25/15 मध्ये घोटाळ्याचा प्रयत्न ; शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचे सरपंचही खडबडून झाले जागे


ना हरकत व देखभाल दुरुस्ती बोगस प्रमाणपत्र जोडल्या प्रकरणी
शिवसेनेपाठोपाठ गेवराईतील राष्ट्रवादीचे सरपंचही खडबडून झाले जागे
====================
अभियंता व गुत्तेदारांवर 420 चा गुन्हा दाखल होऊ शकतो ?
====================
गेवराई ( दिनकर शिंदे ) गेवराई तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांचे बनावट रबरी शिक्के मारून व खोट्या सह्या करून 25/ 15 च्या कामासाठी बोगस ना हरकत प्रमाणपत्र आणि देखभाल दुरुस्ती प्रमाणपत्र जोडल्याची तक्रार शिवसेनेच्या 16 सरपंचांनी केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचेही सरपंच खडबडून जागे झाले आहेत. रविवार व सोमवारी महाशिवरात्रीची सुट्टी असल्याने आज दि 5 मार्च रोजी आपापल्या ग्रामपंचायती अंतर्गत कामाची माहिती घेऊन तक्रार तक्रार करणार असल्याचे समजते.   याप्रकरणी संबंधित गुत्तेदार आणि अभियंता यांच्यावर शासनाची फसवणूक करण्यासाठी बनावट कागदपत्र बनवल्या प्रकरणी 420 चे गुन्हे दाखल होऊ शकतात, असे कायदे तज्ञांनी स्पष्ट केले आहे.
             याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती अंतर्गत  करण्यात येत असलेल्या 25/15 च्या कामासाठी लागणारे सरपंच व ग्रामसेवकाच्या सहीने ना हरकत प्रमाणपत्र आणि देखभाल दुरुस्ती प्रमाणपत्र संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना विचारात न घेता,  बनावट रबरी शिक्के तयार करून  कोऱ्या कागदावर चार ओळीचे ना हरकत प्रमाणपत्र लिहण्यात आले. त्यावर खोट्या सह्या करून  कामाच्या मंजुरीसाठी  उपविभागीय अभियंता यांच्याकडे  अनेक गुत्तेदार यांनी प्रस्ताव दाखल केले होते. सदर प्रस्तावाची खातरजमा न करता  उपविभागीय अभियंता वाघस यांनी हे प्रस्ताव कार्यकारी अभियंता बीड यांच्याकडे पाठवले. या कामांपैकी अनेक कामे डीपीडीसी यासारख्या काही योजनांतर्गत यापूर्वीच मंजूर झालेले आहेत. तसे मंजुरीपत्रही संबंधित ग्रामपंचायतीला प्राप्त झालेले आहे. असे असताना त्याच कामावर पुन्हा ही कामे कागदोपत्री टाकण्यात आली होती. याबाबत माहिती मिळताच शिवसेनेच्या 16 सरपंचांनी दि 1 मार्च रोजी कार्यकारी अभियंता बीड यांच्याकडे लेखी तक्रार केली. याबाबत चौकशी करण्याची मागणी करत, गाव पातळीवर करण्यात येणाऱ्या कामासाठी आमची ग्रामपंचायत आणि आम्ही सक्षम आहोत. संबंधित कामे करण्याचा अधिकार आम्हाला आहे. ती कामे ग्रामपंचायतीलाच करू द्यावीत अशी मागणी केली. या तक्रारीची दखल घेऊन कार्यकारी अभियंता सानप यांनी तात्काळ गेवराई उपविभागीय अभियंता श्री वागस यांना पत्र देऊन तक्रार करणाऱ्या सरपंचाच्या ग्रामपंचायतीमधील कामाची कागदपत्र तपासावेत व संबंधित ग्राम पंचायतीच्या लेटरपॅडवर संबंधित कामाबाबत पुन्हा प्रस्ताव पाठवावेत असे आदेश दिले होते. याबाबत "AtoZ महाराष्ट्र न्यूज" ने वृत्त प्रकाशित करताच, प्रशासनासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच खडबडून जागे झाले. यात आपल्याही ग्रामपंचायतीवर अशा पद्धतीची कामे संबंधिताकडून टाकण्यात आली आहे काय ? याची चौकशी करण्यासाठी त्यांची धावपळ उडाली. रविवारची सुट्टी आणि त्यापाठोपाठ आलेल्या सोमवारच्या महाशिवरात्रीनिमित्त च्या सुट्टी मुळे हे सरपंच तक्रार करू शकले नाहीत. परंतु आज दिनांक 5 मार्च रोजी शिवसेनेचे उर्वरित सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच याप्रकरणी तक्रार करणार असल्याचे समजते. दरम्यान गाव पातळीच्या विकासासाठी ग्रामपंचायत सक्षम असल्याने ग्रामपंचायतीसाठी असलेल्या योजना या ग्रामपंचायतीलाच करू द्याव्यात या मागणीसाठी शिवसेनेचे सरपंच  न्यायालयात दाद मागण्यासाठी जाणार असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची माहिती होताच तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आशा पद्धतीची कोठे कोठे कामे व प्रकार झाले आहेत याची दिवस-रात्र सरपंच माहिती घेत असताना दिसून आले.

■■ अभियंता व गुत्तेदार आवर 420 चे गुन्हे दाखल होऊ शकतात ? ■■
         बनावट कागदपत्र जोडून शासनाची दिशाभूल करत आर्थिक नुकसान करण्याच्या प्रयत्नामुळे संबंधितावर फसवणुकीचे 420 अन्वये गुन्हे दाखल होऊ शकतात, असे मत कायदेतज्ञांनी व्यक्त केले आहे. असे झाल्यास बोगस कामे करणाऱ्यांना व त्यांना मदत करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसेल हे निश्चित.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....