देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण करणार....

मराठवाड्यातील आठही खासदार शिवसेना-भाजप युतीचे विजयी करून मुंडे साहेबांचे स्वप्न पुर्ण करणारच
            ----- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मराठवाड्यातील आठही खासदार भाजप-शिवसेना युतीचे निवडून आणणे हे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न याच वेळी आम्ही पूर्ण केले असते, परंतु औरंगाबादचे युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे अवघ्या काही मतांनी पराभूत झाल्याने, 8 पैकी 7 जागेवर युतीचे खासदार विजयी झाले आहेत. परंतु पुढच्या वेळी 8 ही खासदार भाजप-शिवसेना युतीचे निवडून आणून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार. असा ठाम विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  परळी येथील गोपीनाथ गडावर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला आहे. याप्रसंगी कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, बीड जिल्ह्याचे पालक मंत्री पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे यांच्यासह भाजपा खासदार, आमदार तसेच शिवसेना-भाजप चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शरद पवारांकडून धक्कातंत्र ; बीडसाठी राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडितच ?

वाढत्या गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर विद्या पवार यांनी दिला हा सल्ला