ना गिरीश महाजन व आ एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.

ना गिरीश महाजन व आ एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत
जळगाव भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.
========================


जळगाव ( प्रतिनिधी ) भाजपा जिल्हा विस्तृत बैठक दि.२९ जून शनिवार रोजी दु.२:०० वा. ब्राम्हण सभा जळगांव येथे झाली.
  सदर बैठक जिल्हा पालकमंत्री मा.ना. गिरीषभाऊ महाजन, मा.मंत्री मा.आ.एकनाथराव खडसे, विभाग संघटन मंत्री मा.अँड.किशोरभाऊ काळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मा. डॉ.संजीव पाटील व महानगराचे अध्यक्ष तथा मा.आ.सुरेश भोळे (राजुमामा) मा.खा. उन्मेषदादा पाटील व मा.खा.रक्षाताई खडसे, मा.आ.तथा प्रदेश चिटणीस मा.आ.स्मिताताई वाघ, मा.आ.चंदुभाई पटेल, मा.आ.हरिभाऊ जावळे, मा.आ.संजयभाऊ सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
      सदर बैठकीला प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष/सरचिटणीस, मंडल सदस्य नोंदणी प्रमुख/सहप्रमुख, जिल्हा आघाडी अध्यक्ष/ सरचिटणीस, विस्तारक, जि.प.व पं. स. सभापती/सदस्य, नगराध्यक्ष/नगरसेवक, शक्तिकेंद्र प्रमुख यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे ,जिल्हा सरचिटणीस पोपटतात्या भोळे, सदाशिवआबा पाटील, रोहिणीताई खडसे, प्रभाकर पवार, हर्षल पाटील, विशाल त्रिपाठी, दिपक सूर्यवंशी, महेश जोशी, राजेंद्र घुगे-पाटील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर उपस्थित होते.....

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....