मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासाठी राज्याची तिजोरी रिकामी करायला तयार

राज्याची तिजोरी रिकामी झाली तरी चालेल पण मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडणारच -- देवेंद्र फडणवीस
==========
परळी ( मराठवाडा )--
मराठवाड्यात गंभीर दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून पाण्याची ही स्थिती गंभीर आहे. आज प्रत्येक गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून जनावरांसाठी ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने छावण्या सुरु करण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या काळात मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी आमचा प्लॅन तयार आहे. नदीजोड प्रकल्पांतर्गत धरणातले पाणी पाइप लाईनद्वारे प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. लवकरच हा प्रकल्प पूर्ण होऊन बीड जिल्ह्यासह मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटणार आहे. यासाठी हजारो कोटी रुपये लागतील. वेळ आल्यास राज्याची तिजोरी रिकामी झाली तरी चालेल पण मराठवाड्याचा पाणीप्रश्न आम्ही सोडणारच, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथील गोपीनाथ गडावरून मराठवाड्यातील जनतेला दिला आहे. परळी येथील गोपीनाथ गडावर केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब दानवे, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे यांच्यासह भाजपचे खासदार, आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....