विमला विद्यालयात १०वी विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा कार्यक्रम संपन्न

गेवराई ( दिनकर शिंदे ) येथील विमला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा कार्यक्रम घेण्यात आला.
     कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव अनुराग अट्टल तर प्रमुख पाहुणे म्हणून विमला विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका वंदना हिरे या होत्या. शाळेचे मुख्याध्यापक कैलास जोगदंड, वर्गशिक्षक कालीदास घोडके,   प्रा.सूरज कुलकर्णी हे व्यासपीठावर उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या सुरुवात विद्यार्थीनींच्या स्वागतगीताने  करण्यात आली. उपस्थितांचे व सर्व शिक्षकांचे गुलाबपुष्प देवुन स्वागत करण्यात आले. इ.१० वी च्या मुलांचे स्वागत इ.९ वी च्या मुलांनी केले. या प्रसंगी  मान्यवरांनी मूलांना परिक्षेसाठी शूभेच्छा देत, भावी जीवनासाठी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी
 विद्यार्थ्यानी आपली मनोगते व्यक्त करत, शाळा व शिक्षकांविषयी ऋण व्यक्त केले.  कार्यक्रमाचे प्रास्तविक सूधाकर ससाणे,  सुत्रसंचलन याज्ञिकी कुलकर्णी व आरती परळकर तर आभार कांचन नाईकवाडे हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  नरेंद्र कुलकर्णी, नितिन कुलथे, संजय खेडकर, सुनिल जिरेवार, माणिक गरड, सुनिता घुगे, करुणा जवंजाळ, दिपीका भालेराव, प्रतिभा धर्माधिकारी,  शोभा टेकाळे , हनुमंत सोनवणे यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिवसेनेच्या बदामराव पंडित यांचा पुन्हा एकदा भाजप आ लक्ष्मण पवारांना धक्का

पार्श्वभूमीचे संपादक गंमतभाऊ भंडारी याना नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे