"समय के साथ चलो"चा 57 वर्षाच्या रशीद भाईंकडून संदेश

प्रदूषण मुक्तीसाठी गेवराईत इलेक्ट्रॉनिक रिक्षा सुरू करून
"समय के साथ चलो"चा 57 वर्षाच्या रशीद भाईंकडून संदेश

====================
                दखल
        ---------------------
            दिनकर शिंदे
====================
 कारखाने, विविध उद्योगधंदे, भरमसाठ रस्त्यावर वाहणारी वाहने यांच्या सुटणाऱ्या धुरामुळे  प्रचंड प्रमाणात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी, त्याचबरोबर पेट्रोल-डिझेलच्या अतिवापरामुळे वाढत असलेल्या दरावर आळा घालण्यासाठी आता इलेक्ट्रॉनिक ऑटो रिक्षा वापरावा आणि आर्थिक बचतही करावी, असा "समय के साथ चलो" चा संदेश गेवराईच्या शेख रशीद शेख उमर  या 57 वर्षाच्या रिक्षाचालकाने ऑटो रिक्षाधारक नवयुवकांना दिला आहे.
           सध्या पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या टु व्हीलर, थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांची बेसुमार संख्या झाली असून, रहिवासी क्षेत्रातूनही यांची मोठ्या प्रमाणात धूर सोडत रहदारी सुरू झाली आहे. यामुळे हवेचे प्रदूषण होऊन स्वतःच्या व इतरांच्या  आरोग्यास, परिणामी जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या पेट्रोल, डिझेल या इंधनावर चालणाऱ्या गाड्यांमुळे पेट्रोल- डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला ही सट्टा लागत आहे. अशा स्थितीत आजही मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाला शहरांमधून एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी जुन्या रिक्षांचा मोठा आधार मिळतो. आज अनेकजण इलेक्ट्रॉनिकचा वापर करून विविध क्षेत्रामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसत आला असून त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. प्रत्येक जण इंटरनेटचा वापर करून जगाची माहिती आत्मसात करण्याचा प्रयत्नही करताना दिसत आहेत. अशा स्थितीत आपणही "समय के साथ चलो" हा नारा स्विकारत, गेवराईच्या 57 वर्षाच्या शेख रशीद शेख उमर या रिक्षाचालकाने जुनी रिक्षा हद्दपार करून नवी विद्युत चार्जिंगवर चालणारी पहिली इलेक्ट्रॉनिक रिक्षा आणून गेवराईच्या रस्त्यावर उतरवली आहे. सदर इलेक्ट्रॉनिक ऑटो रिक्षा अत्यंत आकर्षक दिसत असून, यामध्ये समोरासमोर प्रवाशांना बसण्याची व्यवस्था आहे. याबाबत शेख रशीद भाई यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, लाईटच्या चार्जिंग वर हा इलेक्ट्रॉनिक रिक्षा चालतो. रात्रभर चार्जिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवसभर चार्जिंग करण्याची गरज पडत नाही. नवीन आणि आकर्षक दिसत असल्याने प्रवाशीही या रिक्षाला प्राधान्य देतात देत आहेत. आवाज आणि धूर न सोडणाऱ्या या रिक्षाच्या वरच्या बाजूस असलेल्या टपावर लवकरच आपण सौर पॅनल बसवणार असल्याचे सांगून, रिक्षामध्येही आकर्षक लाइटिंग आणि योग्य अशी साऊंड सिस्टिम, मोबाईल चार्जर बसविणार असल्याचे ते म्हणाले. प्रदूषण मुक्ती आणि इंधन बचतीसाठी रिक्षाधारक नवयुवकांनीही आता इंधनावर चालणाऱ्या ऑटोरिक्षा ऐवजी  इलेक्ट्रॉनिक रिक्षाच वापराव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गेवराई शहरातील रस्त्यावरून रशीद मामू आपली इलेक्ट्रॉनिक रिक्षा फिरवत असताना अबालवृद्धांसह शहरवासीयांचे मात्र ते आकर्षण ठरत आहेत.म्हणूनच घेतलेली ही दखल.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....