सोयगाव परिसरात वीजगुल...२२ गावे अंधारात.....

सोयगाव परिसरात वीजगुल...२२ गावे अंधारात.....

     जरंडी,ता.३( प्रतिनिधी );
     सोयगावच्या वीजउपकेंद्रातील इनकमिंग रोहित्रात झालेला बिघाड आणि जरंडी वीजउपकेंद्रात झालेला तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही वीजउपकेंद्राला जोडणी करण्यात आलेले तब्बल २२ गावे अंधारात होती.रात्री उशिरा सोयगाव शहरात आलेला वीज पुरवठा पुन्हा बुधवारी पहाटे गुल झाल्याने शहरासह पाच गावांना बुधवारीही वीज विरहित राहावे लागले.
       १३२ के.व्ही वीज केंद्रातून पुरवठा होणार्या इनकमिंग रोहित्रात अचानक बिघाड झाल्याने सोयगाव शहर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अंधारात असतांना अचानक जरंडी फिडरमध्ये बिघाड झाल्याने जरंडी परीसरही अंधारात बुडाल्याने सोयगाव परिसरातील तब्बल २२ गावांना २० तासांपासून विजेविना राहावे लागल्याने मोठी गैरसोय झाली होती.जरंडी वीज उपकेंद्रातील जरंडी,बहुलखेडा,आणि घोसला या तीन फिडरचा वीज पुरवठा ठप्प झाल्याने या वीज उपकेंद्रातील १३ गावे रात्रभर अंधारात होती.सोयगाव वीज उपकेंद्रातील बिघाड दुरुस्तच होत नसल्याने अखेरीस सिल्लोड वरुण तंत्रज्ञ आल्यावर सायंकाळी उशिरा शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला.जरंडी उपकेंद्राचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तब्बल आठ तास वीज कर्मचाऱ्यांना झुंजावे लागले.वीज मंडळाचे तब्बल २० कर्मचारी मंगळवार पासून बिघाड दुरुस्तीच्या कामात गुंतली होती.
.................................

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....