जालिंदर ठवरे यांना इबटा चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर



गेवराई (प्रतिनिधी )
धोंडराई येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये कार्यरत असलेले जालिंदर ठवरे यांना बीड जिल्ह्यातील इबटा शिक्षक संघटनेच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.
शनिवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी या पुरस्काराचे वितरण भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे इंडियन बहुजन टीचर्स असोशियन संघटनेच्यावतीने प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे जि. प. मा. शाळा धोंडराई शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर तसेच जाधव व्ही एम , माळी सर, काळे सर, खरात सर, पांढरे सर, सिडाम सर, संतोष कोठेकर, धर्मराज करपे, बरकते सर, प्रकाश खरात, गावडे सर, शेंडगे सर, दीपक गायकवाड आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....