मोहनराव जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे युतीची ताकद वाढली -- बदामराव पंडित

मोहनराव जगताप यांच्या प्रवेशामुळे युतीची ताकद वाढल्याने
प्रीतमताई मुंडे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार -- बदामराव पंडित
====================

गेवराई ( प्रतिनिधी ) छत्रपती साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहनराव जगताप यांच्या भाजपा प्रवेशामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीची ताकत वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत यामुळे डॉ प्रीतमताई मुंडे यांचा विजय मोठ्या मताधिक्क्याने होणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त केला आहे.
            बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना रासप रिपाई या माहितीच्या उमेदवार डॉ प्रीतमताई गोपीनाथ मुंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी शिवसेना नेते बदामराव पंडित यांनी धडाडीने प्रचाराला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसापासून तालखेड सर्कलमधील प्रत्येक गावांत जाऊन बदामराव पंडित हे मतदारांच्या भेटी घेऊन, डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी मतदान मागत आहेत. दि 28 मार्च रोजी खेर्डा, वारोळा, बाराभाई तांडा, हरकी निमगाव, राम पिंपळगाव, मंगरूळ नंबर 1, सावरगाव आदि गावातील मतदारांच्या बदामराव पंडित यांनी भेट घेऊन बैठका घेतल्या आहेत. मोहनराव जगताप यांच्या भाजपा प्रवेशामुळे गट-तट विसरून गावकऱ्यांनी प्रत्येक गावात रखरखत्या उन्हातही बदामराव पंडित यांचे जल्लोषात जंगी स्वागत केले. यावेळी माजी पं स सदस्य भास्करराव कचरे, छत्रपती साखर कारखान्याचे संचालक रमेशराव मोरे, माजी सरपंच प्रशांत मोरे, विठ्ठलराव तौर, सुनील चव्हाण, नवनाथ काळे, आजमखान पठाण, अंगदराव तौर, संभाजीराव येवले, कुंडलीकराव यादव, ऍड उद्धव गायकवाड, सुग्रीव थोरात, सरपंच राजाभाऊ नवगरे, विलास गायकवाड, नारायण गायकवाड, राधाकृष्ण येवले, सय्यद रहीम, सय्यद पाशाभाई, किसनराव घाटूळ, आदींची प्रमुख उपस्थिती होती. बदामराव पंडित यांच्या दौऱ्याला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, प्रीतमताई मुंडे यांना तर खासदार करणारच त्यासोबत बदामराव पंडित यांनाच आमदार म्हणून निवडून देण्याचा संकल्प ठिकठिकानच्या मतदारांनी व्यक्त केला आहे.
गावोगाव झालेल्या बैठकांना हनुमान आर्डे, विठ्ठल रंजवे, भारत गायकवाड, सुभाष आर्डे, पांचाळ, विजयकुमार राठोड महाराज, भानुदास आर्डे, आण्णा शिंदे, बळीराम शिंदे, प्रताप पाटील, अशोक आर्डे, चिंतामणराव गायकवाड, बाबुराव राठोड, रवींद्र बोरा, पांडुरंग आर्डे, उद्धव आर्डे, अशोक शिंदे, रामकिसन येवले  सखाराम शिंदे बबन चव्हाण, संतोष जाधव, राम घाटूळ, परमेश्वर नाईकनवरे, अशोक नाईकनवरे, लक्ष्मण काठवडे, आण्णा कादे, आदींसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....