गेवराईत विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार ; शहरात चोट्टे करतायत राज्य

गेवराईत विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभारशहरातील ग्राहकांचे भवितव्य चोट्यांच्या हातात====================पावसाळ्याआधीच अनेक लाईनमन नॉट रीचेब

====================

गेवराई ( प्रतिन) दुष्काळात आणि कडक उन्हाळ्यात घरोघर जाऊन लाईट बिलाची वसुली करणारे लाईनमन, सध्या मात्र पावसाळ्या आधीच गेवराईतून नॉटरिचेबल झाले आहेत. शहरातील लाईट वेळोवेळी खंडित होत असून, अनेक ट्रान्सफार्मर मधील फ्यूज सतत उडत आहेत. यातून विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून शहरातील विद्युत ग्राहकांचे भवितव्य मात्र चोरट्यांच्या हातात गेल्याचे दिसत आहे.

            याबाबत अधिक माहिती अशी की, अद्याप पावसाळा सुरूही झाला नाही त्या अगोदरच, गेवराई शहरातील अनेक लाईनमनचे मोबाईल नॉटरिचेबल झाले आहेत. तर काही जणांचे मोबाईल सुरू असले तरी ते ग्राहकांचे कॉल घेत नाहीत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. गेवराई शहरातील अनेक ट्रांसफार्मर मधील फ्युज सतत उडत आहेत. 90 टक्के वसुली असलेल्या भगवान नगर या भागातील ट्रांसफार्मर मधील फ्युज तर नेहमीच उडत आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा वेळी-अवेळी खंडीत होत आहे. परंतु त्याकडे लक्ष द्यायला विद्युत वितरण कंपनीच्या अभियंता, उप अभियंता, सहाय्यक अभियंता किंवा लाईनमन यांच्याकडे वेळच नाही. कॉलनीतील तरुण स्वतः या ट्रांसफार्मर मधील फ्युज तार बसवतात. हा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार त्यांना दररोज करावा लागत आहे. यातून काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण?. विशेष बाब म्हणजे यातील काही लाईनमन तर स्वतः काम करण्याऐवजी, खाजगी माणसाकडून काम करून घेत आहेत. त्याचा पगारही ग्राहकांच्या माथ्यावर मारला जातो.  गेवराई शहरातील विद्युत पुरवठा विद्युत वितरण कंपनीच्या लाईनमन ऐवजी खाजगी माणसांच्या हाती आला आहे.  ही  अत्यंत गंभीर बाब आहे. हे खाजगी माणसं ग्राहकाकडून पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम करत नाहीत आणि यांची तक्रार करायची असल्यास, आम्ही काही विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी नाहीत, त्यामुळे आमच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. याउलट तुम्ही तक्रार केल्यास आम्ही तुमची लाईट कट करू मग कोणाकडून जोडून घ्याल ? अशा पद्धतीच्या उद्धट धमक्या त्यांच्याकडून शहरवासीयांना मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील अनेक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा लाईट बिल आली आहेत. याबाबत विचारणा केली असता कोणीही सक्षम अधिकारी उत्तर द्यायला तयार नाहीत. आलेल्या प्रत्येक तक्रारीला उडवाउडवीचे उत्तर देणे एवढेच काम हि लोक करीत आहेत. यामुळे प्रामाणिकपणे लाईट बिल भरणाऱ्या ग्राहकांनाच लाईटचा त्रास सहन करावा लागत असून, त्यांची तक्रार ऐकून घ्यायलाही कोणी उपलब्ध नाही. शहरातील विद्युत ग्राहकांचे भवितव्य तर चोरट्याच्या हातात असल्याचे दिसत आहे.
विद्युत वितरण कंपनीचे काही लाईनमन मात्र प्रामाणिकपणे आपले काम करीत असून, खाजगी लाईनला हाताशी धरून ग्राहकांना सुविधाही देत आहेत. किमान त्यांच्यामुळे तरी विद्युत वितरण कंपनीची लाज काही अंशी राखली जात आहे. गेल्या तीन दिवसापूर्वी शहराला विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रांसफार्मर मध्ये बिघाड झाल्याने सतत लाईट पुरवठा खंडित होत आहे. याचा शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले असून विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात केव्हाही ते रस्त्यावर उतरू शकतात अशी गंभीर स्थिती शहरात निर्माण झाली आहे. याप्रकरणी शहरातील काही ग्राहक हे ग्राहक मांच्यात जाणार असल्याचे समजते. विद्युत वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी नसता आंदोलनकर्त्यांना आडवने त्रासदायक होईल.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....