मराठा प्रतिष्ठान कडून टँकर द्वारे मोफत पाणीपुरवठा...

मराठा प्रतिष्ठान कडून टँकर द्वारे मोफत पाणीपुरवठा...


सोयगाव ( प्रतिनिधी )  सोयगाव तालूका दुष्काळी परिस्थितीने होरपळत आहे आणि या मुळे झालेली  बिकट पाण्याची टंचाईला  नागरिक हैराण झाले आहेत अशातच मराठा प्रतिष्ठान एक सामाजिक संस्था या द्वारे जरंडी येथील ग्रामस्थाना टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा केला जात आहे
पाण्याची तीव्र टंचाई बघून मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  सोपानदादा पाटील यांनी जरंडीसह इतर गावासाठी सात पाणी टँकर ची व्यवस्था करून दिली आहे  मराठा प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष विजय काळे ,विजय चौधरी ,तालुका अध्यक्ष  सचिव ज्ञानेश्वर वाघ, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धोंडू  युवरे,  यांच्या मार्गदर्शनाखाली उपतालूका अध्यक्ष समाधान जाधव, जरंडी शाखा प्रमुख प्रशांत पाटील, सचिव सचिन महाजन व बापू सोंने  गुणवंत ढमाले, प्रकाश गव्हाडे ,प्रमोद वाघ, किशोर बावस्कर  ,ज्ञानेश्वर गवळी, प्रवीण गव्हाडे ,नानासाहेब जुनघरे ,सुनील ढमाले. गणेश गवळी पिंटू गवळी.  दिवस रात्र परिश्रम घेत आहेत  यात जरंडी ग्रामपंचायत देखील पाण्याचे सहकार्य कारीत आहे

अत्यंत बिकट पाणी टंचाईचा काळात  प्रत्यक्ष मराठा प्रतिष्ठानने लग्न व दुखात मोफत पाणी पुरवठा केला  या प्रकारे केलेली मदतीचे कवली .बोहलखेडा .घोसला .जरंडी गावातील  ग्रामस्थांनी आभार मानले आहेत

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....