शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तात्काळ द्या ; नसतात आंदोलन
बदामराव पंडित यांचा विमा कंपनीसह प्रशासनाला इशारा

====================
गेवराई ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघातील गेवराई तालुक्यासह माजलगाव, बीड या तालुक्यातील पिंपळनेर, पेंडगाव आणि तालखेड या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अद्यापही मिळालेले नाहीत. ते पैसे तात्काळ शेतकऱ्यांना द्यावेत नसतात, शिवसेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी विमा कंपनीसह जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
         शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलनासाठी परिचित असलेल्या शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी म्हटले आहे की, गेवराई विधानसभा मतदारसंघात गेवराई महसूल मंडळ, जातेगाव महसूल मंडळ ता.गेवराई , तालखेड महसूल मंडळ ता. माजलगाव या महसूल मंडळात दुष्काळ असुन देखील कापूस, तूर, मुग या पिकाचा विमा मिळाला नाही. तसेच गेवराई तालुक्यातील सर्व महसूल मंडळ व पिंपळनेर महसूल मंडळ , पेंडगाव महसूल मंडळ ता. बीड या भागातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पिक विमा तसेच पिंपळनेर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना तूर व मुग या पिकाचा विम्याचे पैसे आजपर्यंत मिळाले नाहीत. ओरियंटल इन्सुरन्स कंपनिला आदेशीत करुन पिक विमा तात्काळ वाटप करावा. कारण पेरणी योग्य पाऊस झाला आहे. खेते व बि-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना तात्काळ पैशाची गरज आहे. सदर पिक विम्याची रक्कम त्यांना मिळाल्यास दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे, पेरणी व मशागतीसाठी पैसे उपयोगात येतील. त्यामुळे तात्काळ कार्यवाही करण्याबाबत ओरियंटल कंपनीला आदेशीत करावे. नसता शेतकऱ्यासह शिवसेना तीव्र अंदोलन करेल, असा इशारा शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी  विमा कंपनीसह जिल्हा प्रशासनालाही दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....