फळबागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या
शिवसेना नेते बदामराव पंडित यांची प्रशासनाकडे मागणी
====================
शेतकऱ्यांना बाग न तोडण्याचे केले आवाहन
====================


गेवराई ( प्रतिनिधी ) अत्यल्प पावस झाल्याने पडलेल्या दुष्काळात गेवराई मतदारसंघात माणसांना व जनावरांनाही प्यायला पाणी उपलब्ध नाही. अशा स्थितीत गेल्या कित्येक वर्षापासून जगविलेल्या फळबागा जिवंत ठेवणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. अनेकांच्या बागा जळून गेल्या आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ नुकसान झालेल्या फळबागांचा पंचनामा करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यासोबतच कोणत्याही शेतकऱ्यांनी फळबागा तोडू नयेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.
             शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी दिनांक 29 जून रोजी गेवराईचे तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्या गेवराई मतदार संघातील पिण्याच्या पाण्याचा  प्रश्न गंभीर असल्याने, आपल्या फळबागा जगवायच्या कशा ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. खूप प्रयत्न करूनही पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा जळाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. निसर्गाच्या प्रकोपात जर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर त्यांना शासनामार्फत नुकसानभरपाई देण्यात येत असते. यापुर्वीच शिवसेनेने आंदोलन करून, गेवराई मतदारसंघ अवर्षण प्रवणक्षेत्र घोषीत करण्याबाबत तसेच वन्यप्राणी बाधित क्षेत्र घोषीत करण्याबाबत निवेदन दिलेले आहे. त्यांचेही पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करता येईल यादृष्टीने पावले उचलावीत. तसेच गेवराई तालुक्यातील सर्व फलोत्पादन शेतकऱ्यांच्या फळबागांचे पंचनामे करणे गरजेचे आहे, कारण पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी शेतीतील जळालेल्या फळबाग काढून टाकण्याची शक्यता आहे. तरी तालुक्यातील जळीत फळबागांचे  पंचनामे करावेत अशी मागणी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केली आहे. त्यांचा समवेत ऍड धर्मेंद्र भोपळे, ऍड उज्वलाताई भोपळे, रघुनाथ राठोड, ओम मुळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....