पावसात उभ्या पिकांसह शेत जमिनी वाहून गेल्या
 सोयगाव,जंगला आणि कवली शिवारात नुकसान


====================
   सोयगाव ( प्रतिनिधी )सोयगावसह परिसरात शुक्रवारी झालेल्या दमदार पावसाने सोयगाव,जंगला, बोहुलखेडा आणि कवली शिवारातील शेतजमिनी उभ्या कोवळ्या पिकांसह वाहून गेल्याने शेतात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.कवली शिवारातील बहुला नदीला आलेल्या पुराचे पाणी कवली शेती शिवारात शिरल्याने गुंताबाई जाधव आणि गजमल हरी पाटील यांचे पिकांसह चक्क शेतच वाहून गेल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे.याप्रकरणी महसूल आणि कृषी विभागांकडून शनिवारी पाहणी करण्यात येणार असल्याचे महसूलच्या सूत्रांनी सांगितले.
          सोयगावसह परिसरात शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने शेती क्षेत्रात दाणादाण उडाली असून कपाशी पिके कोवळ्या अंकुरासह शेतीच वाहून गेली असून सोयगाव आणि जंगला शिवारात नाल्याच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतात नाला तयार झाला आहे.भैरवनाथ शिवारातही शेती वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहे.दरम्यान ऐन खरिपाच्या हंगामाच्या प्रारंभापासून नैसर्गिक संकांटाची मालिका सोयगाव परिसरात सुरु झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.बनोटी मंडळ वगळता झालेला सोयगाव परिसरातील गावांना मात्र नुकसानीचा ठरला आहे.या पावसात मात्र बनोटी मंडळ कोरडेठाक असल्याचे महसूल विभागाने सांगितले.
....................................

Comments

Popular posts from this blog

शिवसेनेच्या बदामराव पंडित यांचा पुन्हा एकदा भाजप आ लक्ष्मण पवारांना धक्का

पार्श्वभूमीचे संपादक गंमतभाऊ भंडारी याना नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे