पुलावरील सिमेंट बंधारा फुटला,शेती पिकांचे नुकसान, बंधाऱ्याच्या भिंतीही वहिल्या...

सोयगाव: रामपुरवाडी पुलावरील सिमेंट बंधारा फुटला,शेती पिकांचे नुकसान.......बंधाऱ्याच्या भिंतीही वहिल्या...


 सोयगाव,ता.३(प्रतिनिधी): अजिंठा डोंगरात झालेल्या मुसळधार पावसाने रामपूरवाडी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात नदीच्या पात्रात बांधलेला सिमेंट बंधारा बुधवारी पहाटे वाहून गेल्याची घटना घडली.महिनाभरापूर्वी बांधलेल्या सिमेंट बांधाची अख्खी भिंत फुटल्याने बंधाऱ्यातील पाणी शेती शिवारात शिरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तर बंधाऱ्यातील अडविण्यात आलेले लाखो लिटर पाणी जळगाव जिल्ह्यात वाहून गेले आहे.दरम्यान या घटनेमुळे नदीकाठच्या  रामपूरवाडी शेती क्षेत्राला धोका निर्माण झाला आहे.
         जलसंधारण विभागाच्या वतीने महिनाभरापूर्वी या नदीवर सिमेंट बंधारे उभारण्यात आले.दरम्यान फुटलेल्या बंधाऱ्याच्या केवळ दोनशे फुटावर पुन्हा एक बंधारा नव्यानेच उभारण्यात आला आहे.या बंधाऱ्याला गळती लागून दुसऱ्या बंधाऱ्यात शिरलेले अतिरिक्त पाण्याच्या दाबाने दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट बंधारा फुटून यातून हजारो लिटर पाणी वाहून शेतात शिरले आहे,तर काही पाणी नदीपात्रातून जळगाव जिल्ह्यात गेले,दरम्यान जलसंधारण विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यांची चुकीच्या पद्धतीने बांधणी करण्यात आली असून या बंधाऱ्यांची नित्कृष्ट काम केल्याचा आरोप शेतकरी पंडित तेली यांनी केला आहे.या बंधाऱ्याला सिमेंटचा वापर न करता केवळ मातीचा कस वापरून बांधकाम करण्यात आले होते त्यामुळे नित्कृष्ट बांधकाम करण्यात आलेली संरक्षण भिंत धासून बंधारा फुटला आहे.दरम्यान फुटलेली संरक्षण भिंतच पुराच्या पाण्यात वाहून गेली असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.याप्रकरणी जलसंधारण विभागाशी संपर्क साधला असता कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आलेला होता.
................................
  फुटलेल्या बंधाऱ्याचे पाणी शेती पिकांमध्ये-
   दरम्यान या बधार्याच्या साठवण क्षेत्रात हजारो लिटर पाणी साठविलेले होते परंतु अचानक फुटलेल्या भिंतीच्या प्रकारामुळे यातील पाणी शेतात वाहून साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या प्रकारची चौकशी करण्याची मागणी पंडित तेली,भगवान तायडे,नारायण ढाकरे आदींनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....