"तिकीट जाहीर करा" म्हणणाऱ्या आ पवारांच्या कार्यकर्त्यांना पंकजाताईंनी झापले

"तिकीट जाहीर करा" म्हणणाऱ्या आ पवारांच्या कार्यकर्त्यांना पंकजाताईंनी झापले

=================================
"तो मैं आपने आपकी भी नहीं सूनती" -- ना पंकजाताई
================================
बीड ( प्रतिनिधी ) शासकीय कामांच्या शुभारंभासाठी आलेल्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासमोर  गेवराईत "जाहीर करा.. जाहीर करा.. गेवराई चे तिकीट जाहीर करा" म्हणणार्‍या आ लक्ष्मणराव पवार यांच्या कार्यकर्त्यांना पंकजाताईंनी चांगलेच झापले आहे.
            राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण आणि टोल नाक्याचा शुभारंभ त्यासोबतच गेवराईत जाहीर सभा घेण्यासाठी भाजपा आ लक्ष्मणराव पवार यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना निमंत्रित करून कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु ऐनवेळी ना गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस या दोन्ही मान्यवर नेत्यांनी आपला दौरा रद्द करत गेवराईकडे पाठ फिरवली. त्यानंतर उपस्थित नागरिकांशी पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी संवाद साधला. त्या भाषण करण्यासाठी उभा राहताच गेवराईतील आ लक्ष्मणराव पवार यांच्या कार्यकर्त्यांनी, "जाहीर करा..  जाहीर करा..  गेवराईचे तिकीट जाहीर करा" म्हणत घोषणाबाजी सुरू केली. पंकजाताई मुंडे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी कार्यकर्त्यांना त्यांच्याच भाषेत पंकजाताईनी सुनावले. मी शासकीय कार्यक्रमासाठी आले आहे, राजकीय सभा घेण्यासाठी नाही. तुमच्या मनात शंका का ? मी गेवराईला येते तेव्हा लक्ष्मण पवार यांच्या घरी जाते. त्यामुळे माझ्या मनात शंका नाही. मात्र ती तुमच्या मनात कोणी निर्माण केली ? हे मला आणि तुम्हाला दोघांनाही माहित आहे. मी दुसऱ्या कोणाला भेटले तर शंका घेतली जाते मग तुम्ही ज्यांना भेटलात ते मला बरे वाटेल का ? असा प्रश्न उपस्थित करून पंकजाताई मुंडे यांनी आपल्याच पक्षातील आ लक्ष्मणराव पवार यांनी आ विनायकराव मेटे यांच्या घेतलेल्या भेटीची अप्रत्यक्षपणे आठवण करून दिली. यामुळे आमदार पवार यांचे कार्यकर्तेही गर्भगळीत झाले. यावेळी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी, "तो मै.. अपने आपकी भी नहीं सूनती" हा सलमान खानच्या डायलॉग बोलून समोरील लोकांना काय संदेश द्यायचा तो दिला.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....