शिवसेना नेते बदामराव पंडित यांनी कोणाचे विजयाबद्दल मानले आभार ?

गेवराई मतदारसंघातून प्रीतमताईंना मोठे मताधिक्य देऊन
शिवसैनिक व मतदारांनी शब्द पाळला -- बदामराव पंडित  

====================
धोंडराईत जाऊन मानले मतदारांचे आभार
===================
गेवराई ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्यात विशेषतः गेवराई तालुक्यात जातीपातीचे राजकारण करण्याचा मोठा प्रयत्न झाला. परंतु त्यांच्या भूलथापांना बळी न पडता, सामाजिक सलोखा कायम ठेवत गेवराई मतदारसंघातील मतदारांनी व शिवसैनिकांनी शब्द पाळून प्रीतमताई मुंडे यांना मोठे माताधिक्य दिले. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी म्हटले आहे.
             गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे दि 31 मे रोजी जाऊन शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी मतदारांचे व शिवसैनिकांचे जाहीर आभार मानले आहेत. दरम्यान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून बदामराव पंडित यांनी जयंती निमित्त अभिवादन केले. या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष आजमखान पठाण, शिवसेना तालुकाउपप्रमुख दिनकर शिंदे, राजेंद्र टकले, संभाजीराव खरात, सरपंच अशोक वंजारे, डॉ हबीब काझी, संदीप निकम, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल साखरे, उमराव तांगडे, भागवतराव ढेंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना बदामराव पंडित म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रणरणत्या उन्हातही प्रत्येक गावात मतदारांनी आमचे स्वागत केले. आमच्या विनंतीला मान देऊन प्रत्येक गावातून भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ प्रीतमताई मुंडे यांना माताधिक्य दिले. त्यामुळेच 35 हजारांचे मताधिक्य देऊन जिल्ह्यात गेवराई मतदारसंघ डॉ प्रतमताईंना लिड देण्यात दुसऱ्या स्थानी राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मतदारसंघात अत्यंत विखारी प्रचार करून समाजाचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला. परंतु येथील जागृक मतदारांनी त्यांना थारा दिला नाही. पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी मला मुंबईला बोलावून घेऊन, आमच्या ओटी मध्ये प्रीतमताईंना टाकून त्यांच्या विजयाची जबाबदारी दिली होती. गेवराईकरांच्या विश्वासावर आपण ती जबाबदारी प्रामाणिकपणे निभावली आणि प्रीतमताईं मोठ्या फरकाने विजयी झाल्या याचे समाधान वाटते, असे सांगून बदामराव पंडित म्हणाले की, राज्यातही शिवसेना- भाजप युतीचेच सरकार पुन्हा येणार असून, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व ना पंकजाताई मुंढे यांच्या माध्यमातून गेवराई मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आपण साध्य करणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी तालुकाउपप्रमुख दिनकर शिंदे, आजमखान पठाण यांचेही समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी गोकुळ मेघारे, मच्छिंद्र सपकाळ, विष्णू काकडे, मधुकर प्रधान, शिवाजी खरात, अतुल खरात, शेख इरफान, शिवाजी मेघारे, भगवान येवले, जफर काजी, शिवाजी निकम, मदन काकडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक महेंद्र खरात यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....