शिवसेना सोशल मीडियावर दादासाहेब खरात, सचिन पंडित व पिंटू काळेंची निवड

शिवसेना गेवराई तालुका सोशल मीडियाच्या
उपप्रमुखपदी दादासाहेब खरात व सचिन पंडित
====================
तलवाडा सर्कल प्रमुखपदी पिंटू काळे
====================

गेवराई ( प्रतिनिधी )  शिवसेनेच्या  गेवराई तालुका सोशल मीडिया कार्यकरण्याची नुतन पदाधिकाऱ्यांची दिनांक 3 जून रोजी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या शिफारशीवरून नियुक्ती करण्यात आली आहे. यात सोशल मीडियाच्या तालुका उपप्रमुखपदी दादासाहेब खरात आणि सचिन पंडित या दोघांची  तर सोशल मीडियाच्या तलवाडा सर्कल प्रमुखपदी पिंटू काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
                शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, जिल्हा संपर्क नेते अरविंद जाधव यांच्या आदेशान्वये आणि माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, शिवसेना जिल्हा समन्वयक सभापती युधाजित पंडित यांच्या शिफारशीवरून जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि तालुकाप्रमुख कालिदास नवले यांनी गेवराई तालुका शिवसेना सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त केल्या आहेत. युवानेते रोहित पंडित आणि पं स सभापती अभयसिंह पंडित यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन, सोशल मीडिया तालुका उपप्रमुख दादासाहेब खराद,  तसेच सोशल मीडिया तालुका उपप्रमुख सचिन पंडित आणि सोशल मीडिया तलवाडा सर्कल प्रमुखपदी पिंटू काळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल पत्र देवुन सत्कार करण्यात आला.  याप्रसंगी बोलताना युवानेते रोहित पंडित म्हणाले की, समाजकारण असो की राजकारण, काम करताना प्रचार आणि प्रसिद्धी अत्यंत महत्त्वाची असते. यामध्ये सोशल मीडिया ही महत्त्वाची भूमिका बजावतो. शिवसेना लोकांचे काम करते, प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवते आणि विकास कामाला प्राधान्य देते. परंतु ही सर्व कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियावर काम करणारी यंत्रणा अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या शिफारशीवरून काही पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. आणखी काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच करण्यात येतील. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर लोकांना सहज समजेल, लक्षात येईल अशा पद्धतीने काम करावे. कोणाच्या अडीअडचणी असतील त्याही समजून घ्याव्यात व आम्हाला सांगा. आम्ही त्या सोडून असेही रोहित पंडित म्हणाले. याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....