राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शरद पवारांनी केली यांची नियुक्ती..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शेख महेबूब यांची नियुक्ती करून
शरद पवार यांनी सामान्य कार्यकर्त्याला दिली संधी : बीड जिल्ह्यातील प्रस्थापित युवानेत्यांना धक्का

=========
     लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत मोठे फेर बदल करायला सुरुवात केली आहे. याचे संकेत पक्षप्रमुख शरद पवार यांनी नुकतेच दिले होते. युवकांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी युवक अध्यक्ष हे त्यांच्यासाठी, जबाबदारीचे आणि महत्त्वाचे पद असते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील शेख महेबुब या सामान्य मुस्लिम कुटुंबातील चळवळीच्या कार्यकर्त्याला शरद पवार यांनी विराजमान केले आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही धक्का देऊन, एक प्रकारे शरद पवारांनी आपला पुढील राजकीय संदेश देण्याचे काम केले आहे.  एमआयएमचे प्रमुख खा असोद्दीन ओवेसी आणि  बहुजन चळवळीतील नेते प्रकाशराव आंबेडकर यांच्या वंचित आघाडीमुळे राज्यात लोकसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक मानला जाणारा मुस्लिम समाजाचा मतदार हा यावेळी वंचित आघाडी सोबत गेल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्याचाच परिणाम म्हणून औरंगाबाद येथे वंचित आघाडीला एक खासदारही मिळाला आहे. बीड जिल्ह्यात तर  भाजप-शिवसेना युतीच्या डॉक्टर प्रीतम ताई मुंडे जवळपास पावणेदोन लाख मतांच्या फरकाने  विजय झाले असून त्यांना सर्वाधिक 70 हजारांचे मताधिक्य हे  एक आष्टी पाटोदा मतदारसंघातून आहे. हीच स्थिती राहिली तर राज्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे यापेक्षाही मोठे हाल होतील. ही स्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षातील जेष्ठ आणि प्रस्थापित पुढाऱ्यांना व त्यांच्या मुलांना बाजूला सारून एका सामान्य मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या शेख महेबुब या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील युवकाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. शेख मेहबूब यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पासून दुरावलेला मुस्लिम समाज आणि युवक वर्ग परत राष्ट्रवादीकडे खेचून आणण्याचा शरद पवार यांना प्रयत्न दिसत आहे. लोकसभेला 70 हजार मतांनी मायनस असलेल्या आष्टी पाटोदातून शेख मेहबूब यांची निवड केल्यामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भविष्यात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळाले आहेत.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....