पाण्याच्या दुजाभावावर जाब विचारण्यासाठी नागरिक सोयगाव नगर पंचायतीवर.......

सोयगाव शहराच्या प्रभाग चार मध्ये कमी दाबाने तर इतर प्रभागात मात्र जास्तीचा पाणी पुरवठा
 दुजाभावावर जाब विचारण्यासाठी नागरिक नगर पंचायतीवर.......

       सोयगाव,(प्रतिनिधी ):
   शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये हेतुपुरस्कर कमी दाबाने पाण्याचा पुरवठा करण्यात येवून या प्रभागाचाय तुलनेने उर्वरित प्रभागांना पुरेपूर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो असा दुजाभाव का याचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी नागरिकांनी नगर पंचायतीवर धडक मोर्चा काढून लेखी निवेदन दिले.
         दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे,कि शहरतील उच्चभ्रू वस्ती असलेल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये संबंधित पाणी पुरवठा कर्मचारी कमी दाबाने केवळ दहा मिनिटे पाण्याचा पुरवठा करत असतो,उर्वरित प्रभागांना मात्र पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येत आहे.त्यामुळे याप्रभागात पिण्याच्या पाण्यासाठी दुजाभाव का असा जाब विचारण्यासाठी नागरिकांनी नगर पंचायतीवर धडक मोर्चा काढून निवेगन दिले आहे.संबंधित पाणी पुरवठा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर दिलीप चौधरी,दिनेश काळे,त्रंबक अप्पा,पुंडलिक पाटील,अमोल मापारी,सचिन देसले,तस्लीम शाह,अहमद खान,ईश्वर चौधरी,तेजस चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....