वाढदिवसानिमित्त छत्रपती मल्टीस्टेट चेअरमन संतोष भंडारी यांनी लावली झाडे

छत्रपती मल्टिस्टेटचे चेअरमन संतोष भंडारी यांचा
वृक्षारोपण करून वाढदिवस उत्साहात साजरा
===========================

गेवराई ( प्रतिनिधी ) येथील छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमन युवा उद्योजक संतोष भंडारी यांचा वाढदिवस वृक्षारोपनासह विविध सामाजिक उपक्रमाने गेवराईत उत्साहात साजरा करण्यात आला. 

               छत्रपती मल्टीस्टेट च्या माध्यमातून सहकार क्षेत्रात दमदार पाऊल टाकल्यानंतर  राज्यातील अनेक जिल्ह्यात  शाखा स्थापन करून  तरुणांना नोकरी आणि रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या  चेअरमन संतोष भंडारी  यांनी  विविध  उपक्रम राबवून आपली एक वेगळी छाप निर्माण केली आहे  त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग  मोठ्या प्रमाणात  त्यांचा वाढदिवस साजरा करत असतो परंतु यावर्षी दुष्काळाची दाहकता लक्षात घेता,  छत्रपती परिवाराच्या वतीने परीसरात चेअरमन संतोष भंडारी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ आरतीताई भंडारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मुक बधीर शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना संतोष भंडारी म्हणाले की, बेसुमार झाडांची कत्तल केली जात आहे. पाण्याचे पुनर्भरणही व्यवस्थित होत नसल्याने आज पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे आणि जमिनीतील पाणीही आटले आहे. त्यामुळे सतत दुष्काळ पडून शेतकरी, व्यापारी, शेतमजूर हे हतबल होत आहेत. ही स्थिती टाळण्यासाठी प्रत्येकाने दरवर्षी  एक झाड लावून ते वाढवलेच पाहिजे. तरच पाऊस काळ  चांगला होईल. आज आपण वृक्ष लागवड केली आहे, परंतु ती झाडे जगविण्याची जबाबदारी माझ्यासह आपल्या सर्वांची असल्याची जाणीव त्यांनी यावेळी उपस्थितांना करून दिली. या प्रसंगी छत्रपती मल्टीस्टेटचे अविनाश माळवदे वैभव सोळंके, नाना कानडे, विष्णू वाघमारे, कृष्णा कांळूके, सुंदर रोकडे, राहुल जोशी, स्वप्नील सोनवणे, बाळकृष्ण बोने, गणेश कडूकर, राम बनकर, दादा तौर, सचिन शहागडकर, निलेश सावळे, रेवण चौधरी, अशोक राऊत, दस्तगीर शेख आदीची उपस्थिती होती. दिवसभर चेअरमन संतोष भंडारी यांच्यावर मित्र परिवार व विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....