जाऊन मते मागितली आहेत.
            शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी युतीचे उमेदवार प्रीतमताई मुंडे यांच्या प्रचारात आघाडी घेतली असतानाच आता बीड जिल्हा शिवसेना समन्वयक तथा जि प सभापती युधाजित पंडित यांनीही प्रचारात उडी घेतली आहे. दि 28 मार्च रोजी गेवराई तालुक्यातील आतंरवाली, मिरगाव, पांढरी, भोगलगाव, बोरगाव थडी, राहेरी आधी गावात जाऊन सभापती युधाजित पंडित यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना युधाजित पंडित म्हणाले की, पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि खा प्रीतमताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक विकास योजनेसाठी भरभरून निधी दिला आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या या दोन्ही विकास कन्यांनी सामान्य माणसाच्या दारापर्यंत विकास काम पोहोचवले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करणाऱ्या पंकजाताई मुंडे व प्रीतमताई मुंडे यांच्यामुळे लवकरच जिल्ह्यात रेल्वे धावणार असून, त्यामुळे मोठमोठे उद्योगही निर्माण होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असे सांगून, युधाजित पंडित म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला निर्भिड पंतप्रधान तर प्रीतमताई मुंडे यांच्या रूपाने जिल्ह्याला विकासाभिमुख खासदाराची पुन्हा एकदा गरज असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक व मतदार प्रीतमताई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असल्याने, त्यांचा रेकॉर्डब्रेक मताधिक्क्याने विजय होणार असल्याचेही युधाजित पंडित म्हणाले. यावेळी जि प सदस्य युवराज डोंगरे, कानिफनाथ नागरे, अविनाश पंडित, बदाम पौळ, दीपक वावरे, गोविंद लाड आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....